पोस्ट्स

जवान रघुनाथ चिमले यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्य संस्कार.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. हजारोंचा जनसमुदाय ठिक ठिकाणी अंत्यदर्शनाकरीता प्रचंड गर्दी. पालम : दि.03 भारतीय सीमा सुरक्षा दलातील जवान रघुनाथ मोतीराम चिमले यांच्या पार्थीवावर मंगळवारी दुपारी पालम तालुक्यातील सिरपूर या गावी हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणात, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्रिपुरा राज्या तील आगरतळा येथून सोमवारी सायंकाळी 7 वाजता चिमले यांचे पार्थीव विमानाद्वारे हैद्राबादकडे रवाना करण्यात आला. लातूर कॅम्पमधील लष्करी अधिकारी व जवानाच्या पथकाने चिमले यांचे पार्थीव ताब्यात घेवून मंगळवारी दुपारी पालममार्गे सिरपूर गाठले तेव्हा गंगाखेड ते पालम या राज्य मार्गावर ठिकठिकाणी हजारोंच्या जन समुदायाने पार्थीवावर पुष्पवृष्टी तसेच भारत माता की जय, वंदे मातरम् असा जयघोष करीत चिमले यांच्या पार्थीवाचे अंत्यदर्शन घेतले. सिरपूर या गावी पार्थीव दाखल झाल्याबरोबर कुटूंबियां सह ग्रामस्थांच्या भावना अनावर झाल्या. चिमले यांच्या घरापासून अंत्ययात्रा निघाल्यानंतर हजारो ग्रामस्थ त्यात सहभागी झाले. ठिकठिकाणी भारतमातेचा जय घोषाने आकाशही दुमदुमले.दुपारी उशीरा ...

बोर्डीकरांचा लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरु.सोनपेठात आढावा बैठक : घटक पक्षांबरोबरसुध्दा गुफ्तगू.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.     परभणी : दि.03 भारतीय  जनता पार्टीचे लोकसभा निवडणूक प्रमुख या नात्यातून ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी परभणी लोकसभा मतदार संघाचा दौरा सुरु केला आहे.गेल्या काही महिन्यांपूर्वीच बोर्डीकर यांची परभणी लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हाच या जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातील जाणकारांच्या भूवया उंचावल्या. काही प्रतिक्रिया सुध्दा उमटल्या. परंतु, बोर्डीकर यांनी या नियुक्तीसह आगामी लोकसभा निवडणूकी संदर्भात ओळीनेसुध्दा प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. परंतु, रविवारी लोकसभा निवडणूक प्रमुख या नात्याने मतदारसंघाचा दौरा सुरु केला. त्यासाठी बोर्डीकर यांनी सोनपेठ तालुक्यास प्रथम प्राधान्य दिले. त्याप्रमाणे ते रविवारी सोनपेठात दाखल झाल्या बरोबर त्यांचे बालाजी मंदिर संस्थान च्या सभागृहात स्थानिक  व जिल्ह्यातील नेते मंडळींनी जोरदार स्वागत केले.विशेषतः माजी आमदार मोहन फड, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, ज्येष्ठ नेते रमाकांतराव जहागिरदार, विलास बाबर, भागवतराव बाजगीर, उध्दवराव नाईक, सुरेश भुमरे, रंगनाथ सोळं...

नूतन कन्या प्रशालेची जनजागरण फेरी

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी  परभणी. सेलू :राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि स्वच्छ भारत अभियान 2023 अंतर्गत 1 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या  स्वच्छता संकल्प अभियानाचे   औचित्य साधून श्रीमती ल. ला. रा. नूतन कन्या प्रशालेच्या वतीने स्वच्छता जनजागरण फेरीचे आयोजन करण्यात आले होते. एक तारीख एक तास स्वच्छता हाच ध्यास या स्वच्छता जनजागरण फेरीत नूतन वि. शि. सं. चे अध्यक्ष डॉ.सत्य नारायणजी लोया, संस्था सचिव प्राचार्य डॉ. विनायक कोठेकर, नगरपरिषद सेलूचे  मुख्याधिकारी देविदास जाधव, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, शिवनारायन मालाणी, महिला मंडळ अध्यक्षा विजया कोठेकर,सचिव  ललिता गिल्डा, सुयश पटवारी, रामवल्लभ राठी, शेख मुनीर, केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, श्याम पटवारी,दिलीप भंडारी, शिकारे, अशोक कासार, सूर्यवंशी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता खराबे, उपमुख्याध्यापक  दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, भालचंद्र गांजापूरकर यांची उपस्थिती होती. स्वच्छता जनजागरण फेरीची सुरवात राष्ट्रपिता म. गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण ...

ब्रह्माकुमारींचा समर्पण सोहळा सेलूमध्ये उत्साहात.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. बहारदार नृत्यांनी भरली रंगत.  सेलू  : ब्रह्माकुमारी रचना बहेन‌, परभणी आणि ब्रह्माकुमारी राधा बहेन, सेलू यांनी संपूर्ण जीवन ईश्वरीय कार्यासाठी समर्पित केले. यानिमित्ताने परभणी जिल्ह्यातील सेलू येथे रविवारी, एक ऑक्टोबर रोजी आयोजित ईश्वरीय समर्पणाचा आनंद सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सेलू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने श्री साई नाट्य मंदिरात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, डॉ.शिवदासभाई शिंदे, पांडुरंगभाई,शारदामाता, पंढरीनाथभाई अरुणामाता, कौशल्या बोराडे, विजया बोराडे, उर्मिला बोराडे, ब्रह्माकुमारी अर्चना बहेन, सविता बहेन, अनिता बहेन, योगिता बहेन, रंजना बहेन, सीमा बहेन, वैशाली बहेन आदींची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ब्रह्माकुमारी रचना आणि राधा बहेन यांनी शिवपिंडीला पुष्पहार अर्पण करुन समर्पित जीवनाच्या प्रवासातील भावानुभव व्यक्त केले. अर्चना बहेन, कौशल्या बोराडे, विनोद बोराडे आदींसह मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त क...

