पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विवेकानंद बालकमंदिराचे वासंतिक संस्कार शिबीर संपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू : सेलू येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेजोगाई संचलित विवेकानंद पूर्व प्राथमिक बालक मंदिरात वासंतिक शिबीर मोठया उत्साहात संपन्न झाले. या शिबीरात बाल वयातच लहान मुलांवर शिक्षणा बरोबरच आरोग्यासाठी योग , हस्तकला,चित्रकला आदि संस्कार कायम रुजतात म्हणून दि.२७ ते ३० मार्च २४ या कालावधीत सकाळी ८ते११ या वेळेत संस्कार शिबीर संपन्न झाले.शिबीरात दररोज योगाभ्यास,संस्कारक्षम बोधकथा,बालकां मधील कलागुण वृद्धिंगत करण्यासाठी  विविध कला कौशल्य विकास उपक्रम राबविण्यात  आले. विद्यार्थी व पालकांचा या शिबिरास स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुधीरराव चौधरी, किरण डुघ्रेकर व श्रीमती लीलाताई देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बालवाडी ताई सौ.रेणुका बोथे, सौ.वृषालीदेशमुख, सौ.मोहिनी लोणीकर , सौ.सिमा आष्टीकर यांनी शिबीरातील बाल-बालिकांना योगाभ्यासासह, माती व कागदांपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.या शिबीराचा समारोप सुधीरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व श्रीमती लीलाताई देशपांडे यांच्या उपस्थितीत जेष्ठ ...

आवडेच्या दूटप्पी भूमिका व निवडणुकीत भाजपच्या विरोधी भूमिकेमुळे भाजप प्रवेश रेंगाळला भाजप कार्यकर्ते आवाडेंवर नाराज

इमेज
ताराराणी आघाडीचे नेते आमदार प्रकाश आवाडे यांनी पूर्वीच्या काँग्रेस पक्षामध्ये असताना आमदारकी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्रीपद मिळाले असताना  काँग्रेसमध्ये त्यांची घुसमट झाल्याने त्यांनी काँग्रेसला रामराम करत ताराराणी पक्ष स्थापन केला व स्वतःचा आवाडेचा एक मजबूत गट निर्माण करण्यामध्ये प्रकाश आवाडे हे सफल झाले  परंतु प्रत्येक वेळी आवाडे यांच्या भाजप विरोधी भूमिकेमुळे आवडेचा भाजप प्रवेश रखडला गेला असून  जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या महावीर गाठ यांचा ताराराणी आघाडीतून आमदार प्रकाश आवाडे यांची सुपुत्र राहुल आवाडे यांनी पराभव करत जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश केला  तसेच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आमदार हाळवनकरांचा पराभव करत दुसऱ्यांदा भाजपला मात देण्यात प्रकाश आवाडे यशस्वी झाले  परंतु त्यानंतर आवडेनी भाजप कार्यकर्त्यांशी जुळवून घेत भाजपमध्ये प्रवेश करण्याची निश्चित केले असले तरी  पुन्हा आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे हे  भाजपाच्या विरोधात म्हणजेच नरे...

प्रभू येशू ख्रिस्तानी मरणावरती विजयी मिळविला , तसे आपणही वाईट गोष्टीचा त्याग करुन विजयी होऊया . ः प्रिस्ट संदेश आदमाने

इमेज
यड्राव (प्रतिनिधी ) प्रभू येशू ख्रिस्त हा मरणातून तीस-या दिवशी उठला गेला . त्यांनी मरणावरती विजयी मिळविला आणि तो आज आम्हां सोबत शेवटच्या क्षणापर्यंत असणार आहे .यावर आपला विश्वास असला पाहिजे . परमेश्वर पित्याने आपल्याला या जगापासून वेगळे केले यासाठी की आपला नाश होऊ नये तर आपल्याला सार्वकालीक जीवन मिळावे  यासाठी आपण त्याजवर विश्वास ठेवून येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेऊन दैनंदिन जीवन जगले पाहिजे . जसा येशू ख्रिस्तांनी मरणावरती विजयी मिळविला तसे आपणही वाईट गोष्टीचा त्याग करुन विजयी होऊया असा संदेश प्रिस्ट संदेश आदमाने यांनी देऊन ईस्टर सणाच्या शुभेच्छा दिल्या .                                                          यड्राव (ता . शिरोळ ) येथील न्यू अॕपोस्टॉलिक चर्च यड्राव व इंदिरानगर (बेघर वसाहत ) येथे ईस्टर सणाच्या डिव्हाइंड सर्व्हिसमध्ये ख्रिस्ती बांधवानां संदेश देताना ते बोलत होते .        ...

अन्नपूर्णा कोळी आदर्श समाजसेविका पुरस्काराने सन्मानित

इमेज
जयसिंगपूर प्रतिनिधी सावित्रीच्या लेकी आयोजित 'सावित्रीची लेक - आदर्श पुरस्कार अंतर्गत शिरोळ येथील समाजसेविका अन्नपूर्णा कोळी यांना आदर्श समाजसेविका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अन्नपूर्णा कोळी यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना अभिनेत्री डॉ. पद्मजा खटावकर यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रा.राजेंद्र कुंभार, प्रा. डॉ. मोहन पाटील, प्रसाद कुलकर्णी, डॉ. अजय मस्के, पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, श्रीनिवास देशपांडे, उत्तम सुतार, महेश परीट, अतुल भोजणे, इकबाल इनामदार, राजकुमार नकाते, बाबासाहेब बागडी, अमोल सुतार, बबन जामदार, अजित कांबळे, नंदकुमार सुतार, मंगल सुतार, सुप्रभा माळी, बाबासाहेब नदाफ, कनक शहा, दीपक पोतदार आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक संजय गुरव यांनी तर सूत्रसंचालन स्वाती भापकर यांनी केले  संजय सतार यांनी मानले.

हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्याची शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मुस्लिम समाजाची मागणी.

इमेज
जयसिंगपूर प्रतिनिधी - हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे जयसिंगपूर येथील शिवसैनिक रफिक भाई आतार यांनी मुंबई येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली याबाबत शिवसेनाप्रमुख हे येत्या एक-दोन दिवसात निर्णय घेतील असा विश्वास रफिक भाई  आत्तार यांनी व्यक्त केला उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्वोच्च असेल व मुस्लिम समाज उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असेही त्यांनी शेवटी सांगितले मिरज जिल्हा सांगली येथे महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षा कडून उद्धव ठाकरे यांची  सभा घेण्यात आली यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांना हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशा मागणीची निवेदन देण्यात आले होते दरम्यान लोकसभेसाठी अद्याप कोणत्याच पक्षाकडून मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्यात आली नाही त्यामुळे हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळाल्यास मी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचेही रफिक भाई आत्तार...

