लोकसभेला प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त मत कसे वाढतील असा संकल्प करा- माजी आ.बोर्डीकर.
शिवाजी शिंदे
सेलू : परभणी लोकसभेला प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त मत कसे वाढतील असा संकल्प कार्यकर्त्यांनी केला पाहिजे आणि असे झाले तर परभणी लोकसभा निकालात इतिहास घडेल असे प्रतिपादन माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी शुक्रवार दि 15 मार्च रोजी सेलू तालूका महायुती मेळाव्या प्रसंगी केले.
पुढे बोलतांना बोर्डीकर म्हणाले की, इराण हमास युद्धात आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी मध्यस्ती केल्या मुळे त्यांचा व्हाईट हाऊस मध्ये सत्कार झाला.
या मुळे महायुतीचा उमेदवार कोणताही असो आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व करण्यासाठी आपल्या भागातून उमेदवार निवडून दिला पाहिजे. नेत्यांच्या विचाराप्रमाणे काम करावे. माझ्यावर प्रमुख या नात्याने लोकसभा मतदार संघाची जबाबदारी भारतीय जनता पार्टीने सोपवलेली आहे. आपण सर्वांनी एक दिलाने काम करून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी आपले कर्तव्य आहे. त्यासाठी सर्व बूथ प्रमुखांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या योजनेची माहिती घरोघरी जाऊन सांगावी व आपण आपले बूथ सांभाळावे प्रत्येक सामान्य माणसापर्यंत मोदींनी केलेल्या कार्याची माहिती पोहचली पाहिजे.प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त मत कसे वाढतील असा संकल्प केला पाहिजे आणि असे झाले तर परभणी लोकसभा निकालात इतिहास घडेल असे मत व्यक्त केले.माजी आमदार मोहन फड यांनी महायुतीचा उमेदवार यावेळेस निवडून आलाच पाहिजे असा आपण निर्धार करूया असे त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.तर राजेश विटेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की गेल्या दहा वर्षात ज्या खासदारांना जिंतूर मतदारसंघातून 25 हजाराची मताधिक्य दिलं त्या खासदारांनी जिंतूर तालुक्यात काय विकास केला असा सवाल उपस्थित केला जिंतूर तालुक्यातील कामाचे श्रेय घेण्यावरून दोन गटात भांडणे लावण्याचे काम या खासदारांनी केलं हाच काय दहा वर्षातला विकास तर सर्व लोकसभा मतदार संघात व जिल्ह्यात काय विकास केला असा सवाल ही उपस्थित केला. स्वतःच्या फायद्यासाठी खासदारकी हे पद वापरले आपल्या कामाचे उत्तर आहे म्हणून मतदारांना दहा वर्षाच्या काळात फक्त झुलवत ठेवले.यावेळी मा.चंद्रकांत राठोड, राजेश विटेकर, डॉ. केदार खटीग, मुकेश बोराडे, विनोद बोराडे, विजय वरपूडकर, सुरेश भुमरे,मा.डाॅ संजय रोडगे, दत्तराव महाराज सोन्नेकर, विलास बाबर, संदिप लहाने,ऍड संजय लोया, माउली ताठे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप नेते अर्जुन बोरुळ आभार भाजप तालुका अध्यक्ष ॲड दत्तराव कदम यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंकरराव भोंडवे, कपिल फुलारी, बाळासाहेब काजळे, अशोक अंभोरे, गणेश काटकर, संदीप बोकन, विठ्ठल कोकर, अशोक ताठे, अभय महाजन, महेश नावाडे, अमोल भोसले, प्रकाश शेरे, दीपक चव्हाण, पंकज वायाळ, पराग गोळेगावकर, सर्व भाजप कार्यकर्त्यांनी परिश्रम केले.
टिप्पण्या