भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज टाकवडे येथे विविध पदांच्या नियुत्या.
टाकवडे प्रतिनिधी संजय पाटील. - आज दिनांक 10/03 /2024 रोजी टाकवडे येथील भारतीय जनता पार्टीच्या सर्व सेलच्या नियुक्त्या करण्यात आल्या. भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष माननीय मुकुंद गावडे यांच्या हस्ते पत्र वाटप करून हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे दिव्यांगा गाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांच्या घरी पार पडला. या कार्यक्रमावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते पोपट.पुजारी , अबुद्दीन मुजावर, महेश देवताळे, महावीर तकडे, यांच्या उपस्थितीमध्ये आज नियुक्तीचे पत्र देऊन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आले.
यामध्ये टाकवडे शहराध्यक्ष. सचिन नलवडे यांची निवड करण्यात आली. तसेच युवा मोर्चासाठी महेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली, किसान मोर्चा पदासाठी राजाराम घोरपडे, ओबीसी सेल साठी तुषाल बगाडे यांच्या नियुक्ती करून त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी भारतीय जनता पार्टीचे टाकवडे येथील सर्व सदस्य बूथ प्रमुख, वॉरियर्स, सुरेश वडर, महादेव कोळी, बाळासो कदम, किशोर कांबळे, चंद्रकांत दोडणावर, गिरीश पाटील, श्रीधर पाटील वकील साहेब, गजानन पाटील तसेच भागातील बरेच बूथ मधील कार्यकर्ते हजर होते.
टिप्पण्या