संभाजी नगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत तुफान हाणामारी; प्रोटोकॉल तोडल्यामुळे आणि काहींना तुम्ही बैठकीला का आलात?, विचारल्यामुळे झाला वाद

इमेज
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजी नगरमध्ये मराठा समाजाच्या वतीने बैठक बोलावलेली होती. या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणावर राडा झाल्याची घटना घडली आहे. थेट मारामारी झाल्याने बैठकीला गालबोट लागलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या वतीने स्वतंत्र उमेदवार देण्यात येणार आहेत. राज्यातील १७ ते १८ मतदारसंघांमध्ये मराठा समाजाचं प्राबल्य असल्याने अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. त्याबाबतचा निर्णय ३० मार्च रोजी ते जाहीर करणार आहेत. ३० मार्चपूर्वी आपापल्या जिल्ह्यांमध्ये बैठका घेऊन उमेदवार निश्चित करावा, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानुसार शुक्रवारी छत्रपती संभाजी नगरमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये कुणीही कुणाचं नाव पुढे करायचं नाही, असं ठरलं होतं. परंतु काही जणांकडून उमेदवारीसाठी आपल्या जवळच्यांची नावं पुढे केली जात होती. बैठकीत प्रोटोकॉल तोडल्यामुळे आणि काहींना तुम्ही बैठकीला का आलात?, विचारल्यामुळे वादाचा मुद्दा उफाळून आला. शेवटी मारामारी झाल्याची घटना घडली. बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना पदाधिकारी म्हणाले की...

हातकणलंगले लोकसभा मतदारसंघातून तिरंगी लढत पूर्वीचे कट्टर विरोधक आमने- सामने

इमेज
हातकणलंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीमधून खासदार धैर्यशील माने  यांची उमेदवारी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केली व त्याच्या कार्यक्रर्ते यानी गावागावात फटाक्याची अतिषबाजी केली  तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी.खास.राजू शेट्टी यांनीही आपली उमेदवारी जाहीर केली असून  त्यांनी शिवसेनेकडे बाहेरून पाठिंबा मागितला असताना  आज अचानक नवीन घडलेल्या घडामोडीतून जिल्हा परिषद सदस्य ताराराणी पक्षाचे युवा नेते राहुल आवाडे यांनी   आपल्या गटाची मोट बांधत आज कोल्हापुर येथे मेळावा घेऊन हातकणंगले लोकसभा लढवण्याची घोषित केले असून  वेळप्रसंगी अपक्ष लढू असे घोषित केले असले तरी राहुल आवाडे हे शिवसेना संपर्कप्रमुख नेते संजयजी पवार यांची भेट घेऊन  शिवसेना (उबाठा) मधून आपण लढवण्यास इच्छुक असून तसं त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याचे निश्चित केले आहे  दोन दिवसात ते आपली उमेदवारी घोषित करतील असे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी खाजगीत बोलताना सांगितले  जर राहुल आवाडे निवडणुकीस उभे राहिले तर  या ठिकाणी तिरंगी लढत होणार अस...

अखेर धैर्यशील माने हे हातकणंगलेचे उमेदवार फायनल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इमेज
हातकणलंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरून सुरू असलेला घोळ अखेर काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी संपुष्टात आला  सर्वानुमते खासदार धैर्यशील माने यांची हातकणंगले लोकसभेचे उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर आमदार खासदार हे देखील वर्षां निवासस्थानी उपस्थित होते यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांना प्रचाराची यंत्रणा गतिमान करण्याचे आदेश सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्याचे समजले कोल्हापूर लोकसभेमधून संजय मंडलिक विरुद्ध छत्रपती शाहु महाराज व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी हे असतील यामध्ये (उबाठा) गटाचा काय निर्णय होतो हे पाहणे औत्सुक्य राहील का स्वतःचा उमेदवार म्हणुन सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील याना देतात ते पाहावे लागेल कारण राजु शेट्टी यांना शिवसैनिक यांचा विरोध आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवेश घ्यावा : चंद्रकांत भाटराजाराम विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घ्यावा असे आवाहन राजाराम विद्यालय नंबर २ च्या शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य चंद्रकांत भाट यांनी केले येथील राजाराम विद्यालयात इयत्ता पहिली व चौथीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असा संयुक्त समारंभ संपन्न झाला यावेळी चंद्रकांत भाट  बोलत होते समारंभाचे प्रमुख पाहुणे युवा उद्योजक अभिजीत माने माजी उपनगराध्यक्षा सौ करुणा कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत इयत्ता पहिली व पाचवीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका निता चव्हाण शिक्षक सुनंदा पाटील सनी सुतार यांनी उपस्थित पालकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत देण्यात येणारे शिक्षण भौतिक सुविधा विद्यार्थ्यांची प्रगती याविषयी मौलिक मार्गदर्शन केले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळ...

समता नगर मध्ये तुकाराम महाराज बीज उत्साहात साजरी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  माणसाचे चांगले  कर्म हेच आयुष्यात कामी येतात ह.भ.प.संतोष पवार महाराज. सेलू : दि 27 बुधवार रोजी शहरातील समतानगर भागातील पंडीतराव हिंगणे व हिंगणे परिवाराच्या वतीने आयोजित मागील १७ वर्षांपासून  किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या वर्षीची किर्तन सेवा ह.भ.प संतोष महाराज पवार यांच्या किर्तनाने संपन्न झाली. या प्रसंगी आयोजक पंडीत महाराज हिंगणे, रमेश हिंगणे, कार्तिक महाराज हिंगणे  यांची प्रमुख उपस्थिती होती. ह.भ.प. प्रसाद महाराज काष्टे, जयराम महाराज तांगडे, योगेश महाराज आकात, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, विठ्ठलराव आकात, शेषराव बुधवंत, दतराव टोलमारे, मदनराव मानवतकर,  गायनाचार्य रमेश महाराज बीटे, माऊली महाराज खवणे, संजय महाराज फोके, आसाराम  निर्वाडीकर, बबन महाराज ,दिपक  गोरे, उमेश पौळ, विकास गडदे पखवाज साथ कृष्णा महाराज जाधव,विक्रम महाराज गव्हाने आदि उपस्थित होते. या तुकाराम महाराज बीज निमित्य समतानगर, गणेश नगर, व परिसरातील भाविक मोठ्या संख्येत ऊपस्थित होते.

