पोस्ट्स

श्री चक्रराज यंत्र पूजन सोहळासाठी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या कडून मोफत वाहन व्यवस्था.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : श्री चक्रराज यंत्र पूजन सोहळ्यासाठी श्री क्षेत्र वेरूळ येथे जाण्यासाठी सेलू शहराचे लाडके आणि लोकप्रिय माजी नगराध्यक्ष विनोद  बोराडे साहेब यांच्या तर्फे सेलू येथील सर्व स्वामी समर्थ सेवेकरी  वेरूळ या ठिकाणी जाण्यासाठी व येण्या साठी बारा क्रुझर वाहनाची व्यवस्था केली केली.  त्याबद्दल श्री स्वामी समर्थ केंद्र महेश नगर व मारुती नगर सेलू यांच्या वतीने व तसेच समस्त सर्व सेविकाऱ्यांच्या वतीने विनोद बोराडे साहेबांचे शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.रात्री तीन वाजता सर्व स्वामी समर्थ च्या सेवेकरी यांना वाहनाची स्वतंत्र व्यवस्था करून त्याची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून स्वतः जातीने रात्री उपस्थित राहून वाहन चालकांना  भक्तांना व्यवस्थित घेऊन जाण्याच्या सूचना व मार्गदर्शन केले. भर रात्री समाजाचे आपण काही देणे लागतो ही भावना उराशी बाळगत  विनोद बोराडे हे नेहमीच अग्रेसर असतात. सेलू शहराच्या विकासासाठी अत्यंत तळमळीने कार्य करणारा एक कार्यकर्ता सामान्य जनतेच्या सुख दुःखात सदैव पाठीशी राहून त्यांच्या समस्...

सेलू येथील राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्याची तयारी युद्धपातळीवर सुरू - स्वागताध्याक्ष विनोद बोराडे.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू :मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मेळावा व आदर्श तालुका पत्रकार पुरस्कार वितरण सोहळयाची तयारी युद्ध पातळीवर सुरू असून सेलू शहर राज्यातून येणाऱ्या पत्रकारांच्या स्वागता साठी सज्जअसल्याची माहिती या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विनोद यांनी दिली आहे.मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या वतीने दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी सेलू येथील साई नाट्यमंदिरात राज्या तील 256 तालुक्याती ल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष यांचा राज्यस्तरीय मेळावा तसेच राज्यात आदर्श काम करणाऱ्या तालुका व जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. या मेळाव्याच्या स्वागताध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांची निवड झाली असून त्यांनी या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे. साई नाट्य मंदिर येथे सहाशे पत्रकार यांची बैठक व्यवस्था असून पत्रकारांची निवास व्यवस्था व्यंकटेश (बालाजी) मंदिर सेलू येथे करण्यात आली आहे. या मेळाव्याच्या तयारीवर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचे लक्ष असून याबाबत ते रोज आढ...

मुलांना कर्तव्याचा विसर पडल्याने ज्येष्ठ नागरिकांना घ्यावा लागतोय वृद्धाश्रमांचा आधार : प्रा. अभिजीत पाटील.

इमेज
आई वडिलांनी मुलांना लहानाचे मोठे केले, वृद्धावस्थेत त्यांचा सांभाळ करणे हे मुलांचे आद्यकर्तव्य आहे पण त्याचा मुलांना विसर पडत चालल्याने ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमांचा आधार घ्यावा लागत आहे असे प्रतिपादन  प्रा. अभिजीत पाटील यांनी केले .      .                   देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, इचलकरंजी मधील समाजशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी इचलकरंजी येथील समाधान वृद्धाश्रमास भेट दिली यावेळी ते बोलत होते.            क्षेत्र कार्य पद्धतीतील अभ्यासाचा एक भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्यांच्याशी संवाद साधण्याच्या हेतूने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.            यावेळी विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला तसेच प्रश्नावलीच्या माध्यमातून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रा.अभिजित पाटील यांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांना फळांचे वाटप करण्यात आले.   ...

यड्राव येथे अपघातात शाळकरी मुलगा गंभीर जखमी .