मलिकवाड येथे स्वच्छता अभियान.,ग्रामपंचायत, संजीवनी वकुट, सरकारी शाळेत उपक्रम

इमेज
मलिकवाड प्रतिनिधी - अमर माने, मलिकवाड येथे केंद्रीय गृहनिर्माण व शहर व्यवहार मंत्रालय रविवारी (ता.01) रोजी संपूर्ण देशभरात स्वच्छता अभियान ग्रामपंचायत, संजीवनी वकुट, सरकारी मराठी, कन्नड शाळेंनी हा उपक्रम राबविण्यात आला. या स्वच्छता मोहीमेला ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी नऊ वाजता प्रारंभ झाला. राष्ट्रव्यापी मोहीम व महात्मा गांधीजी जयंतीनिमित्त या स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. ग्राम पंचायतिच्या पठांगणात ग्राम पंचायत अधिकारी, कर्मचारी, संजीवनी वकुट, अंगणवाडी, आशा कार्यकर्त्यां कर्मचारी एकत्रित जमले. त्यांनतर प्रत्येक जण हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता अभियानाला प्रारंभ केला. गावातील असलेल्या मुख्य मार्गावरुन  गणपती मंदिर, लक्ष्मी मंदिर, रेणुका मंदिर चक्री लाईन मार्गे शेवटी विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत दोन तासाहून अधिक या स्वच्छता मोहीमेची सांगता करण्यात आली. यावेळी गोळा केलेला कचरा घंटा गाडीत एकत्रित करण्यात आला. यावेळी सरकारी मराठी, कन्नड शाळेच्या आवारात झाडे लावण्यात आली. यावेळी फलक लावून स्वच्छता मोहीमेची जणजागृती करण्यात आले. या...

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू :दि. 2 ऑक्टो. रोजी जगाला सत्य,अहिंसा,आणी सहिष्णूता यांची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न  सेलू तालुका पत्रकार असोशियन च्या वतीने शहरातील मोंढा भागातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास  अध्यक्ष लक्ष्मण बागल, सचिव शेख मोहसिन,जेष्ठ पत्रकार तथा मार्गदर्शक कांचनजी  कोरडे,सदस्य नारायण पाटील,श्रीपाद कुलकर्णी,शिवाजी शिंदे,नीरज लोया,सचिन आकात,शेख मुनीर, संदीप वरकड  आदी नी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

"जगा आणि जगू द्या"संदेश मानवजातीला अमृत समान ; आचार्य श्री कुलरत्नभूषण मुनी महाराज

इमेज
बोरगाव येथे 108 भव्यरथोत्सव; विविध मान्यवरांची उपस्थिती बोरगांव प्रतिनिधी  जैन धर्मातील मुनी त्यागींचे तत्वे ,आदर्श जगाच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहेत. आपल्या हृदयाचा साधेपणा हाच धर्म आहे. तीर्थकारांनी जन्मलेल्या हा देश संपूर्ण विश्वाला आदर्श आहे. सत्य ,न्याय ,अहिंसा, त्याग,संयम अशा पाच रत्नत्रयाच्या माध्यमातून जैन मुनिनी संपूर्ण जगाला जगा आणि जगू द्या हा संदेश दिला. हा संदेश मानवजातीला अमृत समान असल्याचे मत श्री आचार्य श्री 108 कुलरत्न भूषण महाराजांनी व्यक्त केले. बोरगाव येथे मुनीश्री 108 कुलरत्न भूषण महाराज यांच्या पावन वर्षायोग निमित्त आयोजित दशलक्षणा पर्व या अनुषंगाने भव्य 108 रथोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर खासदार अण्णासाहेब जोल्ले,आमदार गणेश हुक्केरी ,आमदार शशिकला जोल्ले ,माजी खासदार राजू शेट्टी ,माजी आम.काकासाहेब पाटील ,माजी मंत्री वीरकुमार पाटील, हालसिद्धनाथ कारखान्याचे अध्यक्ष एम. पी .पाटील उपाध्यक्ष पवन पाटील , मा .जि.प .सदस्य अण्णासाहेब हावले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी...

एक तास : महाश्रमदान न.प.सोबत विविध सामाजिक संघटनाचा स्वच्छता मोहीम या उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू:- सेलू येथील नगरपरिषद, श्रीराम प्रतिष्ठान, व आर्ट ऑफ लिव्हिंग सेलू यांच्या संयूक्त विद्यमाने तिसरा स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत “'एक तारीख- एक तास महाश्रमदान स्वच्छता मोहीम    (ता.१) वार रविवार रोजी बसस्थानक परिसरात  करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष तथा सेलू कृ.उ.बाजार समितीचे संचालक डॉ संजय रोडगे ,प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष विनोदरावजी बोराडे, सेलू कृ.उ.बाजार समितीचे संचालक तथा बीजेपी तालुकाध्यक्ष अँड. दत्ताराव कदम,  न.प.चे मुख्याधिकारी देविदास जाधव,माजी उप नगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, बीजेपी ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष जयसिंग शेळके, प्रफुल बिनायके,अशोक पटवारी  आर्ट ऑफ लिव्हीगचे जिल्हा समन्वयक किशोर घडे, साधक कैलास कदम, रामा वैद्य, प्रकाश चेचीडीया, संतोष शर्मा, अनुज गुप्ता, रुचीका गुप्ता, स्वप्निता ढवळे आदी साधक आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. स्वच्छतेसाठी 'एक तारीख, एक तास' या रविवारी १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोदवावा. '...

जिल्ह्यात ‘एक तास एक साथ’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
कोल्हापूर, दि. 1  जिल्हाधिकारी कार्यालय, नगर परिषद प्रशासन शाखा, कोल्हापूर  तसेच जिल्ह्यातील नागरी भागात ‘एक तास एक साथ स्वच्छता’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला असून  नागरिकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 'स्वच्छता ही सेवा 2023' अंतर्गत दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 'स्वच्छता पंधरवडा' हा उपक्रम शहरी भागात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून जयंतीच्या एक दिवस आधी म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता 'एक तास एक साथ' हा श्रमदानाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. उपक्रमामध्ये वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ, खासदार, आमदार तसेच एनजीओ, शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शाळा, कॉलेज, विविध मंडळे, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जिल्ह्यातील सर्व 13 नगरपरिषद/ नगरपंचायती व 2 महानगरपालिकांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमामध्ये  जिल्ह्यातील शहरी भागातील महत्त्वाची धार्मिक स्थळे, बाजारपेठा, बग...

सदलगा शहरात मोठ्या उत्साहात गांधी जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत "स्वच्छता अभियान "मोठ्या जनसमुदायाच्या सानिध्यात आज संपन्न.

इमेज
आण्णासाहेब कदम सदलगा -  भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 पर्यंत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत "स्वच्छता अभियान" सदलगा येथे सदलगा नगरपालिका सदलगा ,राष्ट्रीय आपदा मोचना बल,( नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्या आणि शहरातील  नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने सदलगा नगरपालिका सदलगा येथील पाणीपुरवठा केंद्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी श्रीयुत अनिल कुमार डेक्कनवर यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा सर्वांना दिली. आणि आपला परिसर आपण स्वच्छ कसा ठेवावा, सुंदर शहर स्वच्छ शहर यावर आपले सविस्तर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सदलगा शहरातील जेष्ठ पत्रकार श्री. अण्णासाहेब कदम यांनी 'एक तास स्वच्छतेसाठी' आणि "स्वच्छता हीच सेवा" या संदेशामार्फत स्वच्छतेचे महत्व विशद केले.  आरोग्यासाठी स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे उदाहरणाद्वारे या वेळेला विशद केले.  याप्रसंगी सदलगा शहराचे प्रभारी मुख्याधिकारी श्रीयुत एल व्ही मधाळे, हेल्थ इन्स्पेक्टर पी बी गर्दाळ, संजीव गुडे ,एम बी गवंडी, क...

