"जगा आणि जगू द्या"संदेश मानवजातीला अमृत समान ; आचार्य श्री कुलरत्नभूषण मुनी महाराज
बोरगाव येथे 108 भव्यरथोत्सव; विविध मान्यवरांची उपस्थिती
जैन धर्मातील मुनी त्यागींचे तत्वे ,आदर्श जगाच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहेत. आपल्या हृदयाचा साधेपणा हाच धर्म आहे. तीर्थकारांनी जन्मलेल्या हा देश संपूर्ण विश्वाला आदर्श आहे. सत्य ,न्याय ,अहिंसा, त्याग,संयम अशा पाच रत्नत्रयाच्या माध्यमातून जैन मुनिनी संपूर्ण जगाला जगा आणि जगू द्या हा संदेश दिला. हा संदेश मानवजातीला अमृत समान असल्याचे मत श्री आचार्य श्री 108 कुलरत्न भूषण महाराजांनी व्यक्त केले.
बोरगाव येथे मुनीश्री 108 कुलरत्न भूषण महाराज यांच्या पावन वर्षायोग निमित्त आयोजित दशलक्षणा पर्व या अनुषंगाने भव्य 108 रथोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर खासदार अण्णासाहेब जोल्ले,आमदार गणेश हुक्केरी ,आमदार शशिकला जोल्ले ,माजी खासदार राजू शेट्टी ,माजी आम.काकासाहेब पाटील ,माजी मंत्री वीरकुमार पाटील, हालसिद्धनाथ कारखान्याचे अध्यक्ष एम. पी .पाटील उपाध्यक्ष पवन पाटील , मा .जि.प .सदस्य अण्णासाहेब हावले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण , महावीर सर्कलवर उभारण्यात येत असलेल्या कीर्ती स्तंभचे ध्वजारोहण खासदार अण्णासाहेब जोल्ले,यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, जगात जैन धर्म हा पवित्र धर्म आहे. संपूर्ण त्यागी मुनिंचा पवित्र स्थान मानल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र सम्मेदशिखरजी या ठिकाणी कर्नाटक भवन व्हावे यासाठी आपण मंत्री असताना प्रयत्न केले आहे .आता राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. आपण लवकरच मुख्यमंत्री व संबंधित खात्याच्या मंत्र्यांना भेटून सम्मेद शिखर्जी येथे कर्नाटक भवन निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे .तसेच बोरगाव सर्कलावर कीर्तीस्तंभ उभारण्यात येत असून कीर्ती स्तंभाला लागणारा सर्व खर्च हा जोल्ले उद्योग समूहाचा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार गणेश हुक्केरी यांनी, आचार्य श्री कुलरत्नभूषण मुनी महाराज यांच्या पावन सानिध्यात या ठिकाणी पावन वर्षायोग हा कार्यक्रम होत आहे. संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश देणारा जैन धर्म आज सर्व समाजासाठी आदर्श असा आहे. पुण्याक्षेत्र सम्मेद शिखरजी या ठिकाणी होत असलेल्या कर्नाटक भवन निर्मितीसाठी आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या नेतृत्वाखाली आपण राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून लवकरच या कामास मंजुरी देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास हालसिद्धनाथ कारखान्याचे विद्यमान संचालक रामगोंडा पाटील, जयकुमार खोत ,आप्पासाहेब जोले ,शरद जंगटे, सावकर मादनाईक, चंद्रकांत भोजे पाटील,भाऊसाहेब पाटील ,भाऊसाहेब बंकापुरे, विद्याधर अमन्नवर,राजू खिचडे ,जितेंद्र भोजे, रमेश मालगावे ,अजित तेरदाळे,भरत चोकावे, अनुज हावले, भरत जंगटे, सुरेंद्र पाटील, सुकुमार चिप्रे, शितल हावले, आणासाहेब बारवाडे, संजय हावले, बाबासाहेब पाटील, पांपा म्हैसाळे यांच्यासह पंचक्रोशीतील श्रावण श्रविका हजारोच्या संख्येने उपस्थित होत्या.
दशलक्षणा पर्व निमित्ताने बोरगाव येथे प्रथमच 108 रथांचे सवाद्य भव्य असे मिरवणूक काढण्यात आले .ऐतिहासिक कार्यक्रमास बोरगाव सह पंचक्रोशीतील हजारो श्रावक साक्षीदार झाले.भव्य मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
विशाल क्रांती न्यूज साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे
टिप्पण्या