हातकणलंगले लोकसभा मतदारसंघातून तिरंगी लढत पूर्वीचे कट्टर विरोधक आमने- सामने

हातकणलंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीमधून खासदार धैर्यशील माने 
यांची उमेदवारी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केली व त्याच्या कार्यक्रर्ते यानी गावागावात फटाक्याची अतिषबाजी केली 
तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी.खास.राजू शेट्टी यांनीही आपली उमेदवारी जाहीर केली असून 
त्यांनी शिवसेनेकडे बाहेरून पाठिंबा मागितला असताना 
आज अचानक नवीन घडलेल्या घडामोडीतून जिल्हा परिषद सदस्य ताराराणी पक्षाचे युवा नेते राहुल आवाडे यांनी 
 आपल्या गटाची मोट बांधत आज कोल्हापुर येथे मेळावा घेऊन हातकणंगले लोकसभा लढवण्याची घोषित केले असून 
वेळप्रसंगी अपक्ष लढू असे घोषित केले असले तरी राहुल आवाडे हे शिवसेना संपर्कप्रमुख नेते संजयजी पवार यांची भेट घेऊन 
शिवसेना (उबाठा) मधून आपण लढवण्यास इच्छुक असून तसं त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याचे निश्चित केले आहे 
दोन दिवसात ते आपली उमेदवारी घोषित करतील असे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी खाजगीत बोलताना सांगितले 
जर राहुल आवाडे निवडणुकीस उभे राहिले तर 
या ठिकाणी तिरंगी लढत होणार असुन शिवसेना महायुतीतून धैर्यशील माने 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून राजू शेट्टी व ताराराणी शिवसेनेतून (उबाठा) महाविकास आघाडीतुन राहुल आवाडे 
हे निवडणूक रिंगणात असू शकतील असे राजकीय विश्लेषकांचा अंदाज असून हातकणंगले लोकसभेमध्ये गतवेळासारखी निवडणुकीची परिस्थिती होण्याची चिन्हे दिसत असून यावेळी उमेदवाराची प्रचार यत्रंणा कशी असेल व हातकणंगलेचा उद्याचा खासदार कोण होतं हे पाहुया.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.