विवेकानंद बालकमंदिराचे वासंतिक संस्कार शिबीर संपन्न.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.  


सेलू : सेलू येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेजोगाई संचलित विवेकानंद पूर्व प्राथमिक बालक मंदिरात वासंतिक शिबीर मोठया उत्साहात संपन्न झाले. या शिबीरात बाल वयातच लहान मुलांवर शिक्षणा बरोबरच आरोग्यासाठी योग , हस्तकला,चित्रकला आदि संस्कार कायम रुजतात म्हणून दि.२७ ते ३० मार्च २४ या कालावधीत सकाळी ८ते११ या वेळेत संस्कार शिबीर संपन्न झाले.शिबीरात दररोज योगाभ्यास,संस्कारक्षम बोधकथा,बालकां मधील कलागुण वृद्धिंगत करण्यासाठी  विविध कला कौशल्य विकास उपक्रम राबविण्यात  आले.
विद्यार्थी व पालकांचा या शिबिरास स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सुधीरराव चौधरी, किरण डुघ्रेकर व श्रीमती लीलाताई देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बालवाडी ताई सौ.रेणुका बोथे, सौ.वृषालीदेशमुख,
सौ.मोहिनी लोणीकर , सौ.सिमा आष्टीकर यांनी शिबीरातील बाल-बालिकांना योगाभ्यासासह, माती व कागदांपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.या शिबीराचा समारोप सुधीरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व श्रीमती लीलाताई देशपांडे यांच्या उपस्थितीत जेष्ठ साहित्यिक  गौतम सूर्यवंशी यांच्या संतकथा कथनाने झाला.शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व बालवाडी ताई व सेविका संजिवनी यांनी परिश्रम घेतले.पालक वर्गाने या उपक्रमांचे कौतुक केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.