हुपरी शहर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने अमली पदार्थ व अवैध धंद्याच्या विरोधात पोलीस निरीक्षक चौखंडे यांना निवेदन
हुपरी प्रतिनिधी - हुपरी येथे अवैध धंद्याच्या वाढत्या प्रमाणामुळे युवक पिढी व कॉलेज वयाची मुले बरबाद होताना दिसत आहेत.
पालक ही मुलाखत समोर हतबल होताना पाहून यामध्ये गॅंगवॉर सारखे मोठे प्रकरण होण्याची शक्यता असल्याने
हुपरीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून गांजा दारू अमली पदार्थ यासारख्या प्रमाणामध्ये वाढ होऊन वाद-विवाद पासून ते सावकारकी पर्यत
या अमली पदार्थापासून त्याच्या सेवनाने मुलींची छेड काढणे,गँगवार करणे
असे अनेक प्रकरण हुपरी मध्ये होत आहेत हुपरी हे चांदी उद्योगासाठी प्रसिद्ध असताना हुपरीच्या नावाला डाग लागण्याचे काम होत असून
यावर पोलिसांनी तात्काळ आळा घालणे गरजेचे असून
गांजा व अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करावी व
हा कुठून उपलब्ध होतो त्याची पायामुळे खोदून काढावे असे आशयाचे निवेदन
शिवसेना पक्षाच्या वतीने आज हुपरी पोलीस स्टेशनचे पीआय चौखंडे साहेब यांना देण्यात आले.
यावेळी विभाग प्रमुख अमोल देशपांडे, शहरप्रमुख विनायक विभुते, शहर संघटक सुहास माने, मा.शहरप्रमुख रघुनाथ नलवडे बापू,महीला आघाडी शहर प्रमुख मिना जाधव, संभाजी हांडे , संजय चौगुले, वैभव ल्हायकर,नितीन काटकर, राजेंद्र परिट, अमोल भिवटे, रत्नाकर सावंत यांच्यासह सर्व पदाधिकारी शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.
टिप्पण्या