खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि युवा नेते उत्तम पाटील यांच्या इफको खत कंपनीच्या निवडणुकीतील पॅनलला प्रचंड बहुमताचा कौल.सदलगा शहरातील सदलगा पश्चिम भाग व्ही पी जी के एस संस्थेचे अध्यक्ष श्री अरुणकुमार देसाई यांना प्रतिनिधित्व.
सदलगा शहरातील सदलगा पश्चिम भाग व्ही पी जी के एस संस्थेचे अध्यक्ष श्री अरुणकुमार देसाई यांना प्रतिनिधित्व.
नवी दिल्ली येथील रासायनिक खत तयार करणाऱ्या इफको कंपनीच्या हुबळी विभागाची नुकतीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली.
या हुबळी विभागाच्या प्रतिनिधी निवडणुकीत चिकोडीचे विद्यमान खासदार सन्माननीय अण्णासाहेब जोल्ले आणि युवा नेते उत्तम अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने 18 पैकी 16 जागा जिंकून प्रचंड बहुमताने विजय संपादन केला.
या निवडणुकीत उतर कन्नड, दावणगिरी, हावेरी, हुबळी- धारवाड, विजयपूर ,बागलकोट, बेळगावी या जिल्ह्यांचा समावेश होता. या सर्व जिल्ह्यातील एकूण 64 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि जोल्ले पाटील पॅनलला 18 पैकी 16 जागांवर विजय मिळविला.
विजय उमेदवारामध्ये अण्णासाहेब जोल्ले ,उत्तम अण्णा पाटील, अरुण देसाई, बाळासाहेब आरगे, मल्लाप्पा नींगजनावर, मुर्गेश माळगी, रामचंद्र हेगडे, रमेश भिवसे, रवींद्र हेगडे, सचिन केस्ते, संजय चौगुले, शिवलिंगप्पा पाटील, श्रीशैल पाडेदार, सिद्धनगवडा पाटील, सुभाष चौगुला ,अण्णासाहेब दुग्गणनावर. यांची निवड होऊन नव निर्वाचित उमेदवारांची रीजनल जनरल बोर्डावर संचालक पदी म्हणून नियुक्त करण्यात आली. सर्व विजयी उमेदवारांचे बेळगाव जिल्ह्यातून आणि चिकोडी तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
टिप्पण्या