गुणवत्तेचा त्रिकोण वरदान ठरणार-शिरिष लोहट.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. मानवत : दि.30 मानवत तालुक्यातील ७१ शाळेत एकाच वेळी त्रैमासिक पालक सभांचे आयोजन करण्यात आले होते. के. प्रा. शा. मानवत येथे सुद्धा करण्यात आले.पालक सभा ही दोन सत्रा मध्ये संपन्न झाली. सभेच्या पहिल्या सत्रास सकाळी ठीक 10:30 वाजता वर्गवार पालकांना बसवून सुरुवात करण्यात आली. पालक सभेची सुरूवात वर्ग पहिली मध्ये शा. व्य. समिती अध्यक्ष  मोहन भाऊ लाड, पत्रकार विलास बारहाते व मुख्याध्या पक  बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केली. वर्ग पहिलीच्या पालकांना रामराव सोळंके सर यांनी मार्गदर्शन केले. या सत्राचे सुत्रसंचलन पानझाडे सर यांनी केले.प्रत्येक वर्गात व  शाळेत चालू असलेले विविध उपक्रम पायाभूत चाचणी व शाळेची स्थिती तसेच पुढील तीन महिन्याचे नियोजन यावर माहिती देण्यात आली व चर्चा करण्यात आली. चहासाठी मध्यंतर करुन लगेचच दुसऱ्या सत्रास सुरूवात करण्यात आली. दुसरे सत्र शा.व्य.स.अध्यक्ष मोहनभाऊ लाड यांच्या अध्यक्षतेखाली व विलास बारहाते, आप्पा नालिंदे यांच्या सह जवळपास चारशे पालकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी उपस्थितीत पालकांना मार्गदर्...

श्रीमती आ. रा. पाटील कन्या महाविद्यालयात बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात संपन्न....

इमेज
इचलकरंजी : कवीसरकार यांचेकडून प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते उद्घाटन तर , गोवा येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रो. डॉ. सोमनाथ कोमरपंत बीजभाषक ....... येथील श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात मराठी, हिंदी, इंग्रजी,आणि IQAC या विभागांच्या वतीने एक दिवसीय बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे. 21 व्या शतकातील मराठी, हिंदी व इंग्रजी साहित्यातील सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ या मुख्य विषयाच्या अनुषंगाने हे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.      या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन  मा. डाॅ. आर. आर. कुंभार , प्राचार्य, विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या हस्ते झाले. सध्या समाजात दलित आणि सवर्ण यांच्यात एक दरी निर्माण झाली आहे. परंतु भाषेचा, साहित्याचा अभ्यास करताना समाजाचा विचार होणे गरजेचे आहे,असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. बीजभाषक म्हणून प्रो.(डॉ.)सोमनाथ कोमरपंत ( माजी मराठी विभाग प्रमुख, गोवा विद्यापीठ, गोवा ) हे उपस्थित होते, त्यांनी आपल्या बीजभाष...

क्रांति चौक ते जवाहर रोडवरील अतिक्रमण कधी हटविणार?

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी - परभणी. सेलू : सेलू शहराची नगररचना तत्कालीन नगराध्यक्ष सेलूचे भाग्यविधाता  दलितमित्र श्रीरामजी भांगडीया अतिशय दूरदृष्टीने आखून शहराला अतिशय सुंदर असे रूप दिले होते. शहरातील रस्ते असो,बाजारपेठ असो कृषी केंद्र असो अतिशय सुंदररीतीने रचना करून वैभव प्राप्त करून दिले होते.परंतु दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत चालली,अनेक खेड्यापाड्यातील लोक सेलू शहरात वास्तव्यांसाठी  येत गेले  त्याच बरोबर लोंकाची गर्दी,भौतिक सुविधा मुळे वाढत चाललेली   वाहनांची रेलचेल यामुळे शहरातील सर्व मुख्य रस्त्यावर होत असलेली गर्दी व त्यात रस्त्यावर होत असलेले अतिक्रमण यामूळे नागरिकांना होणारा त्रास या सर्व बाबी समोर आल्या त्यामुळे नगररचनेत पन्नास साठ वर्षापूर्वी जे रोड होते ते आज पण  तसेच आहेत.क्रांति चौक ते जवाहर रोड हा मुख्य बाजारपेठेचा रस्ता आहे तो पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळापासून जसास तसाच असल्याने या रस्त्यावर प्रचंड रहदारी आहे त्यात रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण म्हणजे कळसच झाला आहे. लोकांना पायी चालत जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावा...

सेवानिवृत्त प्राध्यापक शेख शफी यांचे निधन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. परभणी :दि.30 येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील मराठी विभागाचे माजी प्रमुख सेवानिवृत्त प्राध्यापक शेख शफी यांचे शनिवार दि.30 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12 वा. परभणीतील एका खाजगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 76 वर्षाचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, भाऊ समीर शफी, मुलगा डॉ. समीर शफी, तीन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.          दरम्यान, शनिवारी (दि.30) सायंकाळी 6 वाजता काद्राबाद प्लॉट येथील स्मशानभूमीत त्यांचा दफनविधी होणार आहे. एक विद्यार्थीप्रिय, प्रचंड अभ्यासू, ग्रामीण विद्यार्थी व जिल्ह्यातील साहित्य, सांस्कृतिक चळवळीतील तळमळ असणारा, कलावंताना आधार देवून भक्कम पणे प्रोत्साहन देणारा सच्चा शिक्षक,कलावंत काळाच्या पडद्याआड गेल्याने शोक व्यक्त होत आहे. शिवाजी महाविद्यालयात दीर्घकाळ मराठी विभाग प्रमुख म्हणून कामगिरी बजावणारे प्रा. शेख शफी हे शहरासह जिल्ह्यातील साहित्य, सांस्कृतिक व  नाट्य क्षेत्रात सक्रिय होते. विशेषतः प्रा.शफी यांनी आपले योगदान देवून  ग्रामीण विद्यार्थ्यांना घडवि...

