समता नगर मध्ये तुकाराम महाराज बीज उत्साहात साजरी.
शिवाजी शिंदे
माणसाचे चांगले कर्म हेच आयुष्यात कामी येतात ह.भ.प.संतोष पवार महाराज.
सेलू : दि 27 बुधवार रोजी शहरातील समतानगर भागातील पंडीतराव हिंगणे व हिंगणे परिवाराच्या वतीने आयोजित मागील १७ वर्षांपासून
किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या वर्षीची किर्तन सेवा ह.भ.प संतोष महाराज पवार यांच्या किर्तनाने संपन्न झाली. या प्रसंगी आयोजक पंडीत महाराज हिंगणे, रमेश हिंगणे, कार्तिक महाराज हिंगणे यांची
प्रमुख उपस्थिती होती. ह.भ.प. प्रसाद महाराज काष्टे, जयराम महाराज तांगडे, योगेश महाराज आकात, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, विठ्ठलराव आकात, शेषराव बुधवंत, दतराव टोलमारे, मदनराव मानवतकर,
गायनाचार्य रमेश महाराज बीटे, माऊली महाराज खवणे, संजय महाराज फोके,
आसाराम निर्वाडीकर, बबन महाराज ,दिपक गोरे, उमेश पौळ, विकास गडदे पखवाज साथ कृष्णा महाराज जाधव,विक्रम महाराज गव्हाने आदि उपस्थित होते. या तुकाराम महाराज बीज निमित्य समतानगर, गणेश नगर, व परिसरातील भाविक मोठ्या संख्येत ऊपस्थित होते.
टिप्पण्या