संभाजी नगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत तुफान हाणामारी; प्रोटोकॉल तोडल्यामुळे आणि काहींना तुम्ही बैठकीला का आलात?, विचारल्यामुळे झाला वाद

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजी नगरमध्ये मराठा समाजाच्या वतीने बैठक बोलावलेली होती. या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणावर राडा झाल्याची घटना घडली आहे. थेट मारामारी झाल्याने बैठकीला गालबोट लागलं आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या वतीने स्वतंत्र उमेदवार देण्यात येणार आहेत. राज्यातील १७ ते १८ मतदारसंघांमध्ये मराठा समाजाचं प्राबल्य असल्याने अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. त्याबाबतचा निर्णय ३० मार्च रोजी ते जाहीर करणार आहेत.

३० मार्चपूर्वी आपापल्या जिल्ह्यांमध्ये बैठका घेऊन उमेदवार निश्चित करावा, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानुसार शुक्रवारी छत्रपती संभाजी नगरमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये कुणीही कुणाचं नाव पुढे करायचं नाही, असं ठरलं होतं. परंतु काही जणांकडून उमेदवारीसाठी आपल्या जवळच्यांची नावं पुढे केली जात होती.
बैठकीत प्रोटोकॉल तोडल्यामुळे आणि काहींना तुम्ही बैठकीला का आलात?, विचारल्यामुळे वादाचा मुद्दा उफाळून आला. शेवटी मारामारी झाल्याची घटना घडली. बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना पदाधिकारी म्हणाले की, आम्ही मनोज जरांगे यांच्यापाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. परंतु काहींनी विनाकारण आपल्या लोकांची नावं पुढे करण्याचा प्रयत्न केला.

उमेदवार ठरवण्यावरुन झालेल्या वादामुळे मनोज जरांगे काय निर्णय घेतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. मराठा समाजाच्या वतीने दिलेला उमेदवार हा केवळ मराठा असणार नाही तर तो दलित, मुस्लिम, धनगर समाजातील असणार आहे. त्याच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन जरांगेंनी केलं होतं. परंतु आता मराठा समाजामध्येच तू-तू..मैं-मैं झाल्याने पुढे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होतोय.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.