खेळातुनच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभते. जयप्रकाशजी बिहाणी

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. तालुका मैदानी क्रीडा स्पर्धेला 432 खेळाडूं चा उदंड प्रतिसाद. सेलू : सुदृढ शरीरातच सुदृढ मन व  बुद्धी चा विकास होत असतो. मैदानावरील खेळातुन च हे साध्य होऊ शकते त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य प्राप्त करण्यासाठी मैदानी खेळ खेळावे असे आवाहन नूतन शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री जयप्रकाशजी बिहाणी यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालना लय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा धिकारी कार्यालय परभणी, गटशिक्षणा धिकारी कार्यालय पं.स.सेलू व नूतन महाविद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी आयोजित तालुका स्तरीय शालेय मैदानी स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय जातपडताळणी अधिकारी गोरख राठोड, प्राचार्य गणेश सोळंके, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.के. के. कदम,प्रा नागेश कान्हेकर,सतीश नावाडे, तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  गणेश माळवे, सुत्र संचालन सुभाष मोहकरे, तर राजेश राठोड यांनी आभार मानले.प...

सोमवारी मनोज जरांगे यांचे परभणीत आगमन; मराठा आरक्षण.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. उद्या जिंतूर मध्ये जाहीर सभा. परभणी : दि.29 मराठा  समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटलांनी उपोसणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातून एक लढा उभारला असून मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र मिळावे म्हणून ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तब्बल 17 दिवस उपोषण करून राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत आरक्षण दिले नाही तर पुढील दिशा काय असेल यासाठी मराठवाडा दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्त  जालना दौरा संपवून  उद्या परभणी जिल्हा तील जिंतूर शहरात जाहीर सभेचे आयोजन शनिवारी (दि.30) दुपारी 4 वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात  सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या सभेला मराठा समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सरटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी तब्बल 17 दिवस उपोषण केले होते. याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसाचा वेळ मागून घेतला होता, म्हणून उपोषण...

खोतवाडी येथील इसमाची रेल्वे खाली आत्महत्या, या आठवड्यातील रेल्वे खाली आत्महत्येची दुसरी घटना

इमेज
हातकणंगले वृत्तसेवा - खोतवाडी तालुका हातकणंगले येथील इसम शिवराम पुनाराम चौधरी वय  49 वर्षे राहणार हनुमान मंदीर जवळ खोतवाडी याने गुरूवार 28 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी बाराच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली.                                       अधिक माहिती अशी की, शिवराम चौधरी यंत्रमाग कामगार होता. शिवराम गेला महिनाभरापासुन दारू पिऊ लागला होता. गुरुवारी 28 रोजी आपली टुव्हिलर घराजवळ लावून खोतवाडीतून प्राथमिक आरोग्य केंद्र हातकणंगले चालत गेला होता. दवाखान्या जवळच असलेल्या रेल्वे रूळावर दारूच्या नशेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात त्याचे दोन्ही पाय तुटून डोकीला मार बसल्याने गंभीर जखमी झाला. सदर घटनेची माहिती  रेल्वे पोलिसांना मिळताच पोलासांनी घटना स्थळी धाव त्याला उपचारासाठी सिव्हिल हाॅस्पिटल मिरज येथे दाखल केले. मात्र गंभीर जखमी झाल्याने उपचार सुरू असतानाच अखेर गुरूवारी रात्री 11: 00 वाजता त्याचा मृत्यु झाला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.त्याच्या पश...

करजखेडा कॅम्प येथे गणपती विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : सेलू तालुक्या तील करजखेडा कॅम्प येथील सार्वजनिक गणेश मित्र मंडळाच्या वतीने गणपती विसर्जन सोहळा गुरुवार  दि 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी  6 वाजेच्या सुमारात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गावातील मुख्य रस्त्यावरून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आले. रिमझिम पावसात ढोल ताशांचा तालावर तरूणांनी चांगलाच ठेका धरला होता. त्यानंतर आरती घेऊन गावा शेजरील तलावात विसर्जन करून गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी गावातील नागरिक व तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो गॅलरी राजा गणेश मंडळाला खासदार संजय जाधव (बंडू बॉस) यांची भेट.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : दि.27 रोजी नूतन महाविद्यालय रोड   येथे ("राजा फोटो गॅलरी गणेश मंडळ'') परभणीचे लोकप्रिय खासदार संजयजी जाधव (बंडू बॉस) यांना  फोटो गॅलरी चे संचालक व मित्र मंडळ यांनी श्री गणरायाची ची आरती करण्यासाठी निमंत्रित  केले असता त्यांच्या प्रेमाखातर रात्री नऊ वाजता सेलूत आगमन करून त्यांच्या विनंतीला मान देऊन श्री गणरायाची महाआरती केल्यानंतर ते  तरुणांना संबोधित करताना म्हणाले की,  स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नौकरीच्या पाठीमागे न लागता स्वतः छोट छोटया उद्योगाकडे लक्ष देण्याकडे कल दिला पाहिजे.मुलांनी लहान मोठे उद्योग व्यवसाय सुरू करून आपले व समाजाचे नावलौकिक  वाढविले पाहिजे.कुठलाही व्यवसाय हा छोटा किंवा मोठा नसतो.आपण किती कौशल्याने आणी गुणवत्ते ने तो विकसित करतो याला महत्व आहे. आज श्रीकांत झुटे यांनी स्पर्धेच्या काळात  आपल्या स्वतःच्या गुणवत्तेवर फोटो गॅलेरी चा व्यवसाय निवडून त्यात आपल्या कल्पकतेने तो कसा चांगला विकसित होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.तरुणांनी नव नवीन व्यवसायाकडे वळले पाहिजे...

संस्थाचालक व शिक्षक संघटनांची उद्या महत्वपूर्ण बैठक2 ते 7 ऑक्टोंबर दरम्यान शैक्षणिक संघर्ष सप्ताह.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. परभणी :दि. 26 सप्टेंबर रोजी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यां च्या कंत्राटी भरतीचा व 21 सप्टेंबर रोजी शाळा दत्तक योजने संदर्भात राज्य सरकारने घेतले ल्या निर्णयाच्या निषेधार्थ 2 ते 7 ऑक्टोंबर दरम्यान शिक्षण संस्था महामंडळाने जिल्हा स्थानासह संपूर्ण जिल्ह्यात आयोजित केलेल्या शैक्षणिक संघर्ष सप्ताहा निमित्ता ने 27 सप्टेंबर रोजी सर्व शिक्षण संस्था चालक, मुख्याध्यापक संघ, शिक्षक व शिक्षके त्तर कर्मचारी संघटना व विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयाच्या सभागृहात बुधवार 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केलेल्या या बैठकीतून 2 ते 7 ऑक्टोंबर या दरम्यानच्या शैक्षणिक संघर्ष सप्ताहा संदर्भात विचार विनिमय करीत पूर्णतः नियोजन केले जाणार आहे. तसेच राज्य सरकारने कंत्राटी भरतीसह शाळा दत्तक योजने संदर्भात घेतलेल्या शिक्षण विरोधी धोरणांबाबत पुढील आंदोलनाच्या दिशाही ठरविण्यात येणार आहेत.  यासाठी आयोजित केलेल्या बैठकीस सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर क...