इमेज
यड्राव (प्रतिनिधी ) ः                                    यड्राव मराठी शाळा जवळ शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांचा अपघात होऊन गंभीर दुखापत झाली आहे या अपघातात त्याचा उजव्या पाय गुडघ्याखाली फॅक्चर झाला आहे  . सुजल गणेश साळुंखे (वय 6, रा. हर्षवर्धन नगर) असे विद्यार्थ्याचे नाव आहे.       याबाबत अधिक माहिती अशी की, सुजल हा शाळा सुटल्यानंतर घरी जात होता एसटी स्टँड चौकातून कोंडिग्रे कडे जाणाऱ्या मार्गावर शरद सोसायटीजवळ एचएफ डीलक्स या मोटरसायकलस्वाराने सुजल ला धडक दिली या अपघातात सुजल गंभीर जखमी झाला असून उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन उजव्या पायाला गुडघ्या खाली पाय फ्रॅक्चर झाला आहे दरम्यान शेजारील नागरिकांनी सूरजला तात्काळ इचलकरंजी येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलिसात झाली नव्हती .

आकाशाशी जडले नाते.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू :दि. 14 नूतन विद्यालय सेलू येथे भूगोल दिनाच्या पूर्वसंध्येला पौष पौर्णिमेच्या दिवशी दिनांक 13 रोजी आकाशाशी जडले नाते हा अवकाश दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध हवामानतज्ञ पंजाबराव डख, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्था पन समितीचे अध्यक्ष सितारामजी मंत्री, नूतन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी. के देशपांडे गुरुजी, नूतन शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य पावडे नाना यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.  या कार्यक्रमा अंतर्गत सेलू तालुक्यातील उपस्थितांना चंद्र, गुरु, शनी हे ग्रह व उपग्रह टेलिस्कोपच्या माध्यमातून दाखव ण्यात आले. आपल्या पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राला इतक्या जवळून पाहताना त्यावरील विविध डाग आणि प्रकाशित भाग पाहून विद्यार्थी भारावून गेले. सेलू तालुक्यातील जेष्ठ नागरिक, पत्रकार, हौशी खगोल अभ्यासक विविध शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने नूतन विद्यालयातील प्रार्थना मैदानावर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी नूतन विद्यालयातील सर्व शिक्...

आम.श्री. अशोकराव माने बापू यांचा सत्कार सोहळा तसेच छत्रपती ग्रुप हातकणंगले तालुका कार्यकारिणी व हुपरी , रेंदाळ शहर कार्यकारिणी नियुक्ती.

इमेज
छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य च्य वतीने १२जानेवारी २०२५ रोजी पैसाफंड हॉल  हुपरी येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त हातकणंगले चे  नवनिर्वाचित आमदार श्री. अशोकराव माने बापू यांचा सत्कार सोहळा तसेच छत्रपती ग्रुप हातकणंगले तालुका कार्यकारिणी व हुपरी , रेंदाळ शहर कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली. याच कार्यक्रम दरम्यान छत्रपती ग्रुपचे सौरभ खोत यांची कन्या शिवश्री हीचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोद दादा पाटील यांच्या हस्ते आमदार अशोकराव माने बापू यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिनानिमित्त हुपरी रेंदाळ भागातील सर्व पत्रकार बांधवांचा ही सन्मान आदरणीय प्रमोद दादा पाटील  व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी  छत्रपती ग्रुपची हातकणंगले तालुका कार्यकारिणी नूतन पदाधिकारी निवडी खालीलप्रमाणे हातकणंगले तालुका कार्यकारिणी संपर्कप्रमुख सौरभ खोत SK तालुका प्रमुख रोहित भाऊ शिरोलीकर उपतालुका प्रमुख राहुल भाऊ पुरवंत   * हुपरी शहर क...

आनंद नागरी अर्बन पतसंस्थाचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य हरिकिशन शर्मा यांना मातृशोक.