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सेलू येथे मंडला आर्ट्स कला कार्यशाळा संपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   ऋतुजा तापडिया यांचे मार्गदर्शन. एचएआरसी संस्थेचा विद्यार्थ्यांमधील तणावमुक्ती व एकाग्रतेसाठी आयोजित अभिनव उपक्रम. सेलू : आज दि. 27 मार्च रोजी 'मंडला आर्ट थेरपी' या कलेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांचे  मानसिक आरोग्य सुधारावे, तणाव आणि चिंता दूर व्हावे आणि अभ्यासातील एकाग्रता वाढावी आणि कलेची जोपासना व्हावी या साठी  परभणी येथील होमिओपॅथीक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्यावतीने बालकांचा कला विकास व्हावा या उद्देशाने सदरील कार्यशाळेचे आयोजन  कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सेलू येथे करण्यात आले होते.यावेळी व्यास पीठावर  कार्यशाळेच्या मार्गदर्शक ऋतुजा तापडिया,  केंद्र प्रमुख एकनाथ जाधव,सेवा निवृत्त ग्रंथपाल डॉ. शिवाजी शिंदे, मुख्याध्यापक वेडे मॅडम, गृहप्रमुख प्रेरणा पवार, मासिक पाळी समुपदेशन तज्ञ डॉ आशा चांडक,  सेजल तापडिया,  कला शिक्षक पांडुरंग पाटणकर हे उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन केंद्रप्रमुख व सर्व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेत ऋतुजा तापडिया यांनी...

दुटप्पी भूमिका घेणाऱ्या आंदोलन अंकुशच्या धनाजी चुडमुंगे यांनी माझ्यावर खोटे आरोप करू नयेत पृथ्वीराजसिंह यादव

इमेज
शहरातील खाजगी जमिनीवर आरक्षण आंदोलन संघटना बंद करणार का केला सवाल ? शिरोळ प्रतिनिधी -  शिरोळ विकास आराखड्यातील जमीनआरक्षण रद्द होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही शिरोळ : प्रतिनिधी : राजकीय व आर्थिक स्वार्थ साधण्यासाठीच आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे हे नेहमीच दुटप्पी भूमिका घेऊन शिरोळ शहरातील विकास आराखड्यातील जमीन आरक्षणासंदर्भात माझ्यावर खोटे नाटे आरोप करीत आहेत पण शिरोळ शहरातील नागरिकांच्या खाजगी जमिनीचा विकास आराखड्यात समावेश करण्यात आला आहे यामुळे पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे धनाजी चुडमुंगे हे आपली संघटना बंद करणार का असा सवाल युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत केला तसेच खाजगी जमिनीवर पडलेले आरक्षण रद्द होत नाही तोपर्यंत टप्प्याटप्प्याने लढा तीव्र करणार असल्याचा पूर्णोउच्चार त्यांनी यावेळी केला शिरोळ येथील छत्रपती शिवाजी तक्त येथे शिरोळ शहर विकास आराखड्यातील जमीन आरक्षण संदर्भात युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना यादव यांनी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करीत शिर...

खून प्रकरणातील आरोपी प्रदिप जगताप यास फाशीची शिक्षा

इमेज
विशालक्रांती वृत्तसेवा जयसिंगपूर : यड्राव (ता.शिरोळ) येथे 6 ऑक्टोबर 2018 रोजी पहाटे पत्नी रूपाली प्रदिप जगताप हिच्या चारित्र्यावर संशय घेवून प्रदिप विश्वनाथ जगताप (वय 40 रा.कवठेगुलंद ता.शिरोळ, सध्या रा.शिरगांवे मळा, पार्वती औद्योगीक वसाहतीच्या मागे, यड्राव) यांने पत्नीबरोबर भांडण काढून मागाच्या लाकडी मार्‍याने सासू, पत्नी, मेव्हणी, मेव्हणा या चौघांच्या डोकीत मारून खुन केला होता. यात 24 साक्षीदार तपासल्यानंतर दुर्मीळातील दुर्मीळ घटना असलेने व एकच वेळी चार व्यक्तींचा खुन झाला असल्याने आरोपी प्रदिप जगताप यास मरेपर्यंत फाशीची शिक्षा व 10 हजार दंड व दंड न जमा केल्यास एक वर्षाची सक्तमजूरी अशी शिक्षा जयसिंगपूर येथील न्यायलायाचे न्यायाधिश जी.बी.गुरव यांनी  मंगळवारी दुपारी सुनावली. याबाबत अधिक माहिती अशी, यड्राव येथे 6 ऑक्टोबर 2018 रोजी पत्नी रूपाली प्रदिप जगताप हिच्या चारित्र्यावर संशय घेवून प्रदिप विश्वनाथ जगताप यांने सासू छाया श्रीपती आयरेकर, पत्नी रूपाली, मेव्हणी सोनाली रावण, मेव्हणा रोहीत श्रीपती आयरेकर यांना डोकीत मारून खून केला होता. त्यानंतर शहापूर पोलिस ठाण्याचे तत्कालि...

'सावित्रीची लेक- आदर्श पुरस्कार' प्रदान सोहळा -२०२४ उत्साहात

इमेज
जयसिंगपूर /प्रतिनिधी:    "सावित्रीच्या लेकी" या मासिकाच्या वतीने आयोजित 12 वा 'सावित्रीची लेक- आदर्श पुरस्कार' प्रदान सोहळा -२०२४ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार हे होते.        महिलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी, त्यांच्यात सांस्कृतिक, आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिक भान निर्माण करण्यासाठी तसेच मनोरंजनाबरोबरच विविध स्पर्धा, उपक्रम प्रशिक्षणातून व्यक्तिमत्व विकास आणि आदर्श नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी 'सावित्रीच्या लेकी' हे मासिक गेल्या १३ वर्षापासून कार्यरत आहे. आपल्या गुणवत्तापूर्ण दर्जेदार अध्यापनातून संस्कारक्षम, यशवंत विद्यार्थी घडविणाऱ्या उपक्रमशिल शिक्षिकांच्या तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कृषी, आरोग्य व विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याची खास नोंद घेवून 'सावित्रीची लेक- आदर्श पुरस्कार' हा मानाचा पुरस्कार देवून महिलांना गौरविण्यात आले.      प्रा. डॉ. मोहन पाटील, समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस, प्रसिध्द गझलकार प्रसाद कुलकर्णी, प्रेरणादायी वक्ते डॉ. अजय...