आ.मेघना बोर्डीकरां मुळे जखमी व्यक्तीचे प्राण वाचले.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. परभणी : दि.27 जिंतूर ते जालना या महामार्गावर अकोली पाटीजवळ रानडुकरा च्या जोरदार धडकेने   गंभीर जखमी होवून रस्त्यावर कोसळलेल्या एका मोटारसायकल स्वारास आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी थेट मदतीचा हात दिल्याने त्या मोटार सायकलस्वाराचे प्राण वाचले.आमदार बोर्डीकर या जिंतूरहून आपल्या नियोजित दौर्‍यास निघाल्या तेव्हा अकोली पाटीजवळ एक मोटारसायकल स्वार रस्त्यावर जखमी अवस्थेत विव्हळतांना आढळला. परंतु, त्यास ये-जा करणार्‍या कोणीही मदतीचा हात दिला नाही. आमदार सौ. बोर्डीकर यांनी तात्काळ गाडी थांबवून आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने या जखमीस उचलून स्वतःच्या गाडीतून जिंतूरच्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात तात्काळ उपचारार्थ रवाना केले. बाळासाहेब चढाव (वय 56) असे या जखमी व्यक्तीचे नाव असल्याचे कळले असून त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही हाती आली आहे.

राजुरा येथील सरपंच बाबासाहेब काकडे यांची घरवापसी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू :आज राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय सेलू येथे राजुरा येथील सरपंच बाबासाहेब काकडे तसेच कैलास साखरे, शिवाजीराव काकडे, यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश झाला. मागच्या काही दिवसापूर्वी त्यांनी भाजपा या पक्षात प्रवेश केला होता परंतु आज त्यांनी माजी आ.विजयराव भांबळे साहेब यांच्या उपस्थितीत पुन्हा त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घरवापसी झाली.त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.यावेळी समवेत पुरुषोत्तम पावडे, अप्पासाहेब डख, आनंद डोईफोडे, सुधाकर रोकडे, पप्पू गाडेकर, कैलासराव मोगल, कल्याण जोगदंड, जीवन आवटे, अप्पासाहेब रोडगे, विशाल देशमुख, नईमभाई पठाण, रामेश्वर काकडे, गजानन महाजन, रामेश्वर गाडेकर, भागवत गारुडे, माऊली काकडे, सुनील जोगदंड, नाना बोबडे, सुभाष जाधव, गजानन कुटे, प्रकाशराव जाधव, अशोक पवार, शिवाजी पारधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सेलू ते निपाणी टाकळी रस्ता लवकरात लवकर पूर्ण करणार. माजी आमदार विजय भांबळे यांचे आश्वासन.

इमेज
शिवाजी शिंदे परभणी - सेलू : दि. 25 सप्टे  रोजी सेलू जिंतूर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे लोकप्रिय आमदार  विजय भांबळे यांच्या निवासस्थानी दैनिक अधिकारनामा चे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन तालुक्यातील विकास कामा संदर्भात अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काय काय उपाय योजना करता येतील, तालुक्यातील अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये एम.आय.डी सी. चा प्रकल्प, ग्रामीण भागातील आरोग्यां च्या, पाणी पुरवठा योजनांचा,रस्ते आदी प्रश्नांवर सर्वांगिण विकासासाठी पुढाकार घेऊन जनतेचे प्रश्न तातडीने सोडावेत अश्या संदर्भात सकारात्मक पाऊले उचलून तालुक्याचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष वेधले असता त्यांनी अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सेलू जिंतूर मतदार संघांसाठी निधीची तरतूद  उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी आपल्या मतदार संघात सत्ताधारी आमदार असून ही त्यांनी मतदार संघांसाठी निधी उपलब्ध करून घेतला नाही हे त्यांचे अपयश असून तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत त्यांची उदासीनता दिसून येते.गेल्या 10 वर्षांपासून परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तीन तीन ...

2 ऑक्टोंबरला गांधी मरत नसतो दीर्घ लघुचित्रपटाचा प्रीमियर शो

इमेज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी, महात्मा गांधीजींचे सत्य व परखड विचार तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी नवोदित कलाकारांना घेऊन चित्रपट क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या निर्मिती फिल्म क्लब निर्मित शंभरहून अधिक कलाकारांचा समावेश असलेल्या गांधी मरत नसतो या मराठी दीर्घ लघु चित्रपटाच्या पहिला प्रीमिअर शो सोमवार दि. 2 ऑक्टोंबर, 2023 रोजी दुपारी 12:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन,  कोल्हापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये बालकलाकार आदित्य म्हमाने, पृथ्वीराज वायदंडे, कनिष्का खोबरे यांनी दिली. गांधी मरत नसतो या दीर्घ लघु चित्रपटाची संकल्पना धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टची असून निर्मिती निर्मिती फिल्म क्लबने केली आहे. दिग्दर्शक अनिल म्हमाने, महेश्वर तेटांबे, निर्मात्या डॉ. शोभा चाळके, डॉ. स्मिता गिरी, सहनिर्माता सनी गोंधळी, अनिरुद्ध कांबळे, क्रियेटिव्ह हेड ॲड. करुणा विमल, सहदिग्दर्शक छाया पाटील, अरहंत मिणचेकर यांचे तर संकलन राजवीर जाधव यांनी केले असून डी.ओ.पी. म्हणून अमर पारखे, ...

सेलूच्या रामबाग मित्र मंडळाचा 31फुटी शिवलीग चा देखावा.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू :-येथील मारवाडी गल्ली येथील राममंदिर येथील रामबाग मित्रमंडळाच्या गेल्या साठ वर्षांपासून दर वर्षी अनोखे देखावे,झांक्या गणेश मूर्ती समोर आयोजित करण्यात येत असतात. हे देखावे दर वर्षी नव नविन असतात. गेल्या साठ वर्षा पासून सदरील कार्यक्रम घेण्यात येत आहेत. मागच्या वर्षी केदारनाथ मंदिर चा देखावा होता. सर्वात चांगला देखावा म्हणून या रामबाग गणेश मंडळाला पुरस्कार मिळाला. यामुळे भाविकांना नेहमीच या गणेश मंडळाच्या देखाव्याचे आकर्षण  जास्त असते. विविधांगी कार्यक्रम दरवर्षी  घेत असल्याने  या वर्षी नवीन काही तरी आकर्षण असावे म्हणून 31फुटी शिवलिंग चा देखावा करण्यात आला आहे.  या मध्ये प्रत्येक भाविक आपल्या हाताने 31फुटी शिवलिंग चा जलाभिषेक करता येईल व 11 फुटी नंदी च्या मुखातून प्रसाद मिळेल अश्या प्रकारे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून भाविकांना आकर्षित करण्यात मंडळाला यश मिळाले आहे. दररोज शेकडो भाविक भक्त येऊन देखाव्याचा आनंद घेत आहेत.दररोज सामूहिक महाआरती चे आयोजन करण्यात येते.  या आरती मध्ये शहरातील लोकप्रतिनिधी,प्रतिष्ठित नागर...

