माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णाप्पा लक्ष्मण मगदूम यांचे निधन

जनवाड वार्ताहर शितल कुडचे/-जनवाड तां.चिककोडी येथील प्रतिष्ठित व्यक्ती अण्णाप्पा लक्ष्मण मगदूम यांचे आज दि.5.03,2024 रोजी सकाळी 6.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले ते 95 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात तीन मुले दोन मुली सुना नातवंडे परतुंडे असा आप्त परिवार आहे. अण्णाप्पा लक्ष्मण मगदूम हे सी.बी. कोरे नंदी कारखान्याचे संचालक म्हणून पद भूषविले त्याचबरोबर ग्रामपंचायत अध्यक्ष म्हणून देखील ते बरेच वर्षे पद भूषविले व महादेव स्वामी मठ जिर्णोद्धार कमिटीचे देखील ते बरेच वर्षे अध्यक्ष म्हणून पद भूषविले आहे .त्याचबरोबर प्राथमिक कृषी पतीन संघाचे अध्यक्ष म्हणून ही पद भूषविले आहेत .असे अनेक संघ संस्थाचे ते संचालक म्हणून काम पाहिले आहेत त्यानंतर त्यांचा मोठा मुलगा राजू अण्णाप्पा  मगदूम हे माजी  ग्रामपंचायत सदस्य . तर मधला मुलगा पिरगोंडा अण्णाप्पा   मगदूम  महादेव स्वामी मठ जिर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष यांचे ते वडील होत . एकंदरीत मगदूम कुटुंबातील अण्णाप्पा लक्ष्मण मगदूम हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे मनमिळावू तसेच सढळ हाताने मदत करणारे गावातील न्यायनिवाडा करणारे होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच पै पाहुण्यांच्या सह पंचक्रोशीत शोक कळा पसरली आहे त्यांचे जाणे हे कधीही न भरून निघणारी पोकळी आहे.

 टीप. रक्षाविसर्जन गुरुवार दि.7.03.2024 रोजी सकाळी 9  वाजता होणारं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.