एक तास : महाश्रमदान न.प.सोबत विविध सामाजिक संघटनाचा स्वच्छता मोहीम या उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

सेलू:- सेलू येथील नगरपरिषद, श्रीराम प्रतिष्ठान, व आर्ट ऑफ लिव्हिंग सेलू यांच्या संयूक्त विद्यमाने तिसरा स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत “'एक तारीख- एक तास महाश्रमदान स्वच्छता मोहीम    (ता.१) वार रविवार रोजी बसस्थानक परिसरात  करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष तथा सेलू कृ.उ.बाजार समितीचे संचालक डॉ संजय रोडगे ,प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष विनोदरावजी बोराडे, सेलू कृ.उ.बाजार समितीचे संचालक तथा बीजेपी तालुकाध्यक्ष अँड. दत्ताराव कदम,  न.प.चे मुख्याधिकारी देविदास जाधव,माजी उप नगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, बीजेपी ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष जयसिंग शेळके, प्रफुल बिनायके,अशोक पटवारी  आर्ट ऑफ लिव्हीगचे जिल्हा समन्वयक किशोर घडे, साधक कैलास कदम, रामा वैद्य, प्रकाश चेचीडीया, संतोष शर्मा, अनुज गुप्ता, रुचीका गुप्ता, स्वप्निता ढवळे आदी साधक आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छतेसाठी 'एक तारीख, एक तास' या रविवारी १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोदवावा. 'स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा' या अभियानां तर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज रविवारी १ ऑक्टोबर रोजी आपल्या सेलू शहरात तसेच ग्रामीण भागात एक तारीख- एक तास महाश्रमदान स्वच्छता मोहीम या उपक्रमांतर्गत प्रत्येकाला ते जिथे असतील तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात आपण सहभाग नोंदविन्यात  दृष्टीने स्वच्छता, आरोग्यदायी सवयी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापना सह हागणदारी मुक्तीचा कार्यक्रम ग्रामीण क्षेत्रातील सर्वसाधारण जीवनमानात सुधारणा घडवून आणणे. या उदेशानी हि मोहीम राबविली जात आहे. स्वच्छता आपल्या सर्वाच्या दैनंदिनीतील महत्वाची गोष्ट आहे. स्वच्छता आपल्या आयुष्यात समृद्धी आणते. आरोग्य आणि परिसराची स्वच्छता यांचा दृढ संबंध आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून ते अनेक थोर राष्ट्र पुरूष साधू-संतानीही स्वच्छते बाबत आपल्याला धडे शिकवले आहेत. त्याच अनुषंगाने  'स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा' हे अभियान यशस्वी करायचं आहे. 'एक तारीख एक तास' या उपक्रमाला स्वच्छता लोक चळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास स्वच्छते साठी द्यायचा आहे. आपण, आपले कुटुंबिय किंवा सहकारी जिथे कुठे असाल, तिथे आपण स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात योगदान द्यायचे आहे. असे यावेळी बोलताना डॉ. संजय रोडगे म्हणाले.  आपल्या सर्वांना 'स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा' हे अभियान यशस्वी करायचं आहे. “'एक तारीख- एक तास महाश्रमदान स्वच्छता मोहीम ' या उपक्रमाला साठी प्रत्येकाला आपला एक तास  स्वच्छते साठी द्यायचा आहे. आपण, आपले कुटुंबिय किंवा सहकारी जिथे कुठे असाल, तिथे आपण स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात योगदान द्यावे असे विनोद बोराडे म्हणाले. स्वच्छ भारत अभियान गेल्या ७ वर्षापासून आपण आपल्या सेलू शहरात नगर पालिके च्या वतीने आयोजित करतो . प्रत्येक घरोघरी जाऊन कचरा हा कचरा कुंडीत टाकावा असे आवाहन न.प. च्या वतीने करण्यात आले होते. नंतर घंटा गाडीची व्यवस्था करण्यात आली. आज घरातील प्रत्येक गृहिणी घंटा गाडीची वाट पाहते व कचरा हा घंटा गाडी टाकते. याबद्दल आपल्या सेलू नगरपालिकेचा महाराष्ट्रात ३ रा क्रमांक  व देशात २० वा क्रमांक स्वच्छ शहर म्हणून राज्य व देश पातळीवर सन्मान करण्यात आला. हि अत्त्यंत गौरवास्पद बाब आहे. या सर्व गोष्टीत सेलू शहरातील सर्व नागरिक व घरातील गृहिणीचा अत्त्यंत मोलाचा वाटा आहे. असे मुख्याधिकारी देविदास जाधव म्हणाले.या “एक तास महाश्रमदान स्वच्छता मोहीमेला श्रीराम प्रतिष्ठान संस्थेचे सर्व प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आर्ट ऑफ लिविंग सेलू चे सर्व साधक या सह नगर परिषदेचे सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर टाके यांनी तर आभार संजय ठाकर यांनी केले. या मोहिमेच्या यशस्वितेसाठी श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.