खोतवाडी येथील तरूणाची रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या

इमेज
विशालक्रांती वृत्तसेवा - खोतवाडी तालुका हातकणंगले येथील एक तरुण दुपारी अडीचच्या सुमारास आवाडे पार्क तारदाळ येथील रेल्वे बोगद्याजवळ एक्सप्रेस रेल्वे खाली उडी आत्महत्या केल्याची घटना घडली.                                       घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, खोतवाडी येथील ओंकार संभाजी खोत वय वर्ष 24 राहणार खोतवाडी हनुमान मंदिर जवळ हा आज सोमवार दुपारी अडीच वाजण्याचे सुमारास एक्सप्रेस रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केली ओंकार हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आत्महत्येने खोतवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ओंकार एका खाजगी शाळेत क्लार्क म्हणून नोकरी करत होता. याचे दोन वर्षांपासून एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू होते. या प्रेमप्रकरणाच्या नैराश्येतुन  आत्महत्या केली असल्याचे घटनास्थळी बोलले जात होते. अपघाताचे घटना समजतात हातकणंले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून ओंकार चा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. सदर घटनास्थळी खोतवाडी त...

श्री लक्ष्मी विविध उद्देश प्राथमिक कृषी सहकारी संघाची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळी संपन्न.

इमेज
प्रतिनिधी शितल कुडचे जनवाड  जनवाड ता, चिककोडी येथील श्री लक्ष्मी विविध उद्देश प्राथमिक कृषी संघाची 13 वी वार्षिक सभा पांडुरंग मंदिरात पार पडली प्रथम मान्यवरांचे हस्ते लक्ष्मी देवीचे फोटो पूजन व संघाचे संस्थापक माननीय अण्णासाहेब चौगुले यांच्या फोटोचे पूजन झाले तसेच या सभेचे अध्यक्ष डॉ अप्पासाहेब घाठगे व प्रमुख मान्यवर सदलग्याचे माजी नगरसेवक  पिरगोंडा पाटील. कल्लाप्पांना पडलीहाले. बाळकृष्ण पाटील. कृष्ण गोंडा पाटील. धोंडीराम पाटील. रामचंद्र चौगुले. सदाशिव पाटील. व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली   विना संस्कार नाही उद्धार या तत्त्वावरती संघाने आपली कर्तव्यनिष्ठा आणि परिश्रम यांच्या जोरावर सभासदांचा विश्वास संपादन करून संघ यशस्वी वाटचाल करीत असल्याचे मत संघाचे अध्यक्ष श्री रामचंद्र चौगुले यांनी मांडले ते पुढे म्हणाले आजतागायत संघाची सभासद संख्या 315 इतके असून दोन कोटी 78 लाख 83 हजार इतकी ठेव असून शून्य टक्के दराने 122 सभासदांना 87 लाख 75 हजार इतके कर्ज वाटप करण्यात आले आहे तसेच इतर कर्ज 1 कोटी 82 लाख 45 हजार कर्ज वाटप केल...

स्वर्णीम युवा मंडळ अकिवाट यांच्या वतीने आयोजित केलेल्या ऐतिहासिक नानी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
अकिवाट :- रमेशकुमार मिठारे              अकिवाट (ता.शिरोळ) येथील स्वर्णिम युवा मंडळ नेहमीच नवनवीन सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक उपक्रमात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. गणेशोत्सवाच्या अवास्तव खर्चास फाटा देत मंडळाने सुळकुड येथील ऐतिहासिक नानी संग्रहक  शेखर कोणे यांच्या सहकार्याने ऐतिहासिक नानी प्रदर्शन येथील ग्रामपंचायत सभागृहात 22सप्टेंबर रोजी भरविण्यात आले होते.या प्रदर्शनात, परदेशी इंग्लंड, अमेरीका, भारतामधील गंधार, तक्षशीला राजवटीच्या काळापासून ते अलिकडच्या चिकोडी, बेळगाव, निपाणी,कागल,कापसी,पन्हाळा व अनुषंगिक प्रांतातील नाणी पहावयास मिळाल्याने प्रदर्शनास भेट देणार्यांचा चेहरा फुलला होता.या प्रदर्शनात बाल-चिमुकले पासुन ते वृद्धानी भेट देऊन वयस्कारानी आपल्या काळी चलनात असलेल्या नोटा व नाणी बाबत इतरांना माहीती देत होते.ऐतीहासीक नाणी जपणुक करुन शेखर कोणे विनामोबदला सामाजिक कार्य करत असलेबद्दल मंडळाकडून शाल-श्रीफळ व अभिनंदन पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोणे यांनी लहानपणापासूनच ऐतीहासीक नानी जपून ठेव...

टाकवडे गावच्या नावात मानाचा तुरा,!

इमेज
टाकवडे गावच्या नावात  मानाचा तुरा,! पुढील महिन्यांमध्ये पुणे येथे मोटर क्रॉस रेस एम.आर.एफ टीव्ही.एस या कंपनीच्या द्वारे मोटरसायकल रेसचे आयोजन केले आहे. या रेसमध्ये खूप जुने अनुभवी रेसर म्हणून राजू पाटील टाकवडे समगोंडा मळा यांचे अंतिम फेरीतील पर्यवेक्षक म्हणून नेमणूक झाले आहे. त्याबद्दल त्यांना समस्त समगोंडा मळ्यातील लोकांच्या तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

न्यू इंग्लिश स्कूलचे आदर्शवत कार्य: किशोर सावंत - देसाईशिक्षण संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात पुरस्कार वितरण व माजी सैनिकांचा सत्कार

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करुन वाटचाल करावी. तरच यशाची शिखरे प्रादक्रांत करता येतील. मौजे आगरमधील श्री विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यु इंग्लिश स्कुल या शिक्षण संस्थेने अनेक गुणवंत आणि यशस्वी विद्यार्थी घडविल्याने त्यामुळेच ते उच्च स्थानावर कार्यरत आहेत. या ग्रामीण भागातील शिक्षण संस्थेचे कार्य आदर्शवत आणि उज्वल असल्याचे प्रतिपादन भारतीय विमा विभागाचे सेवानिवृत्त विकास अधिकारी किशोर सावंत देसाई यांनी केले. मौजे आगर (ता.शिरोळ) येथील विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल या संस्थेचा२६ वा वर्धापन सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावंत देसाई बोलत होते.  उपस्थित मान्यवराच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रदर्शन शुभारंम करण्यात आला . त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा शुभारंम हैदरअली शेख यांच्या हस्ते करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष जगदिश पाटील यांनी प्रास्ताविक केले. शिक्षण संस्थेच्या वतीने देशाचे रक्षण करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातलेल्या माजी सैनिकांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच युवा...

