यड्राव येथील शामराव पाटील यड्रावकर हायस्कूलमध्ये महिला दिन उत्साहात साजरा .

यड्राव (प्रतिनिधी )  :येथील शामराव पाटील यड्रावकर  हायस्कूलमध्ये महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कर्तुत्वान महिला महिलांचा सत्कार विविध स्पर्धा व प्रबोधन असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व योग्य नियोजनामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी जयसिंगपूरच्या माजी नगरसेवक माधुरी चौगुले होत्या.
     कार्यक्रमाचा शुभारंभ सवितादेवी नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी
 कॅन्सरग्रस्तांना सहकार्य व प्रबोधन करणाऱ्या सुदर्शना पाटील, सरकारी वकील पदी निवड झालेल्या अमृता साने- मीरजे ,तसेच शाहिस्ता सुतार यांचे महिला पोलीस पदी निवड झाल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला.
     यानिमित्त घेण्यात आलेल्या महिलांच्या ग्रुप डान्स स्पर्धेत निर्भया ग्रुप, मंगळागौर ग्रुप, व जय हो ग्रुप यांचा अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आला. त्यांना रोख पाच हजार तीन हजार व दोन हजार रोख रकमेसह सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थिनींसाठी ही पाककला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
     स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापीका मनीषा पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्राध्यापक अण्णासाहेब क्वाने यांनी करून दिली. हेमांगी कांबळे यांनी महिला दिन व ग्रुप डान्स बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी उपसरपंच वैशाली साळुंखे, जयसिंगपूर जायंटस सहेली ग्रुपच्याअध्यक्षा शैलजा मानगावे, श्रीदेवी क्वाने, संजयकुमार क्वाने, उपस्थित होते. सूत्रसंचालन विजया जगदाळे यांनी केले. विलास दुर्गाडे यांनी आभार मानले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.