हुपरी विभाग प्रमुख पदी अमोल देशपांडे, हुपरी शहर प्रमुख पदी विनायक विभुते,हुपरी शहर संघटक पदी सुहास माने यांची निवड.
पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने व कोल्हापूर संपर्क प्रमुख अरूणभाई दूधवडकर यांच्या संमतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या *हुपरी विभाग प्रमुख पदी अमोल देशपांडे, हुपरी शहर प्रमुख पदी विनायक विभुते,हुपरी शहर संघटक पदी सुहास माने,* यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी कोल्हापूर येथे *संपर्क प्रमुख अरूणभाई दूधवडकर यांच्या हस्ते व मा.आमदार डॉ सुजित मिणचेकर व कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय चौगुले* यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हा प्रमुख अभिजित पाटील, जिल्हा प्रमुख सुनील शित्रे, युवासेना जिल्हाधिकरी स्वप्नील मगदूम,संभाजी हांडे,संजय चौगुले, उपशहर प्रमुख संदीप भंडारी,संजय पाटील, वैभव लायकर, दादासो कमते, व शिवसैनिक यांच्या उपस्थित देण्यात आले.
टिप्पण्या