ओम साई कलारत्न समाजभूषण पुरस्कारसाठी रमेश खराडे पाटील यांची निवड.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सामाजिक कार्यातून रमेश राजेभाऊ खराडे पाटील (भाऊजी) यांची निवड. सेलू : सेलू तालुक्या तील देवगाव फाटा येथिल रमेश राजेभाऊ खराडे पाटील (भाऊजी) यांची निवड राष्ट्रीय पातळीवरील ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन निर्मित साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२४ याकरीता करण्यात आली असून हा भव्य व दिव्य  साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२४ सोहळा शिर्डी येथे लखलखीत व रंगबेरंगी विद्युत रोषणाईत पार पडणार असुन तरी पुरस्कारार्थींन सोबत  पुरस्कार सोहळ्याचे साक्षीदार व्हावेत म्हणून  पती, पत्नी, मित्र आमंत्रित करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यास वेळेवर उपस्थित राहावे   शिर्डी येथे ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य येथे हा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडणार आहे. केलेल्या उत्कृष्ट पत्रकारिता व समाजिक कार्यातून ही निवड झाली असून पत्रकार रमेश खराडे पाटील यांचे सर्व मित्र परिवाराकडून तालुक्यातून सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव व कौतुक होत आहे.

हुपरी येथे उघड्यावर गांजा व अमली पदार्थाचे सेवन करताना दोघांना व सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करताना एकास अटक

इमेज
हुपरी येथील जवाहार साखर कारखाना रोड फाईव्ह स्टार एमआयडीसी कडे जाणारा रस्ता व्यंकटेश सूतगिरणीच्या समोर माळरानावरती उघड्यावरती गांजा या अमली पदार्थाचे सेवन करताना * महेश लक्ष्मण कोळी * ,वय.वर्षे -29 (रा.गाठ मळा तळंदगे रोड हुपरी) * अक्षय मधुकर माळी * वय,वर्ष -25 (रा.अंबाई नगर रेंदाळ) या दोघांना अटक केली असता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून * संजय शिवप्पा कुरुंदवाडे * वय वर्ष -45 (रा.अंबाई नगर रेंदाळ) हे रात्रीच्या वेळेस अंबाईनगर रेंदाळ येथे रोडवर सार्वजनिक ठिकाणी विना परवानगी मध्यप्राशन करत असताना अटक करण्यात आली आहे.

सेलू तालुक्यातील कुपटा येथील डॉ. अलका सोळंके उपशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.    सेलू : दि.21महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात सेलू तालुक्या तील कुपटा येथील शेतकरी एकनाथराव सोळंके यांची नातसुन डॉ. अलका सुमंत सोळंके यांची उप शिक्षणाधिकारी या पदावर निवड झाली आहे.डॉ. सोळंके ह्या बी.ए.एम.एस. असून त्या चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे पती सुमंत सुभाषराव सोळंके (आयएफएस) हे सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे उपसंचालक पदावर कार्यरत आहेत. पतीसोबत राहून डॉ.अलका यांनी मेळघाटात वैद्यकीय सेवा देताना खडतर परिस्थितीमध्ये स्थानिकांना आरोग्य सेवा दिली. यापूर्वी देखील त्यांची 2018 मध्ये पोलीस उप निरीक्षक पदी निवड झाली होती. परंतु मुख्य ध्येय राज्यसेवा असल्याने या पदावर रुजू न होता त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला आणि त्यांनी उप शिक्षणधिकारी पदा पर्यंत झेप घेतली. दरम्यान, दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देत असताना तेथील शिक्षणाची दुरावस्था पाहता शैक्षणिक क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखविण्याची जिद्द मनाला स्वस्थ बसू देत नव्हती. मनात ठरवलं आणि राज्यसेवा स्पर्धा प...

सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गलथान कारभाराची चौकशीची मागणी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समिती चा कारभार  गेल्या सहा महिन्या पासून चालू असलेल्या गलथान कारभाराची चौकशी करण्याबाबत आज माननीय जिल्हा उपनिबंधक साहेब कार्यालय परभणी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित संचालक एडवोकेट दत्ता नारायणराव कदम अनिल राव पवार अशोक दादा अंभोरे सुरेंद्र शेठ तोष्णीवाल होते . निवेदनावर मार्केट कमिटी संचालक डॉक्टर संजय दादा रोडगे, दत्ता नारायणराव कदम शैलेश शेठ तोष्णीवाल, अनिल पवार, रामेश्वर राठी, आदी संचालकां च्या सह्या आहेत. संचालक मंडळाने वारंवार सूचना करूनही सचिव यांनी अद्याप पावतो संचालक मंडळाने सांगितलेले कोणतेही ठराव प्रोसिडिंग वरती पूर्ण लिहिले नाहीत. तसेच भरपूर ठरावास  संचालकांनी विरोध दर्शवून ही तसे न लिहिता ठरावास बहुमताने मान्यता आहे असे चुकीचे लिहिले. मार्केट कमिटी मध्ये  गैरव्यवहार झाल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी करावी. अशी मागणी करण्यात आली.

हुपरी शहर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने अमली पदार्थ व अवैध धंद्याच्या विरोधात पोलीस निरीक्षक चौखंडे यांना निवेदन

इमेज
हुपरी प्रतिनिधी - हुपरी येथे अवैध धंद्याच्या वाढत्या प्रमाणामुळे युवक पिढी व कॉलेज वयाची मुले बरबाद होताना दिसत आहेत. पालक ही मुलाखत समोर हतबल होताना पाहून यामध्ये गॅंगवॉर सारखे मोठे प्रकरण होण्याची शक्यता असल्याने  हुपरीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून गांजा दारू अमली पदार्थ यासारख्या प्रमाणामध्ये वाढ होऊन वाद-विवाद पासून ते सावकारकी पर्यत या अमली पदार्थापासून त्याच्या सेवनाने मुलींची छेड काढणे,गँगवार करणे  असे अनेक प्रकरण हुपरी मध्ये होत आहेत हुपरी हे चांदी उद्योगासाठी प्रसिद्ध असताना हुपरीच्या नावाला डाग लागण्याचे काम होत असून  यावर पोलिसांनी तात्काळ आळा घालणे गरजेचे असून  गांजा व अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करावी व  हा कुठून उपलब्ध होतो त्याची पायामुळे खोदून काढावे असे आशयाचे निवेदन  शिवसेना पक्षाच्या वतीने आज हुपरी पोलीस स्टेशनचे पीआय चौखंडे साहेब यांना देण्यात आले. यावेळी विभाग प्रमुख अमोल देशपांडे, शहरप्रमुख विनायक विभुते, शहर संघटक सुहास माने, मा.शहरप्रमुख रघुनाथ नलवडे बापू,महीला आघाडी शहर प्रमुख मिना जाधव, संभ...

