युवा नेते सुधाकर रोकडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सेलू तालुकाध्यक्ष पदी निवड.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

सेलू : सेलू तालूक्यातील हातनूर या गावचे निष्ठावंत युवा कार्यकर्ते सुधाकर रोकडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. परभणी येथील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे व मान्यवरांच्या  उपस्थितीत निवड झाल्याचे पत्र देण्यात आले.पत्रात नमूद केले आहे की,आपली पक्षाच्यावतीने सेलू तालूका अध्यक्ष पदी निवड करण्यात येत असून पक्ष प्रमुख शरद पवार  यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करून पक्षाला बाळकटी देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेले पक्षाचे कार्यक्रम  व ध्येय धोरणांची अंमलबजावणी करावी.सुधाकर रोकडे  हे माजी आमदार विजय भांबळे यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी यापूर्वी युवक कार्याध्यक्ष, तालूका कार्याध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य  या पदावर कार्य केले असून त्यांची तालुकाध्यक्षपदी  निवड झाली आहे. या निवडीचे सर्वस्तारातून स्वागत होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.