लोकसभा निवडणुकी आधी मराठा समाज आक्रमक.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

गावागावात पोस्टर्स अन् नेत्यांसह समर्थकांना घरबंदी.


परभणी : परभणी सह संपूर्ण जिल्हात पोस्टर्स लावत मराठा बाधंवांनी राजकीय नेत्यांना घरबंदी केली आहे. तसेच नेत्यांविरोधात घोषणाही देण्यात येत आहेत.मराठा समाज आक्रमक नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घरबंदी
पोस्टर्स दाखवत मराठा समाज आपला रोष प्रगट करीत आहे. सर्वपक्षीय नेते झाले बहिरे, आमची मागणी सगेसोयरे अशा घोषणा देत लिमला तालुका पूर्णा येथील मराठा बांधवांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घरबंदी अशा आशयाचे पोस्टर्स दाखवत घोषणाबाजी केली. यावेळी परिसरामधील ३०-३५ गावातील तरुणांना पोस्टर्स वाटप करण्यात आले. आता हे पोस्टर्स गाव गावाच्या दरवाजा वर प्रथम दर्शी भागावर लावण्यात येणार आहेत. त्यामुळे एकीकडे लोकसभेचा निवडणूक प्रचार सुरू होत असतानाच दुसरीकडे मात्र मराठा बांधव गावोगावी या नेत्यांची नाकाबंदी करताना दिसत आहे.  मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे, सगेसोयरेचा अध्यादेश तात्काळ लागू करावा, या मागणीसाठी मागील काही महिन्यां पासून मराठा समाज आक्रमक आहे. सुरुवातीला ग्रामीण भागात पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आली. गावात पुढारी आला की त्या पुढार्‍यां च्या गाड्या अडवून अगोदर मराठा आरक्षणाचा निकाल लावा आणि त्यानंतरच गावामध्ये प्रवेश करा, अशा सूचना करत घोषणाबाजी गावकरी करत होते. पुढाऱ्यांना गावबंदी केल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणा वर फटका ग्रामीण भागात बसला. ग्रामीण भागात राजकीय पक्ष आणि नेत्यांना मागील काही महिन्यांपासून कसल्याही प्रकारच्या मोठ्या राजकीय सभा घेता आल्या नाहीत तर विकास कामांचे भूमिपूजन अथवा  काही ठिकाणी करता आले नाही.आचार संहिता लागण्या अगोदर राज्य सरकार सगेसोयरेचा अध्यादेश लागू करेल, अशी मराठा समाजाची भावना होती. पण आचारसंहिता लागली आणि आचारसंहिते च्या आधी दोन दिवस मोठ्या प्रमाणावर शासन निर्णय निघाले पण त्यामध्ये सगेसोयरे चा शासन निर्णय निघालाच नाही. त्यामुळे आता ग्रामीण भागात मराठा समाजा मध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरागे पाटलांवर व समाजातील ज्यांनी ज्यांनी रास्ता रोखो,
गाव बंदी असे निदर्शने केली त्यांच्यावर दिवसें दिवस मोठ्या प्रमाणा वर गुन्हे दाखल करण्याचे काम राज्य सरकार करत आहे. आज गोगलगाव पाटीवर निपाणी टाकळी करडगाव,आंबेगाव दिगर,ढेंगळी पिंपळगाव, डिग्रस जहांगीर आदी गावातील ज्या ज्या मराठा समाजातील तरुणांनी आंदोलन केली होती त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जमिनावर सोडण्यात आले.मनोज जरांगे यांच्यावर आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी देखील राज्य सरकारने लावली आहे. या दोन्ही घडलेल्या घटनांमुळे मराठा समाज प्रचंड आक्रमक होताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मागील दोन दिवसापासून परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आता नेत्यांना घरबंदी करण्यास सुरुवात केली आहे. घरबंदीचे पोस्टर देखील छापण्यात आले असून प्रत्येक घराच्या दारावर हे पोस्टर लावण्यात येत आहेत. जसा जसा लोकसभेचा प्रचार जोरात सुरू होत आहे, तसं तसं ग्रामीण भागामध्ये मराठा आरक्षणासाठी राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांना मात्र तोही बाजूने घेण्याचा मराठा समाजाकडून प्रयत्न केला जात आहे. येणाऱ्या काळात मराठा समाज आणि राजकीय पुढारी यांच्यामध्ये प्रचंड संघर्ष होणार असल्याचे चित्र आत्ता स्पष्ट दिसून येत आहे. प्रचाराच्या निमित्ताने सर्वच पक्षांना आणि त्यांच्या पुढार्‍यांना ग्रामीण भागात जावे लागणार आहे. तर मराठा समाज ही आरक्षणासाठी तेवढाच आक्रमक राहणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.