जिंतूर तालुक्यातील अकोली जवळील पुलावरून बस कोसळली. विस प्रवाशी गंभीर जखमी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  जिंतूर : ता.20 जिंतूर  ते सोलापूर ही राज्य परिवहन महामंडळाची बस बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अकोली जवळील पुलावरून खाली कोसळल्याने बस मधील सुमारे 18 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.जिंतूर आगाराची ही बस सोलापूर कडे निघाली होती,वळणावरील अरुंद पुलावर बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस 50 फूट खाली नदी पात्रात कोसळली. प्रत्यक्ष दर्शनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बसमधील प्रवाशांना कसबशी बाहेर काढले. या अपघातात 18 ते 20 प्रवासी जखमी झाले. या जखमींना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालया त उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी धावून गेले आहेत. अकोली येथील या वळणावर यापूर्वी अनेकदा अपघात घडले आहेत.

हुपरी विभाग प्रमुख पदी अमोल देशपांडे, हुपरी शहर प्रमुख पदी विनायक विभुते,हुपरी शहर संघटक पदी सुहास माने यांची निवड.

इमेज
पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने व कोल्हापूर संपर्क प्रमुख अरूणभाई दूधवडकर यांच्या संमतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या * हुपरी विभाग प्रमुख पदी अमोल देशपांडे, हुपरी शहर प्रमुख पदी विनायक विभुते,हुपरी शहर संघटक पदी सुहास माने, * यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी कोल्हापूर येथे * संपर्क प्रमुख अरूणभाई दूधवडकर यांच्या हस्ते व मा.आमदार डॉ सुजित मिणचेकर व कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय चौगुले * यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख अभिजित पाटील, जिल्हा प्रमुख सुनील शित्रे, युवासेना जिल्हाधिकरी स्वप्नील मगदूम,संभाजी हांडे,संजय चौगुले, उपशहर प्रमुख संदीप भंडारी,संजय पाटील, वैभव लायकर, दादासो कमते, व शिवसैनिक यांच्या उपस्थित देण्यात आले.

आजी-आजोबांनी दिली परिक्षा.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  दैठणा येथे नवभारत साक्षरता कार्यक्रम.65 आजी आजोबा नी घेतला सहभाग. परभणी :दि.18 मार्च परभणी तालुक्यातील दैठणा येथील केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेत केंद्र सरकारच्या उल्लास नव साक्षरता कार्यक्रमांतर्गत 65 परिक्षार्थी आजी- आजोबांनी उत्स्फूर्त पणे, नवचैतन्याने पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानावर आधारित चाचणी परिक्षा देवून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.दैठणा येथील केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेत केंद्र सरकारच्या उल्लास नवभारत साक्षरता अभियानात 65 आजी-आजोबांनी नियमितपणे हजेरी लावून अभ्यासक्रम पूर्ण केला. पाठोपाठ या अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी परिक्षेत हे आजी- आजोबा मोठ्या उत्स्फूर्तपणे परिक्षार्थी म्हणून सहभागी झाले. अन् या आजी- आजोबांनी वयोमाना सह प्रकृतीवर मात करीत मोठ्या उत्साहाने केंद्रावर दाखल होवून उत्तमरीत्या परिक्षा दिली.या केंद्राचे मुख्याध्यापक राजेंद्र ससाने यांच्यासह सहशिक्षक खयूम, फाळके यांनी परिक्षेचे उत्तम असे नियोजन केले. त्यामुळे अत्यंत नियोजनबद्ध व तेवढ्याच शिस्तबध्द वातावरणामध्ये ही परीक्षा...

लोकसभा निवडणुकी आधी मराठा समाज आक्रमक.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  गावागावात पोस्टर्स अन् नेत्यांसह समर्थकांना घरबंदी. परभणी : परभणी सह संपूर्ण जिल्हात पोस्टर्स लावत मराठा बाधंवांनी राजकीय नेत्यांना घरबंदी केली आहे. तसेच नेत्यांविरोधात घोषणाही देण्यात येत आहेत.मराठा समाज आक्रमक नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घरबंदी पोस्टर्स दाखवत मराठा समाज आपला रोष प्रगट करीत आहे. सर्वपक्षीय नेते झाले बहिरे, आमची मागणी सगेसोयरे अशा घोषणा देत लिमला तालुका पूर्णा येथील मराठा बांधवांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घरबंदी अशा आशयाचे पोस्टर्स दाखवत घोषणाबाजी केली. यावेळी परिसरामधील ३०-३५ गावातील तरुणांना पोस्टर्स वाटप करण्यात आले. आता हे पोस्टर्स गाव गावाच्या दरवाजा वर प्रथम दर्शी भागावर लावण्यात येणार आहेत. त्यामुळे एकीकडे लोकसभेचा निवडणूक प्रचार सुरू होत असतानाच दुसरीकडे मात्र मराठा बांधव गावोगावी या नेत्यांची नाकाबंदी करताना दिसत आहे.  मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे, सगेसोयरेचा अध्यादेश तात्काळ लागू करावा, या मागणीसाठी मागील काही महिन्यां पासून मरा...

लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रशासन अलर्ट.

