लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रशासन अलर्ट.

चिकोडी : काशिनाथ सुळकुडे,
लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रशासन अलर्ट झाले आहे.  चिकोडी लोकसभा मतदारसंघात 17 लाख 41 हजार 758 मतदार असून 1896 मतदान केंद्र आहेत. चिकोडी लोकसभा व्याप्तीत 32 चेकपोस्ट उभारणी करून तपासणी केली जात आहे.

चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत 8 विधानसभा मतदारसंघ येत असून 17 लाख 41 हजार 758 एकूण मतदार आहेत. यात 8 लाख 75 हजार 953 पुरूष मतदार तर 8 लाख 65 हजार 731 महिला मतदार व 74 तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे.
अ. क्र.*विधानसभा मतदारसंघ*पुरुष*महिला*तृतीयपंथी*एकूण

1.निपाणी*116320*116178*7*232505.
2.चिकोडी-सदलगा*114894*115390*13*230297.
3.अथणी*119944*116471*4*236419.
4.कागवाड*102784*100514*7*203305.
5.कुडची*102699*98683*16*201398.
6.रायबाग*111250*107034*9*218293.
7.हुक्केरी*105637*107001*9*212647.
8.यमकनमरडी*102425*104460*9*206894.
एकूण 
पुरुष 875953,
महिला 865731, तृतीयपंथी 74, एकूण 1741758..
चिकोडी लोकसभा मतदारसंघात 24 हजार 27 अपंग मतदार 21 हजार 320 इतके 85 वर्षांच्या वरील वयोगटातील मतदार आहेत. 50 हजार 589 इतके  सर्वाधिक युवा मतदार आहेत. 

1896 मतदान केंद्र :  चिकोडी लोकसभा मतदारसंघात एकूण 1896 मतदान केंद्र असून यात 419 शहरात तर 1477 ग्रामीण भागात मतदान केंद्र आहेत.
यात विधान सभा मतदारसंघ असलेल्या निपाणी 248, चिकोडी सदलगा 246*अथणी 260*कागवाड 231*कुडची 219*रायबाग 232*हुक्केरी 224*यमकनमरडी 236 मतदान केंद्राचा समावेश आहे.


लोकसभा निवडणुक काळात आचारसंहितेचे पालन व्हावे व बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी चिकोडी लोकसभा मतदारसंघात 32 तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे.
विधानसभा मतदारसंघ तपासणी नाके पुढील प्रमाणे,

निपाणी- कोगनोळी (महाराष्ट्र राज्य सीमा) चेकपोस्ट, निपाणी मुरगुड रोड राधानगर, अप्पाचीवाडी क्रॉस, मांगुर क्रॉस, बोरगाव.
चिकोडी -  चिकोडी संकेश्वर क्रॉस, एकसंबा (महाराष्ट्र सीमा) 
, सदलगा दतवाड (महाराष्ट्र सीमा), चिकोडी (चण्यानदडी ).

अथणी - तेलसंग जिल्हा सीमा चेकपोस्ट , कोट्टलगी-गुडापूर रोड (महाराष्ट्र सीमा), कोहळी चेकपोस्ट.
कागवाड- कागवाड-मिरज रोड (महाराष्ट्र सीमा), कागवाड गणेशवाडी (महाराष्ट्र सीमा), मंगसुळी -अरग रोड(महाराष्ट्र सीमा), केंपवाड - शिंदेवाडी (महाराष्ट्र सीमा) , मदभावी -कटाव-सलगर रोड (महाराष्ट्र सीमा), बाळीगेरी -जत (महाराष्ट्र सीमा).
कुडची - कुडची, हारुगेरी, नसलापूर, कंकणवाडी, कब्बूर.
हुक्केरी- हिटणी क्रॉस (महाराष्ट्र सीमा), बुगटे अल्लूर (महाराष्ट्र सीमा), भैरापूर, नागणुर(संकेश्वर).

यमकनमरडी- दड्डी क्रॉस, कुरणी क्रॉस (चिकालगुड), शेट्टीहळ्ळी.
---------------------------

प्रत्येक चेकपोस्टला 3 एसएस्टी अधिकारी व पोलीस  कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला फ्लाईग स्कॉड, व्हिडिओ सर्विलियन्स टीम, एसएसटी पथक नेमण्यात आले आहे.

चिकोडी निवडणूक अधिकारी म्हणून बेळगाव जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे  यांची नेमणूक करण्यात आली आहे. 
चिकोडी लोकसभा निवडणुक अधिकारी कार्यालय :-  प्रांताधिकारी कार्यालयातील न्यायालय सभागृह मिनिविधान सौध चिकोडी .
फोन क्रमांक :- 08338 27213

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.