आजी-आजोबांनी दिली परिक्षा.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

दैठणा येथे नवभारत साक्षरता कार्यक्रम.65 आजी आजोबा नी घेतला सहभाग.


परभणी :दि.18 मार्च परभणी तालुक्यातील दैठणा येथील केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेत केंद्र सरकारच्या उल्लास नव साक्षरता कार्यक्रमांतर्गत 65 परिक्षार्थी आजी-
आजोबांनी उत्स्फूर्त पणे, नवचैतन्याने पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानावर आधारित चाचणी परिक्षा देवून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.दैठणा येथील केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेत केंद्र सरकारच्या उल्लास नवभारत साक्षरता अभियानात 65 आजी-आजोबांनी नियमितपणे हजेरी लावून अभ्यासक्रम पूर्ण केला. पाठोपाठ या अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी परिक्षेत हे आजी- आजोबा मोठ्या उत्स्फूर्तपणे परिक्षार्थी म्हणून सहभागी झाले. अन् या आजी- आजोबांनी वयोमाना सह प्रकृतीवर मात करीत मोठ्या उत्साहाने केंद्रावर दाखल होवून उत्तमरीत्या परिक्षा दिली.या केंद्राचे मुख्याध्यापक राजेंद्र ससाने यांच्यासह सहशिक्षक खयूम, फाळके यांनी परिक्षेचे उत्तम असे नियोजन केले. त्यामुळे अत्यंत नियोजनबद्ध व तेवढ्याच शिस्तबध्द वातावरणामध्ये ही परीक्षा पार पडली.  वयोमानानुसार आलेल्या सर्व आजी-आजोबांचा उत्साह वाखाखण्या जोगा तर होताच, त्यातून अन्य ग्रामस्थांनी, विद्यार्थ्यां नी प्रेरणा घ्यावी, असे वातावरण होते. दरम्यान, या परीक्षे साठी सौ. वैशाली देशमुख, सौ. कदम, सौ. पिनाटे, सौ. महावळकर, सौ. जोशी, सौ. सय्यद या शिक्षकांनी परिक्षे करीता परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.