इमेज
चिकोडी : काशिनाथ सुळकुडे, लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रशासन अलर्ट झाले आहे.  चिकोडी लोकसभा मतदारसंघात 17 लाख 41 हजार 758 मतदार असून 1896 मतदान केंद्र आहेत. चिकोडी लोकसभा व्याप्तीत 32 चेकपोस्ट उभारणी करून तपासणी केली जात आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत 8 विधानसभा मतदारसंघ येत असून 17 लाख 41 हजार 758 एकूण मतदार आहेत. यात 8 लाख 75 हजार 953 पुरूष मतदार तर 8 लाख 65 हजार 731 महिला मतदार व 74 तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे. अ. क्र.*विधानसभा मतदारसंघ*पुरुष*महिला*तृतीयपंथी*एकूण 1.निपाणी*116320*116178*7*232505. 2.चिकोडी-सदलगा*114894*115390*13*230297. 3.अथणी*119944*116471*4*236419. 4.कागवाड*102784*100514*7*203305. 5.कुडची*102699*98683*16*201398. 6.रायबाग*111250*107034*9*218293. 7.हुक्केरी*105637*107001*9*212647. 8.यमकनमरडी*102425*104460*9*206894. एकूण  पुरुष 875953, महिला 865731, तृतीयपंथी 74, एकूण 1741758.. चिकोडी लोकसभा मतदारसंघात 24 हजार 27 अपंग मतदार 21 हजार 320 इतके 85 वर्षांच्या वरील वयोगटातील मतदार आहेत. 50 हजार 589 इतके  सर्वाधिक युवा मतदार आह...

शुभंकरोती फाउंडेशन व देसाई फाउंडेशन यांचा यशवंत विद्यालय सेलू येथे बाल आरोग्य मेळावा संपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे  जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : दि. 18 मार्च रोजी यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ सेलू संचलित यशवंत प्राथमिक शाळा व यशवंत विद्यालय सेलू येथे शुभंकरोती फाउंडेशन व देसाई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय बाल आरोग्य मेळावा घेण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मुकेश हरिभाऊ काका बोराडे, शुभंकरोती फाउंडेशनचे अध्यक्ष किरण चौधरी,निशिगंध पाटील सर, यशवंत प्राथमिक व माध्यमिक चे मुख्याध्यापक रामप्रसाद गोरे व रतन थटवले सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली.शुभम करोति फाउंडेशनचे अध्यक्ष किरण चौधरी यांनी सर्व वर्गाची वर्ग सजावट करून शैक्षणिक वातावरण तयार केले व आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यां मध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक,सामाजिक, शारीरिक व मानसिक सृजनात्मक विकास होण्यासाठी आमची संस्था मराठवाड्यात काम करत आहे.अशी माहिती दिली. शिबिरा मध्ये प्रशालेतील वर्ग पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रत्येक वर्गात विविध शैक्षणिक उपक्रम व खेळ घेण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मुकेश हरिभाऊ काका बोराडे यांनी शुभम करोती फाउंडे...

देऊळगाव गात ते खवणे पिंपरी रोडचे भूमिपूजन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : जिंतुर सेलू तालुक्याच्या आमदार सौ. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या विशेष प्रयत्नातून आज देऊळगाव (गात) ते खवणे पिंपरी पर्यंत 8 (आठ) किलोमीटर रोड साठी "मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या" माध्यमातून  रोड साठी 5 कोटि 21 लक्ष असा निधी उपलब्ध करुण देण्यात आला.आज दी.16 मार्च रोजी सकाळी रोडच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी खवने पिम्प्री,देऊळगाव  (गात), राधे धामणगाव येथील भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष दत्तराव कदम,तात्यासाहेब चव्हाण, कपिल फुलारी, नागेश ठाकूर, यादवराव खरात, ज्ञानोबा लोखंडे ,वशिष्ठ चव्हाण ,बळीराम चव्हाण, गजानन चव्हाण, समाधान घोडे, चंदू शिंदे, अशोक मुळे, प्रल्हादराव गोरे ,दत्तराव जाधव, रोहिदास हिरवे, दत्ता आबा कदम, बाबासाहेब शेलार, लक्ष्मण अनभुले, आदिनाथ हराळे आदी जण उपस्थित होते.

युवा नेते सुधाकर रोकडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सेलू तालुकाध्यक्ष पदी निवड.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : सेलू तालूक्यातील हातनूर या गावचे निष्ठावंत युवा कार्यकर्ते सुधाकर रोकडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. परभणी येथील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे व मान्यवरांच्या  उपस्थितीत निवड झाल्याचे पत्र देण्यात आले.पत्रात नमूद केले आहे की,आपली पक्षाच्यावतीने सेलू तालूका अध्यक्ष पदी निवड करण्यात येत असून पक्ष प्रमुख शरद पवार  यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करून पक्षाला बाळकटी देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेले पक्षाचे कार्यक्रम  व ध्येय धोरणांची अंमलबजावणी करावी.सुधाकर रोकडे  हे माजी आमदार विजय भांबळे यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी यापूर्वी युवक कार्याध्यक्ष, तालूका कार्याध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य  या पदावर कार्य केले असून त्यांची तालुकाध्यक्षपदी  निवड झाली आहे. या निवडीचे सर्वस्तारातून स्वागत होत आहे.

लोकसभेला प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त मत कसे वाढतील असा संकल्प करा- माजी आ.बोर्डीकर.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : परभणी लोकसभेला प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त   मत कसे वाढतील असा संकल्प कार्यकर्त्यांनी केला पाहिजे आणि असे झाले तर परभणी लोकसभा निकालात इतिहास घडेल असे प्रतिपादन माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी शुक्रवार दि 15 मार्च रोजी सेलू तालूका महायुती मेळाव्या प्रसंगी केले. पुढे बोलतांना बोर्डीकर म्हणाले की, इराण हमास युद्धात आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी मध्यस्ती केल्या मुळे त्यांचा व्हाईट हाऊस मध्ये सत्कार झाला. या मुळे महायुतीचा उमेदवार कोणताही असो आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व करण्यासाठी आपल्या भागातून उमेदवार निवडून दिला पाहिजे. नेत्यांच्या विचाराप्रमाणे काम करावे. माझ्यावर प्रमुख  या नात्याने लोकसभा मतदार संघाची जबाबदारी भारतीय जनता पार्टीने सोपवलेली आहे. आपण सर्वांनी एक दिलाने काम करून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी आपले कर्तव्य आहे. त्यासाठी सर्व बूथ प्रमुखांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प...

अवाजवी दरवाढीने सेलूत व्यापारी संतप्तजिल्हा प्रशासनास निवेदन सादर.

