चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रा ऐवजी आधुनिक सोयींनी सुसज्ज असे कम्युनिटी हेल्थ सेंटर सुरू व्हावे.
चिकोडी तालुक्यातील सदलगा हे शहर सर्वात मोठे असून सदलगा शहराची लोकसंख्या अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस हजार असून शहर परिसरातील नागराळ, मलिकवाड, वडगोल, बहिणाकवाडी, यादयानवाडी, जनवाड या खेड्यांचा समावेश सदलगा शहरातील आरोग्य केंद्रात केला जातो, त्यामुळे एकूण 60 ते 70 हजार लोकसंख्येला सदलगा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र योग्य पद्धतीने न्याय देऊ शकत नाही. या ठिकाणी फक्त तीन सिस्टर असून चार मदतनीस आहेत अजूनही 6 सिस्टर व सहा मदतनीस यांची गरज या केंद्राला आहे. कारण उपचार घेणारे जादा व सुविधा पुरवणारे शासकीय यंत्रणा कमी यामुळे नागरिकांचे बरेच हाल होत आहेत. सदलगा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या फक्त सहा बेड असून अजूनही किमान 30 बेडची अपेक्षा आहे .या प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त एकच वैद्यकीय अधिकारी असून या ठिकाणी अजून किमान चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे. दररोज किमान 100 ते 150 रुग्ण उपचारासाठी येत असतात त्यांना या सोयी अपुऱ्या पडत आहेत, सदलगा या शहरापासून जवळच असलेल्या जनप्रतिनिधींचे गाव म्हणून ओळखले जाणाऱ्या, व लोकसंख्या कमी असलेल्या ठिकाणी कम्युनिटी हेल्थ सेंटर अस्तित्वात आहे. तेथील लोकसंख्या फक्त वीस ते पंचवीस हजार इतके कमी असून त्या ठिकाणी सुसज्ज सेवा उपलब्ध आहेत परंतु या सदलगा शहराकडे प्रशासन एवढे का दुर्लक्ष करीत आहे, हा एक संशोधनाचा विषय आहे. या शहराला सर्व सुविधा उपलब्ध करून देणारा खंबीर नेता नाही का? असे नागरिकांना वाटते. या ठिकाणी एक्स-रे मशीन नाही सदलगा शहरी खाजगी किंवा शासकीय ब्लड बँक सुद्धा नाही , अत्याधुनिक सुविधा कोणत्याच उपलब्ध नाहीत त्यामुळे सदलगा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रा ऐवजी कम्युनिटी हेल्थ सेंटर झाल्यास अनेक मोठ्या सुविधा शहरात उपलब्ध होतील आणि नागरिकांची चांगली सोय होईल याकडे जनतेचे प्रतिनिधी, लोकनियुक्त प्रतिनिधी, आणि प्रशासन या सर्वांनी संवेदनशील पणे आणि गांभीर्यपूर्वक विचार करून सदलगा शहरातील होणाऱ्या रुग्णांची हेळसांड दूर करावी या ठिकाणी कम्युनिटी हेल्थ सेंटर निर्माण करावे आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सदलगा शहर परिसरातील जनतेकडून होत आहे.
टिप्पण्या