अवाजवी दरवाढीने सेलूत व्यापारी संतप्तजिल्हा प्रशासनास निवेदन सादर.
शिवाजी शिंदे
300 टक्के भाडेवाढ.
सेलू : दि.14 माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वात सेलू येथील व्यापाऱ्यांनी परभणी जिल्हाधिकारी श्री. गावंडे यांना गुरुवारी (१४) रोजी निवेदन सादर केले. सदरील निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,सेलू नगर पालिकेंतर्गत गाळ्यांचे व मोकळ्या जागांच्या भाडे निश्चिततेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनास सादर करतेवेळी पालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर म्हणजे 200 ते 300 टक्के भाडेवाढ केल्याने सेलूतील व्यापारी कमालीचे संतप्त झाले आहेत.सेलू नगर पालिकेने स्वतःच्या मालकीच्या अंदाजे एकूण 975 गाळ्यांचे व मोकळ्या जागांचे भाडे निश्चित करुन अधिमूल्य ठरविण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. ते करतेवेळी गाळ्यांचे आणि मोकळ्या जागेचे अवाजवी भाडे निश्चित करुन मोठ्या प्रमाणावर म्हणजे 200 ते 300 टक्के भाडेवाढ व प्रत्येक गाळे व मोकळी जागाधारकांना आव्वाच्या सव्वा दराने लाखो रुपयांचा अधिमूल्य ठरविण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणावर भूर्दंड सामान्य नागरीक आणि व्यापारी वर्गाला बसणार आहे.सेलू नगरपालिकेने तयार केलेल्या प्रस्तावाने व अवाजवी दरवाढीने व्यापारी कमालीचे संतापले असून संपूर्ण व्यापार्यांना देशोधडी ला लावण्यासाठीच हेतुतः प्रशासनाने हे पाऊल उचलल्याचा आरोप व्यापारी धनराज गादीया, आनंद जाधवानी, नारायण बालचंदानी, सनी कुकरेजा, प्रसाद शिकारे, गिरीश गुरुबाणी, विशाल सोमानी, विशाल संघई, नागोराव देशमुख, रमेश शिकाणे, मिर आलम, कौंडे पाटील, अशोक अंभुरे, संतराम काष्टे, दिपक दायमा, निरज लोया, सूर्यकांत जाधव, जॉली बब्बर, शेख रज्जाक, शाम दळवे, विठ्ठल कोकर, रियाज भाई, गफार भाई यांनी केला असून जिल्हा प्रशासनाने या प्रस्तावा संदर्भात लक्ष घालावे व व्यापार्यांबरोबर चर्चा करीत भाडेवाढ निश्चित करावी, अशी अपेक्षा व्यापार्यांनी व्यक्त केली आहे.
टिप्पण्या