इमेज
शिवाजी शिंदे  जिल्हा प्रतिनिधी परभणी.   300 टक्के भाडेवाढ. सेलू : दि.14 माजी आमदार रामप्रसाद  बोर्डीकर यांच्या नेतृत्वात सेलू येथील व्यापाऱ्यांनी परभणी जिल्हाधिकारी  श्री. गावंडे यांना गुरुवारी (१४) रोजी निवेदन सादर केले. सदरील निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,सेलू  नगर पालिकेंतर्गत गाळ्यांचे व मोकळ्या जागांच्या भाडे निश्‍चिततेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनास सादर करतेवेळी पालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर म्हणजे 200 ते 300 टक्के भाडेवाढ केल्याने सेलूतील व्यापारी कमालीचे संतप्त झाले आहेत.सेलू नगर पालिकेने स्वतःच्या मालकीच्या अंदाजे एकूण 975 गाळ्यांचे व मोकळ्या जागांचे भाडे निश्‍चित करुन अधिमूल्य ठरविण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. ते करतेवेळी गाळ्यांचे आणि मोकळ्या जागेचे अवाजवी भाडे निश्‍चित करुन मोठ्या प्रमाणावर म्हणजे 200 ते 300 टक्के भाडेवाढ व प्रत्येक गाळे व मोकळी जागाधारकांना आव्वाच्या सव्वा दराने लाखो रुपयांचा अधिमूल्य ठरविण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणावर भूर्दंड सामान्य नागरीक आणि व्यापारी वर्गाला बस...

अपंग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठान महाराष्ट्र लातूर या सेवाभावी संस्थेच्या पाठपुराव्याला मोठे यश.

इमेज
लातूर वृत्तसेवा - अपंग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठान महाराष्ट्र लातूर या सेवाभावी संस्थेच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले. अखेर ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिला तसेच परी तक्ता महिला यांच्या संजय गांधी निराधार योजनेच्या पगारीचे पगार पत्रक मंजुरीचे वाटप. सरपंच साहेब व ग्रामविकास अधिकारी साहेब तसेच तलाठी साहेब यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. निसार सर यांचा देखील गावकरी तसेच ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने आभार प्रदर्शन करण्यात आले.

तीन वर्षाच्या चिमुकली ने ठेवला आपल्या जीवनाचा पहिला रोजा.

इमेज
शिवाजी शिंदे  जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू :-अवघं वय 3 वर्षाचं, तरी ती गुरुवारी पहाटे 5.11मिनिटांनी  उठली व सहेर केली , दिवस भर तिने भक्तीभावाने नमाज अदा केला आणि साय.6.38 मिनटांपर्यंत तिने ना अन्न मागितले ना पाणी. तब्बल बारा तासांहून अधिक काळ तिने निर्जली रोजा ठेवला आणि मग   इफ्तार केला. इतक्या छोट्या वयात रुमेसा साबेर शेख रा. विद्यानगर  सेलू येथील राहिवशी आहेत हिने ठेवलेल्या या रोजाचे सर्वत्र कौतुक होत आहे.मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू असून, आज दोन (उपवास) पूर्ण झाले आहेत. यंदा रमजान ऐन उन्हाळ्यात आल्यामुळे रखरखत्या उन्हात पाण्याचा थेंबही न पिता जवळपास 12 ते 13 तास राहण्याची शक्तीच जणू देव या दिवसांमध्ये देत असल्याची भावना रोजा करणाऱ्यांमध्ये असते. त्यातून त्यांचा रोजा पूर्ण होतो. सेलू परिसरातील रुमेसा ने रोजा ठेवला आणि संपूर्ण 12 तास निर्जली राहिली, त्यामुळे तिचे कौतुक होत आहे. रमजानचा महिना मुस्लिम धर्मियांसाठी सर्वात पवित्र असतो. या पवित्र महिन्याची सुरुवात चंद्राच्या दर्शनाने होते.रमजान चा महिना कधी 29 दिवसांचा असतो तर कधी 3...

सेलू कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने तहसीलदारांना निवेदन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू- 'कोचिंग सेंटर नियमन मसुदा' मधील मार्गदर्शक सूचना मसुद्यातील निर्माण झालेल्या विविध समस्या विचारात घेऊन कायदा करण्यात यावा यासाठी सेलू कोचिंग क्लासेस असोसिएशन च्यावतीने तहसीलदार दिनेश झांपले यांना  निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाने दि. १६/०१/२०२४ रोजी वितरीत केलेल्या 'कोचिंग सेंटर नियमन मसूदा मधील मार्गदर्शक सूचना मसुद्यात १६ वर्षा खालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश देण्यात येऊ नये ही सूचना शिथिल करण्यात यावी. शाळेतील  शिक्षकां बरोबरच कोचिंग क्लासेस मधील शिक्षकदेखील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया पक्का करण्याचे काम करतात. सोळा वर्षे वयोगटाध्येच विद्यार्थ्यांच्या पायाभूत गोष्टी परिपूर्ण होणे आवश्यक असतात. सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग बंद ही केंद्र सरकारच्या कायद्यातील मसुद्यात जी तरतूद ती रद्द करण्यात यावी.कोचिंग क्लासेस व्यवसायावर खाजगी शिक्षकांची उपजिवीका आहे.तरी केंद्र आणि राज्य सरकारने सदर  मसुद्याची अंमलबजावणी करताना या '16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग बंद' ही सूचना रद्द करावी. ...

खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि युवा नेते उत्तम पाटील यांच्या इफको खत कंपनीच्या निवडणुकीतील पॅनलला प्रचंड बहुमताचा कौल.सदलगा शहरातील सदलगा पश्चिम भाग व्ही पी जी के एस संस्थेचे अध्यक्ष श्री अरुणकुमार देसाई यांना प्रतिनिधित्व.

इमेज
सदलगा प्रतिनिधी आण्णासाहेब कदम. सदलगा शहरातील सदलगा पश्चिम भाग व्ही पी जी के एस संस्थेचे अध्यक्ष श्री अरुणकुमार देसाई यांना प्रतिनिधित्व. नवी दिल्ली येथील रासायनिक खत तयार करणाऱ्या इफको कंपनीच्या हुबळी विभागाची नुकतीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. या हुबळी विभागाच्या प्रतिनिधी निवडणुकीत चिकोडीचे विद्यमान खासदार सन्माननीय अण्णासाहेब जोल्ले आणि युवा नेते उत्तम अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने 18 पैकी 16 जागा जिंकून प्रचंड बहुमताने विजय संपादन केला. या निवडणुकीत उतर कन्नड, दावणगिरी, हावेरी, हुबळी- धारवाड, विजयपूर ,बागलकोट, बेळगावी या जिल्ह्यांचा समावेश होता. या सर्व जिल्ह्यातील एकूण 64 मतदारांनी  आपला मतदानाचा हक्क बजावला आणि जोल्ले पाटील पॅनलला 18 पैकी 16 जागांवर विजय मिळविला. विजय उमेदवारामध्ये अण्णासाहेब जोल्ले ,उत्तम अण्णा पाटील, अरुण देसाई, बाळासाहेब आरगे, मल्लाप्पा नींगजनावर, मुर्गेश माळगी, रामचंद्र हेगडे, रमेश भिवसे, रवींद्र हेगडे, सचिन केस्ते, संजय चौगुले, शिवलिंगप्पा पाटील, श्रीशैल पाडेदार, सिद्धनगवडा पाटील, सुभाष चौगुला ,अण्णासाहे...