हुपरी नगरपरिषदेचा अजब कारभार अधंळ दळतय कुत्र पीठ खातय

इमेज
सागर पाटील हुपरी - 1989 साली इगंळी गावी महापुर आला प्रचंड प्रमाणात इगंळी गावचे नुकसान झाले  पण यांना हुपरीकर वासियानी धीर देत सावरले व अदांजे 270 कुटुंबाना पुरग्रस्त योजने अंतर्गत हुपरी येथील गट नबंर 1756,1757,1758,1759,1760 येथे पुरग्रस्तभागातील लोकांना दिड गुटां जागा देऊन घर बांधून दिली.  पण या जागेची नोंद हुपरीत केली गेली नाही  या जागेची हद्द व सर्व्हे व झोन हुपरी हद्दीत आहे.  पण याचा महसुल घरफाळा, पाणीपट्टी,कर इगंळी ग्रामपंचायत वसूल करते.  हद्द हुपरीची असताना इगंळी ग्रामपंचायत कसा काय महसुल गोळा करते.  हा अजब कारभार अजुनही नगरपरिषद यांच्या लक्षात आला नाही.  यावरून नगरपरिषदेचा आधंळा कारभार लक्षात येतो. हुपरीकर इकडे भरमसाठ वाढीव पाणीपट्टी, गाळाभाडे,घरफाळा वाढीचा विरोध करत असताना  इकड मात्र दुसरीच खाऊन जात आहेत.  हा महसुल हुपरी नगरपरिषद यांना लाखो रुपये गोळा करून देऊ शकतो. आता तरी नविन मुख्याधिकारी लक्ष देणार का की ते पण मागच्यासारखे पुढे चालु ठेवणार  अशी चर्चा गावात होत आहे. आपल असताना सोडुन गावतल्या लोकांना वसुलीसाठी कायदा...

टाकवडे येथील एका होतकर शेतकऱ्याच्या मुलग्याचे गरुड झेप.

इमेज
टाकवडे येथील आलगोंडा पाटील हे शेतकरी असून त्यांचा चिरंजीव सत्यजित पाटील याची जर्मनी येथील बर्लिन एका कंपनीमध्ये चांगल्या पदासाठी नियुक्ती झाली उद्या त्याची रवानगी जर्मनी येथे होत आहे .हे कळल्यानंतर टाकवडे येथील पंचायत समितीचे माजी सभापती माननीय प्रकाश पाटील यांनी बोलावून घेऊन आवर्जून त्याचा सत्कार केला . व असेच टाकवडे गावाचे नाव उज्वल करण्यासाठी इतर मुलांना प्रेरणा दिली. यावेळी सत्यजित पाटील यांनी देखील विश्वास दिला की असेच मी माझ्या संगे आपल्या गावाचे नाव पण उज्वल करून गावातील बऱ्याच लोकांना व सध्या शिकत असलेल्या मुलांना मी सहकार्य करतो.

विजय लक्ष्मी को ऑफ क्रेडिट सोसायटीची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न

इमेज
जनवाड - शितल कुडचे      जनवाड  चिककोडी तालुक्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजातील उपेक्षितांचे अंतरंग ओळखून त्यांना आर्थिक सहाय्य देऊन संस्थेचा व सामान्य जनतेचा विकास करणारी संस्था म्हणून नावलौकिक आलेली विजय लक्ष्मी को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड जनवाड या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा तारीख 21 9 2023 रोजी पांडुरंग मंदिरामध्ये अत्यंत खेळण्याच्या वातावरणामध्ये पार पडली     संस्थेचे अध्यक्ष श्री निंगाप्पा मुधाळे यांनी संस्थेच्या विकास व प्रगतीच्या कार्याचा आढावा घेतला संस्थेने आतापर्यंतचा आलेख सभासदांसमोर मांडला यावर्षी संस्थेला 42 लाख  41 हजार 133 रुपये इतका निव्वळ नफा झाला असून संस्थेकडे 13 कोटी पेक्षा अधिक ठेवी असून सभासद संख्या 1689 असल्याचे सांगितले त्याचबरोबर प्रत्येक वर्षी एडिट वर्ग अ, मध्ये असून संस्था प्रगतीकडे असल्याचे त्यांनी सांगितले   या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रारंभी श्री लक्ष्मी देवीचा व सद्गुरू च्या फोटो पूजन दादा घाठगे यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष श्री लिंगप्पा मुधाळे उपाध्य...

राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपून जवळपास सहा महिने झाले तरीही गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाचा आर.एस. एफ सुत्रानुसार हिशोब पुर्ण न करता फायनल बिल निश्चीत करण्यात आले आहे.

इमेज
सरकार व कारखानदार दोघेही संगनमताने ऊस उत्पादक शेतक-यांचा बळी घेत असून राज्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन ४०० रूपये दुसरा हप्ता दिल्याशिवाय कारखान्यांना गाळप परवाना न देण्याची मागणी साखर आयुक्त चंद्रकांत पुलकंडवार यांचेकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.       साखरेसह व उपपदार्थांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला भाव मिळू लागले आहेत यामुळे देशामध्ये साखर उद्योग तेजीत आहे. राज्य सरकार व साखर कारखानदार हे दोघेही संगनमताने मिलीभगत करून शेतक-यांना साखरेच्या व उपपदार्थाच्या हिशोबात फसवणूक करत आहेत. काटा मारीतून तयार झालेल्या जादा साखरेच्या तपासणीसाठी उत्पादन शुल्क विभागाने साखर कारखान्याच्या गोडाऊनची तपासणी करावी. केंद्र सरकारचा महसूल बुडत असल्याने दर तीन महिन्यांनी साखर कारखान्यांच्या गोडावूनची तपासणी करावी. खासगी साखर कारखान्यांची रिकव्हरी कमी होत आहे व या कारखान्यावर कुणाचेच नियंत्रण नाही.  ऊस दर नियंत्रण समितीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याने निर्णय होण्यास वेळ लागत असून शेतकरी हितासाठी धोरणात्मक बदल करणे गरजेचे....

येळावीत पाण्याची टाकी भरुन गटारीत लाखो लिटर पाणी वाया . ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

इमेज
यड्राव (प्रतिनिधी ) येळावी (ता . पलूस ) येथे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेले वॉटर ATM ची पाण्याची टाकी भरुन अतिरिक्त पाणी ओसंडून गटारीत वाहत आहे . मात्र याकडे ग्रामपंचायतीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने नागरिकांंच्यातून संतापाची लाट उसळत आहे .          सध्या या वर्षी पाऊस कमी पडल्याने नदी पात्रात पाणी कमी असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे . पण इकडे ग्रामपंचायतीच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षपणामुळे पाण्याची टाकी पाणी भरुन गटारीत वाहू लागले आहे . वेळीच ग्रामपंचायतीने लक्ष  दिले , तर गावाला पाणी टंचाईच्या भयानक परिस्थितीच्या सामोरे जावे लागणार नाही . यापूर्वी ग्रामपंचायतीकडे नागरिकांनी वारंवार सूचना व तक्रार देऊनही सरपंच व ग्रा . प . चे पदाधीकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांंच्यातून बोलले जात असल्याचे ऐकावयास येत आहे .  त्यामूळे  सदर पाण्यासाठी लागणारी वीजेच्या बिलाचा भार नागरीकांच्यावर पडत आहे . त्यामूळे नागरिकांंच्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे .

