गुणवत्तेचा त्रिकोण वरदान ठरणार-शिरिष लोहट.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

मानवत : दि.30 मानवत तालुक्यातील ७१ शाळेत एकाच वेळी त्रैमासिक पालक सभांचे आयोजन करण्यात आले होते. के. प्रा. शा. मानवत येथे सुद्धा करण्यात आले.पालक सभा ही दोन सत्रा मध्ये संपन्न झाली. सभेच्या पहिल्या सत्रास सकाळी ठीक 10:30 वाजता वर्गवार पालकांना बसवून सुरुवात करण्यात आली. पालक सभेची सुरूवात वर्ग पहिली मध्ये शा. व्य. समिती अध्यक्ष  मोहन भाऊ लाड, पत्रकार विलास बारहाते व मुख्याध्या पक  बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केली. वर्ग पहिलीच्या पालकांना रामराव सोळंके सर यांनी मार्गदर्शन केले. या सत्राचे सुत्रसंचलन पानझाडे सर यांनी केले.प्रत्येक वर्गात व  शाळेत चालू असलेले विविध उपक्रम पायाभूत चाचणी व शाळेची स्थिती तसेच पुढील तीन महिन्याचे नियोजन यावर माहिती देण्यात आली व चर्चा करण्यात आली. चहासाठी मध्यंतर करुन लगेचच दुसऱ्या सत्रास सुरूवात करण्यात आली. दुसरे सत्र शा.व्य.स.अध्यक्ष मोहनभाऊ लाड यांच्या अध्यक्षतेखाली व विलास बारहाते, आप्पा नालिंदे यांच्या सह जवळपास चारशे पालकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी उपस्थितीत पालकांना मार्गदर्शन करतांना मानवत केंद्राचे केंद्रप्रमुख शिरिष लोहट बोलत होते.यावेळी त्यांनी गुणवत्तेचा त्रिकोण  यामध्ये पालक, शिक्षक व विद्यार्थी यांची भुमिका व कार्य यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांसोबतच पालकांचे योगदान व पालक सभेची गरज याविषयी माहिती दिली.तसेच समिती अध्यक्ष मोहनराव लाड यांनी पालकांच्या काही सुचना असतील तर त्यांचाही विचार केला जाईल. असा शब्द दिला. शेवटी सर्व उपस्थित पालकांसाठी शा. पो. आहाराची व्यवस्था करण्यात आली होती.एकंदरीत तालुक्यातील सर्व शाळेत सुनियोजित पालक सभा यशस्वीपणे पार पडल्या. याकामी शिक्षणप्रेमी व विद्यार्थी प्रिय गटशिक्षणा धिकारी रणमाळे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.पालक सभा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकांनी  प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.