आवडेच्या दूटप्पी भूमिका व निवडणुकीत भाजपच्या विरोधी भूमिकेमुळे भाजप प्रवेश रेंगाळला भाजप कार्यकर्ते आवाडेंवर नाराज
ताराराणी आघाडीचे नेते आमदार प्रकाश आवाडे यांनी पूर्वीच्या काँग्रेस पक्षामध्ये असताना आमदारकी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्रीपद मिळाले असताना
काँग्रेसमध्ये त्यांची घुसमट झाल्याने त्यांनी काँग्रेसला रामराम करत ताराराणी पक्ष स्थापन केला व स्वतःचा आवाडेचा एक मजबूत गट निर्माण करण्यामध्ये प्रकाश आवाडे हे सफल झाले
परंतु प्रत्येक वेळी आवाडे यांच्या भाजप विरोधी भूमिकेमुळे आवडेचा भाजप प्रवेश रखडला गेला असून
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या महावीर गाठ यांचा ताराराणी आघाडीतून आमदार प्रकाश आवाडे यांची सुपुत्र राहुल आवाडे यांनी पराभव करत जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश केला
तसेच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आमदार हाळवनकरांचा पराभव करत दुसऱ्यांदा भाजपला मात देण्यात प्रकाश आवाडे यशस्वी झाले
परंतु त्यानंतर आवडेनी भाजप कार्यकर्त्यांशी जुळवून घेत भाजपमध्ये प्रवेश करण्याची निश्चित केले असले तरी
पुन्हा आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे हे
भाजपाच्या विरोधात म्हणजेच नरेंद्र मोदी यांना अबकी बार 400 पार करण्याच्या हेतूने असताना देखील
त्यांच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या विरोधात लढत असताना सरळ सरळ भाजपला विरोध होताना दिसत असल्याने
भाजपमधील तळागाळातील कार्यकर्ते आवाडे यांच्या भूमिकेवर नाराज असून भाजपचे कार्यकर्ते नरेंद्र मोदी यांना डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार असल्याने
राहुल आवाडे हे अपक्ष किंवा शिवसेना (उबाठा) गटातून लढवण्याच्या तयारीत असल्याने
राहुल आवाडे यांना भाजपमधूनच व अंतर्गत जोरदार विरोध होत असताना दिसत आहे.
टिप्पण्या