जिंतूर तालुक्यातील अकोली जवळील पुलावरून बस कोसळली. विस प्रवाशी गंभीर जखमी.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

जिंतूर : ता.20 जिंतूर 
ते सोलापूर ही राज्य परिवहन महामंडळाची बस बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अकोली जवळील पुलावरून खाली कोसळल्याने बस मधील सुमारे 18 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.जिंतूर आगाराची ही बस सोलापूर कडे निघाली होती,वळणावरील अरुंद पुलावर बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस 50 फूट खाली नदी पात्रात कोसळली. प्रत्यक्ष दर्शनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बसमधील प्रवाशांना कसबशी बाहेर काढले.
या अपघातात 18 ते 20 प्रवासी जखमी झाले. या जखमींना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालया त उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी धावून गेले आहेत. अकोली येथील या वळणावर यापूर्वी अनेकदा अपघात घडले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.