नूतन कन्या प्रशालेची जनजागरण फेरी
शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी
सेलू :राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि स्वच्छ भारत अभियान 2023 अंतर्गत 1 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या स्वच्छता संकल्प अभियानाचे औचित्य साधून श्रीमती ल. ला. रा. नूतन कन्या प्रशालेच्या वतीने स्वच्छता जनजागरण फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
एक तारीख एक तास स्वच्छता हाच ध्यास या स्वच्छता जनजागरण फेरीत नूतन वि. शि. सं. चे अध्यक्ष डॉ.सत्य नारायणजी लोया, संस्था सचिव प्राचार्य डॉ. विनायक कोठेकर, नगरपरिषद सेलूचे मुख्याधिकारी देविदास जाधव, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, शिवनारायन मालाणी, महिला मंडळ अध्यक्षा विजया कोठेकर,सचिव ललिता गिल्डा, सुयश पटवारी, रामवल्लभ राठी, शेख मुनीर, केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, श्याम पटवारी,दिलीप भंडारी, शिकारे, अशोक कासार, सूर्यवंशी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता खराबे, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, भालचंद्र गांजापूरकर यांची उपस्थिती होती.
स्वच्छता जनजागरण फेरीची सुरवात राष्ट्रपिता म. गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि हिरवी फीत दाखवून झाली. नूतन कन्या प्रशाला, नूतन विद्यालय रोड, क्रांती चौक, जवाहर रोड, मोंढा या मार्गाने राष्ट्रपिता म. गांधी पुतळा असा मार्गक्रमण असतांना दलीतमित्र श्रीरामजी भांगडीया यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ सेलू सुंदर सेलू, या जयघोषात संपूर्ण मोंढा परिसर व्यापून गेला. स्वच्छतेचे महत्व, झाडे लावा झाडे जगवा, नका करू तुझं माझं, पर्यावरण आहे सर्वांच ,अश्या अनेक जयघोषात फेरी आल्यानंतर राष्ट्रपिता म.गांधींच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.प्रास्ताविक मुख्याध्यापिका संगीता खराबे यांनी केले,या प्रसंगी शिवनारायन मालाणी, देविदास जाधव, डॉ. व्ही. के. कोठेकर यांनी स्वच्छते संबंधी विद्यार्थीनिंना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सेलूतील नागरिकांची उपस्थिती होती.सुषमा दामा, सीमा सूक्ते व किशोर ढोके यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सादर केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कीर्ती राऊत यांनी तर आभार प्रदर्शन भालचंद्र गांजापूरकर यांनी केले.
टिप्पण्या