इमेज
शिवाजी शिंद जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू :-आनंद नागरी अर्बन पतसंस्थाचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य हरिकिशन शर्मा यांच्या  आई शोभाबाई रामप्रसाद शर्मा वय 90 यांचे सेलू येथील बन्सीलाल नगर येथे दिनांक 13/01/25 रोजी रात्री 8.45 वाजता वृधपकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात , तीन मुले, एक मुलगी, नातवंड, सुना असा मोठा परिवार आहे. त्यांचे अंतिम संस्कार दिनांक 14/01/25 रोजी सकाळी 10 वाजता वैकुंठ धाम सेलू येथे करण्यात आले आहे .या वेळी परिसरातील नाते वाईक, डॉक्टर, वकील, पत्रकार, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

जन्मदात्या आईने चार मुलांना कालव्यात टाकून आत्महत्येचा प्रयत्न चार मुलांचा मृत्यू : आईला वाचवण्यात यश.

इमेज
बोरगांव/प्रतिनिधी. कौटुंबिक वादातून जन्मदात्या आईने चार मुलांना विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी जलाशयाच्या डाव्या मुख्य कालव्या फेकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चारीही मुलांचा मृत्यू झाला तर आत्महत्या करणाऱ्या आईला मच्छीमारांनी वाचवले. घटना विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी जलाशयाच्या डाव्या कालव्यावरील बेनाळ पुलावर घडली. आत्महत्येचा प्रयत्न करणारी  माता व मुले कोलार तालुक्यातील तिलगी खेड्यातील रहिवासी आहेत.याप्रकरणी विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी पोलीस स्थानकात  नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.  तनु निंगराज बजंत्री(वय 5), रक्षा निंगराज बजंत्री(वय 3) हुसेन निगराज बजंत्री व हसन निंगराज बजंत्री(वय 13 महिने) आवळीजवळी मुले यांचा मृत्यू झाला आहे.                    याबाबत माहिती अशी की, रविवारी मृत बालकाचे वडील निंगराज व त्यांच्या भावामध्ये रात्री वडलार्जित संपत्तीसाठी भांडण झाले.  मृत बालकाचे वडील निंगराज यांनी पत्नी भाग्याची समजूत काढून आपण बेंगलोर शहरा ठिकाणी जाऊन काबाडकष्ट मोल मजुरी करून आप...

बेडकिहाळ चाँदशिरदवाड मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध जागीच ठार.

इमेज
बोरगांव/ प्रतिनिधी.     बेडकिहाळ दूधगंगा पुल चाँद शिरदवाड या मार्गावर बाबर (टाकळे) यांच्या शेती शेजारील प्रमुख मार्गावर रविवार तारीख 12 रोजी रात्री 8.30 च्या दरम्यान , बेडकिहाळ सर्कल हून चाँद शिरदवाड कडे चालत जात असलेले चाँदशीरदवाड येथील रहिवाशी असलेले प्रकाश महालिंग स्वामी,  वय 52 यांना अज्ञात वाहन धडक दिल्याने रस्त्यावर पडून   जागीच ठार झाले.     घटनास्थळी रक्त  पडल्याचे दिसत होते. रस्त्यावर पडलेली व्यक्ती चाँद शीरदवाड येथील प्रकाश स्वामी आहेत असे समजताच चाँद शिरदवाड येथील ग्राम पंचायत सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली.   घटना स्थळी सदलगा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार व सहाय्यक पोलीस यांच्या सह भेट देऊन पंचनामा केला, व प्रेताची उत्तरीय तपासणी  सदलगा येथे करून शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले.    मयत प्रकाश यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या प्रकाश स्वामी यांचे अचानक अपघाती निधन झाल्याने गावांतून हळ हळ व्यक्त होत आहे.