अल्पावधीत नेत्रदीपक यश संपादन केलेल्या आदर्श को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सदलगा या संस्थेची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात ओम (ॐ) मल्टीपर्पज हॉल नागराळ रोड सदलगा येथे आज संपन्न.

इमेज
विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अण्णासाहेब कदम सदलगा चिकोडी तालुक्यातील सहकार क्षेत्रात अवघ्या पाच वर्षात उल्लेखनीय कार्य करून समाजातील उपेक्षितांचे अंतरंग ओळखून त्यांना आर्थिक सहाय्य देऊन संस्थेचा व सामान्य जनतेचा विकास करणारी संस्था म्हणून नावलौकिकाला आलेली आदर्श को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सदलगा या संस्थेची वार्षिक सभा आज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाहुबली कलाजे यांनी आपल्या प्रास्ताविक व मनोगतात  संस्थेच्या विकास व प्रगतीच्या कार्याचा आढावा घेताना, संस्थेने आतापर्यंत प्रगती कशी केली? याचा आलेख संस्थेच्या सदस्या समोर मांडला आणि यावर्षी संस्थेला 15 लाख 50 हजार रुपये इतका निव्वळ नफा झाला असून, संस्थेकडे अकरा कोटीपेक्षा अधिक ठेवी असून, सभासद संख्या 740 असल्याचे सांगितले. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी ऑडिट रिपोर्ट 'ए' क्लास मध्ये असून संस्था संपूर्ण शहरांमध्ये 18% लाभांश देणारी एकमेव असल्याचे त्यांनी सांगितले. या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रारंभी दीप प्रज्वलन माननीय अध्यक्ष श्री अमोल पाटील श्री बाहुबली कलाजे व उपस्थित मान्यवर...

वाड - वडिलांची सेवा करा , निंदा करशील तर यमदुती जाशील . यड्रावमध्ये श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेत भाकणुक

इमेज
यड्राव (प्रतिनिधी )  :  जो गुरूच्या मार्गात राहिल, तो सुखाने जगेल. चांगलं वागा, गर्व अहंकार करू नका. अंधश्रध्दा पाळू नका. आई लक्ष्मी ईच्छा पुर्ण करेल. भक्ती ठेवा पाप माजल, उन्हाळ्याचा पावसाळा, पावसाळ्याचा हिवाळा होत चाललाय. पडल तिथं पडल. बांधाला बांध, शिवाला शिवय हाय रे.. बाळानो. पुण्याचं पारडं धरून चला. वाड-वडीलांची सेवा करा. निंदा करशील यमदुती जाशील. अशी भाकणूक श्री सिध्द सोनु देवा यांनी केली. यड्राव (ता.शिरोळ) येथे श्री लक्ष्मी (रिध्दी-सिध्दी) देवीची यात्रा मोठ्या भक्तीपुर्ण वातावरणात पार पडली.  सतीयुग गेलं कलयुग आलं. डोंगरा ऐवढं पाप, बोर्‍या ऐवढ्या पुण्यावर तरू लागलंय. बारा गावची बारा वर्षाची मुलगी भरताळ माजल. नवनवीन आजाराला बळी पडशिला. भगवा झेंडा राज्य करेल. पाऊस पाण्यात मिरग गाजल, राहिणी साजेल, तांबडं धान्य उदंड पिकेल. पांढरं फुल मोलाने विकेल.  यड्रावच्या पांढरीला, गादीला जोडीच्या बहिनीचा रहिवास झाला. माता भगीनींची नजर हाय आपल्या गावाला. जोपर्यंत श्रध्देने येशीला त्याचं मागणं पुर्ण करेल. नियतीचा नियम आदिशक्तीचे बळ भरलं हाय गावाला. विषारी...

खोतवाडीत चार जणांना डेंगूची लागण आरोग्य विभागाची माहिती,ग्रामपंचायतीकडून स्वच्छतेचा बोजवारा.

इमेज
 विशालक्रांती वृत्तसेवा -   खोतवाडी मध्ये चार जणांना डेंगूची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाचे एस एम कोकणे यांनी खोतवाडी ग्रामपंचायत ला लेखी माहिती दिली. सत्य नगर -1, खोतवाडी हायस्कूल जवळ - 1 माने मळा येथे 2 असे एकूण चार डेंगुचे  मिळून आल्याने खोतवाडी गावात खळबळ उडाली आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात डेंगूचे चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून गावातील गटारी व परिसर स्वच्छ तसेच धुर फवारणी तन नाशक औषधे मारून गावातील परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. ग्रामपंचायत कडून गावातील गटारीची स्वच्छता, औषध फवारणी, तन नाशक फवारणी, करणे आदी गोष्टींचे  गांभीर्य नसल्यामुळे गावातील जनतेला साथीच्या रोगांना बळी पडावे लागत असून ग्रामपंचायतच्या कारभारावर खोतवाडी नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीकडून ठोस उपाययोजना करण्याची गरज असताना ग्रामपंचायत प्रशासन मात्र गावातील गटारींची स्वच्छता, औषध फवारणी, डास प्रतिबंधक धुर फवारणी व भागातील कचरा उठाव आधी गोष्टींकडे दुर्लक्ष करून जनतेच्या मात्र जीवाशी खेळ करून साथीच्या रोगांना एक प्रकार...

हुपरी येथे मनसेची 1 लाख 25 हजाराची दहीहंडी

इमेज
प्रतिनिधी सागर पाटील  -                                        हुपरी येथील भगवा रक्षक संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अंबाबाई शहरी विकास आघाडी,  दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन, यांची सालाबादप्रमाणे याहीवर्षी दहीहंडी सव्वा लाखाची  व मराठी सांस्कृतिक कार्यक्रम (लावणी)  आयोजित करण्यात आली आहे. असे पत्रकार परिषदेमध्ये संयोजक सागर पाटील,प्रशांत पाटील,पप्पू निकम,विजय खाडे यांनी सांगितले.  या कार्यक्रमासाठी महिलांना बसण्यास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.  अस्सल मराठी व हिंदी गाणी व आकर्षक विद्युत रोषणाई खास आकर्षण असेल तरी सर्वांनी  13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता हुतात्मा स्मारक येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजका मार्फत करण्यात आले.