मलिकवाड येथे स्वच्छता अभियान.,ग्रामपंचायत, संजीवनी वकुट, सरकारी शाळेत उपक्रम
मलिकवाड येथे केंद्रीय गृहनिर्माण व शहर व्यवहार मंत्रालय रविवारी (ता.01) रोजी संपूर्ण देशभरात स्वच्छता अभियान ग्रामपंचायत, संजीवनी वकुट, सरकारी मराठी, कन्नड शाळेंनी हा उपक्रम राबविण्यात आला. या स्वच्छता मोहीमेला ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी नऊ वाजता प्रारंभ झाला. राष्ट्रव्यापी मोहीम व महात्मा गांधीजी जयंतीनिमित्त या स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.
ग्राम पंचायतिच्या पठांगणात ग्राम पंचायत अधिकारी, कर्मचारी, संजीवनी वकुट, अंगणवाडी, आशा कार्यकर्त्यां कर्मचारी एकत्रित जमले. त्यांनतर प्रत्येक जण हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता अभियानाला प्रारंभ केला. गावातील असलेल्या मुख्य मार्गावरुन गणपती मंदिर, लक्ष्मी मंदिर, रेणुका मंदिर चक्री लाईन मार्गे शेवटी विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत दोन तासाहून अधिक या स्वच्छता मोहीमेची सांगता करण्यात आली. यावेळी गोळा केलेला कचरा घंटा गाडीत एकत्रित करण्यात आला. यावेळी सरकारी मराठी, कन्नड शाळेच्या आवारात झाडे लावण्यात आली. यावेळी फलक लावून स्वच्छता मोहीमेची जणजागृती करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष संभाजी पाटील, कार्यदर्शी मल्लिकार्जुन कांबळे, राजू कट्टीकर, राजू हिरेमठ, संजय लक्कोळे, भारती बाकळे, संजीवनी कुडचे, राजश्री सुतार, कावेरी कोळी, पूजा ऐदमाळे, नेहा शिंदे, लक्ष्मी शिंदे, तनुजा नडवीनमनी, महादेवी कानडे, हमीदा मुल्ला, लता सुतार, अप्पासाब माळगे, सदाशिव धरनाईक, गंगाराम कांबळे उपस्थित होते.
टिप्पण्या