नगर सेवक अभय मगदूम यांच्या वाढदिवसा निमित्त बोरगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

इमेज
बोरगांव /प्रतिनिधी. बोरगाव येथील विद्यमान नगरसेवक व जय गणेश व गौरी गणेश महिला को- ऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अभयकुमार मगदूम यांच्या वाढदिनी मंगळवारी १४ जानेवारी २०२५ रोजी विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती जय गणेश सोसायटीचे उपाध्यक्ष अँड सचिन रोड यांनी दिली.         बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना सचिन रोड म्हणाले, सामाजिक, क्रीडा शैक्षणिक व सहकार क्षेत्राला - नेहमीच प्राधान्य देत सर्वसामान्य - व गरजवंतांना नेहमीच मदत करणारे आमच्या संस्थेचे अध्यक्ष - अभयकुमार मगदूम यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रमातून साजरा केला जातो. गेल्या ४ वर्षापासून बोरगाव येथे आपण मोफत असे सर्व रोग निदान शिबिरांचे आयोजन करीत असतो यामध्ये अनेक रुग्णांना लाभ मिळालेला आहे. यावर्षी बोरगाव व - परिसरातील रुग्णांना लाभ व्हावा यासाठी जय गणेश व गौरी गणेश महिला को ऑप सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत हृदयरोग, अग्निकर्म, मधुमेह, ईसीजी, बीपी, नेत्ररोग, मोतीबिंदू, नेत्र तपासणी, दंतरोग, तसेच मोफत दारू, सिगरेट व गुटखा व्...

मकर संक्रांति निमित्त बोरगाव येथे विद्यासागर शिक्षण संस्थेत विविध कार्यक्रमाचे आयोजन. 14 जानेवारी रोजी नागरिक संघटनेच्या वतीने एक लाखाच्या विराट शर्यती.

इमेज
बोरगाव/प्रतिनिधी . बोरगाव येथील जिनवाणी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे विद्यासागर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात मकर संक्रांतीनिमित्त विविध स्पर्धा महोत्सव व तिळगुळ वाटप समारंभ व तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे  सदर कार्यक्रम रविवार दिनांक 12 जानेवारी पासून 14 जानेवारी अखेर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे . रविवारी 12 जानेवारी 2025 रोजी दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या  कार्यक्रमत खास महिलांच्या साठी स्मार्ट सौभाग्यवती या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे, विजेत्या प्रथम क्रमांक च्या संघास 21 हजार रुपये ची पैठणी, जिनवाणी अर्बन क्रॉप क्रेडिट सोसायटी बोरगाव यांच्याकडून देण्यात येणार आहे  द्वितीय क्रमांक स्मार्ट सौभाग्यवतीला सोन्याची कर्णफुले व तृतीय स्मार्ट सहभागीतेला सोन्याची नथ चतुर्थ क्रमांक स्मार्ट सोबतीला चांदीचा करंडा  अशी  बक्षीस देण्यात येणार आहेत,   जोडी नंबर वन या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक खास दोन साड्या चंद्ररूप कापड केंद्र यांच्याकडून देण्यात येणार आ...

बांधकाम कामगारांची वेबसाईट व पोर्टल पूर्ववत सुरू करा. संयुक्त बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निवेदन.

इमेज
इचलकरंजी - बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज  बाबतची ऑनलाईन वेबसाईट व पोर्टल कामगारांना व्यक्तिगत अर्ज दाखल करण्यासाठी बंद ठेवला आहे. तो तो सुरु करा जाहीर केलेला बोनस ( सानुग्रह अनुदान) द्या या मागणीसाठी संयुक्त बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीने आज प्रांत अधिकारी कार्यालयातील शीलेस्तेदार मा.  संजय  काटकर साहेब  व सहाय्यक कामगार आयुक्त मा जानकी भोईटे यांना निवेदन देण्यात आले  .     केवळ तालुकास्तरावर सुरू केलेल्या ठेकेदाराच्या सुविधा केंद्रावरूनच बांधकाम कामगारांचे सर्व प्रकारचे अर्ज सादर करण्याची अट आहे. येथे रोज  पन्नास कामगारांची अर्ज दाखल करण्याची  अट घालण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांना दिवसभर ताटकळत थांबावे लागते यामुळे हजारो कामगारांची कामे अडकून पडलेली आहेत.  कामगारांच्या विविध योजना पेक्षा ठेकेदारावर हजारो कोटी खर्च केले आहेत. हे केवळ मंडळाच्या  पैशाची उधळपट्टी सुरु आहे. ती थांबवावी व पुर्वीप्रमाणे ऑनलाईन पोर्टल व वेबसाईट सुरू करावी जाहीर केलेला दिवाळी बोनस ( सानुग्रह अनुदान) क...