कै. आक्काताई यशवंत पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील." कै. आक्काताई यशवंत पाटील मृत्युः रविवार दि.१०/०३/२०२४ रक्षाविसर्जनः सोमवार दि.११/०३/२०२४ रोजी सकाळी ९ वाजता ... शोकाकुलः पाटील परिवार, रामनगर, मौजे सांगाव....

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज टाकवडे येथे विविध पदांच्या नियुत्या.

इमेज
टाकवडे प्रतिनिधी संजय पाटील. -  आज दिनांक 10/03 /2024 रोजी टाकवडे येथील भारतीय जनता पार्टीच्या सर्व सेलच्या नियुक्त्या करण्यात आल्या. भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष माननीय मुकुंद गावडे यांच्या हस्ते पत्र वाटप करून हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे दिव्यांगा गाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांच्या घरी पार पडला. या कार्यक्रमावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते पोपट.पुजारी , अबुद्दीन मुजावर, महेश देवताळे, महावीर तकडे, यांच्या उपस्थितीमध्ये आज नियुक्तीचे पत्र देऊन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आले. यामध्ये टाकवडे शहराध्यक्ष. सचिन नलवडे यांची निवड करण्यात आली. तसेच युवा मोर्चासाठी महेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली, किसान मोर्चा पदासाठी राजाराम घोरपडे, ओबीसी सेल साठी तुषाल बगाडे यांच्या नियुक्ती करून त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी भारतीय जनता पार्टीचे टाकवडे येथील सर्व सदस्य बूथ प्रमुख, वॉरियर्स, सुरेश वडर, महादेव कोळी, बाळासो कदम, किशोर कांबळे, चंद्रकांत दोडणावर, गिरीश पाटील, श्रीधर पाटील वकील साहेब, गजानन पाटील तसेच भागातील बरेच...

यड्राव येथील शामराव पाटील यड्रावकर हायस्कूलमध्ये महिला दिन उत्साहात साजरा .

इमेज
यड्राव (प्रतिनिधी )  :येथील शामराव पाटील यड्रावकर  हायस्कूलमध्ये महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कर्तुत्वान महिला महिलांचा सत्कार विविध स्पर्धा व प्रबोधन असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व योग्य नियोजनामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी जयसिंगपूरच्या माजी नगरसेवक माधुरी चौगुले होत्या.      कार्यक्रमाचा शुभारंभ सवितादेवी नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी  कॅन्सरग्रस्तांना सहकार्य व प्रबोधन करणाऱ्या सुदर्शना पाटील, सरकारी वकील पदी निवड झालेल्या अमृता साने- मीरजे ,तसेच शाहिस्ता सुतार यांचे महिला पोलीस पदी निवड झाल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला.      यानिमित्त घेण्यात आलेल्या महिलांच्या ग्रुप डान्स स्पर्धेत निर्भया ग्रुप, मंगळागौर ग्रुप, व जय हो ग्रुप यांचा अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आला. त्यांना रोख पाच हजार तीन हजार व दोन हजार रोख रकमेसह सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थिनीं...

महाराष्ट्र बांधकाम कामगार सघटनेच्या वतीने महिला दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप

इमेज
पट्टणकोडोली प्रतिनिधी - महेश कोळी. महाराष्ट्र बांधकाम कामगार असंघटित श्रमिक संघटना. यांच्याकडून महिला दिनानिमित्त कुमार विद्यामंदिर. गोरवाड व उर्दू विद्यामंदिर गोरवाड या शाळेतील मुलांना फळे वाटप व शालेय साहित्य वाटप संघटनेमार्फत करण्यात आला. या दोन्ही शाळेतील अडीचशे मुलांना वही पेन. व अति गरजू मुलांना दप्तर असे शिक्षण साहित्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव जामकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सर्व  पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव जामकर. जिल्हा सचिव बच्चन कांबळे. शिरोळ तालुका अध्यक्ष कुदरत जमादार. शिरोळ तालुका सचिव मच्छिंद्र कांबळे. शारदा कोरे .कोमल जामकर. नेहा कांबळे. तानाजी साळुंखे. सामाजिक कार्यकर्ते आकाश कुरणे. सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पनदे. श्रीकांत कोरे. प्रज्वल कांबळे. महबूब जमादार. श्रीधर जामकर. आधी सर्व पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

श्री साईबाबा मंदिर संस्थानच्या वतीने महाशिवरात्र महोत्सवानिमित्त लाखो भाविकांनी घेतला रुद्राक्ष व महाप्रसादाचा लाभ.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : दि.8 फेब्रु. सेलू  महेश नगर येथील श्री साईबाबा मंदिर संस्थानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्र महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. आज सकाळी 06 वाजल्यापासून महेश्वर शिवलिंगावर भारतातील प्रमुख नद्या  व तीर्थक्षेत्र येथील जलाचा  अभिषेक  करण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून  एक लोटा जल अर्पण  करून भाविकास प्रसाद व रुद्राक्ष वाटप करण्यात आले,या वेळी भरपूर भाविकांनी  याचा लाभ घेतला. तसेच आज सायंकाळी 6 वा.शिवलिंगाची महाआरती आयोजित करण्यात आली होती या महाआरतीला सुद्धा शेकडो भाविक उपस्थित राहून आरतीची  शोभा वाढविली या बद्धल   श्री साईबाबा मंदिर संस्थान महेश नगर सेलूच्या कमिटीचे अध्यक्ष तथा विनोद बोराडे यांनी भाविकांचे आभार व्यक्त केले. भारतातील सर्व प्रमुख नंद्या,बारा ज्योतिर्लिंग व तिर्थ क्षेत्रातील पाण्याने महेश्वर शिवलिंगाचा अभिषेक(एक लोटा जल) अपर्ण करून पुण्यार्जन करण्यात आले. त्यानंतर सर्व भाविकांना हरिद्वार येथून सिद्ध केलेल...