अखेर धैर्यशील माने हे हातकणंगलेचे उमेदवार फायनल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हातकणलंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरून सुरू असलेला घोळ अखेर काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी संपुष्टात आला 
सर्वानुमते खासदार धैर्यशील माने यांची हातकणंगले लोकसभेचे उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर आमदार खासदार हे देखील वर्षां निवासस्थानी उपस्थित होते यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांना प्रचाराची यंत्रणा गतिमान करण्याचे आदेश सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्याचे समजले कोल्हापूर लोकसभेमधून संजय मंडलिक विरुद्ध छत्रपती शाहु महाराज व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी हे असतील यामध्ये (उबाठा) गटाचा काय निर्णय होतो हे पाहणे औत्सुक्य राहील का स्वतःचा उमेदवार म्हणुन सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील याना देतात ते पाहावे लागेल कारण राजु शेट्टी यांना शिवसैनिक यांचा विरोध आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.