अकिवाटचे ग्रामपंचायत सदस्य श्री शितल हळींगळे यांचा कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश.

इमेज
गुरुवार दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी समर्थ मंगल कार्यालय शिरोळ येथे इचलकरंजी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार माननीय श्री राहुल आवाडे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार, शिरोळ तालुका अध्यक्ष माननीय श्री मुकुंद गावडे, शिरोळ तालुका भारतीय जनता पार्टी चे निमंत्रक माननीय श्री रामभाऊ डांगे, उद्योजक माननीय श्री संजय पाटील,नरसिंहवाडी चे माननीय श्री मुकुंद पुजारी, माननीय श्री पोपट पुजारी, शिरोळ पंचायत समिती माजी सभापती माननीय श्री हरिश्चंद्र पाटील यांच्या उपस्थितीत अकिवाटचे ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री शितल हळींगळे सर यांनी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

संदीप सिताराम चव्हाण (वय ४५ वर्षे) यांचे आकस्मिक दुःखद निधन

इमेज
हातकणंगले - संदीप सिताराम चव्हाण रा.कोरोची चव्हाणवाडी (वय ४५ वर्षे) यांचे बुधूवारी 8 जानेवारी 2025 रोजी हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले आहे. त्यांचा बालाजी आर्टस शाॅपी असून ते नेहमी प्रमाने आपल्या दुकानात काम करत होते बुधूवारी सायंकाळी त्यांना अस्वस्त वाटू लागल्याने ते मित्रांसोबत दवाखान्यास जात असतानाच जोराचा हृदयविकाराचा झटका आला आणि वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, भावजय, पत्नी व तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. रक्षा विसर्जन रविवारी सकाळी आठ वाजता कोरोची स्मशान भूमी येथे आहे 

७० व्या कामगार नाट्य महोत्सवात परिवहन सेवेचे बीमोड' मुळासकट ! हे अव्वल नाटक दुसऱ्या क्रमांकावर !

इमेज
प्रतिनिधी- सारंग महाजन दि०११ डिसेः ले २ जाने. या दरम्यान महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडाळा च्या ७० बा नाट्यमहोत्सव नुकताच पार पडला, आणि परिवहन सेवा या नाट्यमहोत्सवात दरवर्षी भाग घेऊन बक्षीस मिळविण्याचा हिरीरीने प्रयत्न करते आणि या वर्षीच्या २०२४/२५ च्या स्पर्धेत, ठाणे महानगर परिवहन सेवेने मोहन पानसरे लिखित बीमोड" मुळांसकट ! हे वास्तववादी दोन अंकी नाटक घेऊन स्पर्धेमध्ये  दूसरा क्रमांक पटकावला, आणि पाच इतर बक्षीस निळवून भरघोस यश आपल्या पदरात पाडून घेतल ! या नाटकाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक विजय पाटील यांनी केले तर यात भाग घेणारे परिवहन सेवेचे गुणवंत कामगार कलाकार श्री. अजून नाईक, भीराम विधाटे, नरेंद्र सावेत, अशोक वाघमारे सौ. प्रतिभा घाडगे,  सुहास काकडे, शिवाजी चोरगे , शरयू कांबळे, मंगेश गायकवाड, साईराज लादे, सुजीत भोये, श्रद्धा  कदम, स्वप्नील निवाते, सुदर्शन गायकवाड, संजय राठोड, श्री, चंद्रशेखर जगताप, योगेश करंडे, संगीता सात दिवे, ललीता हकारे, अमृत वळवी, राजेश बल्लाळ, विद्या पाटील, मनीषा शेलार, प्रथमेश पाटील, या सर्व कलाकारांनी उत्कृष्ट काम करून आपआपल्या...

