प्रभू येशू ख्रिस्तानी मरणावरती विजयी मिळविला , तसे आपणही वाईट गोष्टीचा त्याग करुन विजयी होऊया . ः प्रिस्ट संदेश आदमाने

यड्राव (प्रतिनिधी ) प्रभू येशू ख्रिस्त हा मरणातून तीस-या दिवशी उठला गेला . त्यांनी मरणावरती विजयी मिळविला आणि तो आज आम्हां सोबत शेवटच्या क्षणापर्यंत असणार आहे .यावर आपला विश्वास असला पाहिजे . परमेश्वर पित्याने आपल्याला या जगापासून वेगळे केले यासाठी की आपला नाश होऊ नये तर आपल्याला सार्वकालीक जीवन मिळावे  यासाठी आपण त्याजवर विश्वास ठेवून येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेऊन दैनंदिन जीवन जगले पाहिजे . जसा येशू ख्रिस्तांनी मरणावरती विजयी मिळविला तसे आपणही वाईट गोष्टीचा त्याग करुन विजयी होऊया असा संदेश प्रिस्ट संदेश आदमाने यांनी देऊन ईस्टर सणाच्या शुभेच्छा दिल्या .                                                          यड्राव (ता . शिरोळ ) येथील न्यू अॕपोस्टॉलिक चर्च यड्राव व इंदिरानगर (बेघर वसाहत ) येथे ईस्टर सणाच्या डिव्हाइंड सर्व्हिसमध्ये ख्रिस्ती बांधवानां संदेश देताना ते बोलत होते .                                                                यावेळी प्रिस्ट सचिन आदमाने संदेश देताना म्हणाले , आज आपल्यामध्ये संशय , अविश्वास व व्देश अशा प्रभू येशूला न आवडणा-या गोष्टी आपल्या अंतःकरणातून काढून टाकू . आपण जगीक गोष्टीत व बंधनात न अडकता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेऊन आपल जीवन जगूया . प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व मानवजातीच्या पापासाठी आपले रक्त या पृथ्वीवर सांडले तसेच आपल बलिदान देऊन या जगातील  सर्व मानवजातीला पापातून मुक्त केले , व त्यांच्या पापाची क्षमा येशूच्या रक्ताव्दारे केली . येशू ख्रिस्त  आमच्या पापासाठी मरण पावला आणि तो तीस-या दिवशी पुन्हा मरणावरती विजयी मिळवून मरणातून उठला गेला . असा संदेश त्यांनी देऊन ईस्टर सणाच्या शुभेच्छा दिल्या .                                       यानंतर मंडळीचे डिकन - सुरेश आदमाने व व्हि . एस . आदमाने यांनीही सर्व ख्रिस्ती बांधवानां ईस्टर सणाच्या शुभेच्छा दिल्या .प्रारंभी चर्चमध्ये क्वॉयर ग्रुपने ईस्टर सणाची गीते गाऊन आनंदी वातावरण केले .                            यावेळी बी . एस . आदमाने , प्रकाश आदमाने , धोंडिराम चौगुले , नागेश मिसाळ , राहुल आदमाने , निलेश जगताप , सतीश आदमाने , सुहास आदमाने , योगेश आदमाने , यश आदमाने , प्रेम आदमाने , प्रतिक आदमाने , शहापूर पोलीस ठाणेचे कर्मचारी ओंकार माने , कल्पना लोकरे यांचेसह यड्राव व इंदिरानगर मधील सर्व ख्रिस्ती बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.