श्री साईबाबा मंदिर संस्थानच्या वतीने महाशिवरात्र महोत्सवानिमित्त लाखो भाविकांनी घेतला रुद्राक्ष व महाप्रसादाचा लाभ.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : दि.8 फेब्रु. सेलू  महेश नगर येथील श्री साईबाबा मंदिर संस्थानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्र महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. आज सकाळी 06 वाजल्यापासून महेश्वर शिवलिंगावर भारतातील प्रमुख नद्या  व तीर्थक्षेत्र येथील जलाचा  अभिषेक  करण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून  एक लोटा जल अर्पण  करून भाविकास प्रसाद व रुद्राक्ष वाटप करण्यात आले,या वेळी भरपूर भाविकांनी  याचा लाभ घेतला.
तसेच आज सायंकाळी 6 वा.शिवलिंगाची महाआरती आयोजित करण्यात आली होती या महाआरतीला सुद्धा शेकडो भाविक उपस्थित राहून आरतीची  शोभा वाढविली या बद्धल   श्री साईबाबा मंदिर संस्थान महेश नगर सेलूच्या कमिटीचे अध्यक्ष तथा विनोद बोराडे यांनी भाविकांचे आभार व्यक्त केले. भारतातील सर्व प्रमुख नंद्या,बारा ज्योतिर्लिंग व तिर्थ क्षेत्रातील पाण्याने महेश्वर शिवलिंगाचा अभिषेक(एक लोटा जल) अपर्ण करून पुण्यार्जन करण्यात आले. त्यानंतर सर्व भाविकांना हरिद्वार येथून सिद्ध केलेले रुद्राक्ष  व प्रसादाचे वाटप करण्यात आले  आहे. शहरातील शेकडो भाविकांनी उपस्थित राहून रुद्राक्ष व महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री साईबाबा मंदिर संस्थानचे अध्यक्ष   तथा सेलू शहराचे माजी नगराध्यक्ष   विनोद बोराडे व मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.