ब्रह्माकुमारींचा समर्पण सोहळा सेलूमध्ये उत्साहात.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.


बहारदार नृत्यांनी भरली रंगत. 



सेलू  : ब्रह्माकुमारी रचना बहेन‌, परभणी आणि ब्रह्माकुमारी राधा बहेन, सेलू यांनी संपूर्ण जीवन ईश्वरीय कार्यासाठी समर्पित केले. यानिमित्ताने परभणी जिल्ह्यातील सेलू येथे रविवारी, एक ऑक्टोबर रोजी आयोजित ईश्वरीय समर्पणाचा आनंद सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सेलू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने श्री साई नाट्य मंदिरात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, डॉ.शिवदासभाई शिंदे, पांडुरंगभाई,शारदामाता, पंढरीनाथभाई अरुणामाता, कौशल्या बोराडे, विजया बोराडे, उर्मिला बोराडे, ब्रह्माकुमारी अर्चना बहेन, सविता बहेन, अनिता बहेन, योगिता बहेन, रंजना बहेन, सीमा बहेन, वैशाली बहेन आदींची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ब्रह्माकुमारी रचना आणि राधा बहेन यांनी शिवपिंडीला पुष्पहार अर्पण करुन समर्पित जीवनाच्या प्रवासातील भावानुभव व्यक्त केले. अर्चना बहेन, कौशल्या बोराडे, विनोद बोराडे आदींसह मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. 'जीवनात अध्यात्मिकतेचे महत्व' या विषयावर शिवदासभाई यांनी मार्गदर्शन केले. अनिता बहेन यांनी ईश्वरीय सेवेचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी श्वेता, ऋतुजा, स्वरा बरसाले, ऋतुजा जोशी, नम्रता, ममता मिटकरी, जिजाई, अहिल्या मोगल, स्वरा चव्हाण, अवनी, तक्षशिला, विराज, ज्ञानराज यांनी विविध नृत्ये सादर करून सोहळ्यामध्ये रंगत भरली.  प्रास्ताविक सविता बहेन यांनी केले. सूत्रसंचालन संचालन सीमा बहेन यांनी केले. वैशाली बहेन यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सारिका बहेन, दिव्या बहेन, जया बहेन आदींसह परभणी, सेलू, पाथरी, मानवत, एरंडेश्वर, शिंदे टाकळी, सातोना, वालूर येथील ब्रह्माकुमारी परिवार तसेच नागरिक, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.