जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवेश घ्यावा : चंद्रकांत भाटराजाराम विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
शिरोळ : प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घ्यावा असे आवाहन राजाराम विद्यालय नंबर २ च्या शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य चंद्रकांत भाट यांनी केले
येथील राजाराम विद्यालयात इयत्ता पहिली व चौथीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असा संयुक्त समारंभ संपन्न झाला यावेळी चंद्रकांत भाट बोलत होते
समारंभाचे प्रमुख पाहुणे युवा उद्योजक अभिजीत माने माजी उपनगराध्यक्षा सौ करुणा कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत इयत्ता पहिली व पाचवीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले
शाळेच्या मुख्याध्यापिका निता चव्हाण शिक्षक सुनंदा पाटील सनी सुतार यांनी उपस्थित पालकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत देण्यात येणारे शिक्षण भौतिक सुविधा विद्यार्थ्यांची प्रगती याविषयी मौलिक मार्गदर्शन केले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रवेश घेऊन शासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले
या समारंभास शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा शितल जगदाळे सदस्य प्रियंका इंगळे मारुती जाधव दत्तात्रय पुजारी शिक्षक त्रिशला येळगुडे मीनाक्षी हेगाण्णा यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
टिप्पण्या