नवीन बदलांचा स्वीकार करीत व आव्हाने पेलत पत्रकारांची वाटचाल प्राध्यापक गोपाळ महामुनी यांचे प्रतिपादन

इमेज
शमनेवाडी येथे सदलगा विभाग पत्रकार संघाचा पत्रकार दिन साजरा. प्रतिनिधी - अमर माने  बेडकिहाळ येथील पत्रकारितेसमोर आव्हाने वाढत आहेत. सीमा भागातील पत्रकारासमोर मोठी आव्हाने असून ज्येष्ठ पत्रकारांच्या आधारावर ही संघटना कार्यरत आहे.  पत्रकारितेतील नवनव्या बदलांचा स्वीकार करीत, लेखणी सोडून आधुनिक उपकरणांचा वापर करीत, व आव्हाने पेलत निराश न होता समाज व सरकार यांच्यातील दुवा म्हणून पत्रकार कार्यरत आहेत. वृत्तपत्रातून अद्यापही सजग वार्तांकने देऊन आधुनिक युगातही पत्रकारितेचे वैभव टिकून असल्याचे प्रतिपादन बेडकिहाळ येथील प्राध्यापक गोपाळ महामुनी यांनी केले. सदलगा विभाग पत्रकार संघाच्या वतीने सदलगा शमणेवाडी दरम्यान असलेल्या अमृत गार्डन येथे आयोजित मराठी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.  महामुनी पुढे म्हणाले पत्रकारितेत कमी वेळेत अधिक पैसा मिळत नसल्याने नवी पिढी यापासून दूर जात आहे. अनेक आव्हानांचा सामना करीत व विश्वासार्हता जपत या संघटनेच्या पत्रकारांची वाटचाल सुरू आहे. पत्रकारितेमध्ये अनेक बदल झालेत व होतही आहेत.  पत्रकारांनी लेखणी सोडू...

सदलगा विभाग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मकरंद द्रविड, उपाध्यक्ष पदी वैभव खोत तर सचिवपदी अजित सुतार यांची सर्वानुमते निवड.

इमेज
बेडकिहाळ - सदलगा विभाग पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी (ता.06) रोजी शमनेवाडी येथील नुकत्याच झालेल्या अमृत गार्डन, येथे पत्रकार दीन कार्यक्रम साजरा करण्यात आला.  याप्रसंगी मावळते अध्यक्षा लीना संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ पत्रकार मार्गदर्शक सुभाष बदनिकायी,शमलिंग किल्लेदार, संतोष कामात, राजेंद्र कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत 2025 / 26 या वर्षासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव पदाची निवडीची चर्चा झाली. यावेळी संघाच्या अध्यक्षपदी मकरंद द्रविड, (सदलगा) यांची उपाध्यक्ष पदासाठी वैभव खोत, (गळतगा ) यांची तसेच सचिवपदी म्हणून अजित सुतार, (मलिकवाड) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.     याप्रसंगी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव यांचा सत्कार प्रमुख पाहुणे डॉ. गोपाळ महामुनी, बाळासाहेब शिंदे, उदय पांगिरे, व विक्रम शिंगाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. यावेळी नूतन अध्यक्ष मकरंद द्रविड म्हणाले की, सदलगा विभाग पत्रकार संघाच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबून संघाच्या आभिरूद्धी साठी सतत प्रयत्नशील राहीन, त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार नेहमी पाठीशी राहो असे ते म्हणाले. ...

पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा विविध संस्थेच्या वतीने सन्मान.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. दर्पण दिन मोठया उत्सवात साजरा. सेलू : दि. 06 सोमवार रोजी सेलू येथे पत्रकारितेचा वसा चालवत विविध घटकातील लोंकांच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या शहरातील व तालुक्यातील पत्रकारांचा दर्पण दिनानिमित्त शहरातील विविध संस्था यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून दर्पण दिनानिमित्त पत्रकाराच्या सन्मानाची परंपरा यावेळी देखील येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेच्या वतीने जोपसण्यात आली आहे.या सत्कार सोहळ्यासाठी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आढळकर,उपाध्यक्ष चंद्रशेखर मूळावेकर,संचालक तथा माजी नगराध्यक्ष पवन आढळकर,बँकेचे कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांची उपस्थिती होती.यावेळी प्रस्ताविकात रामराव लाडाने यांनी बँकेच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती देत बँकेचा लेखाजोखा सादर केला.पत्रकारांच्या वतीने डॉ.विलास मोरे आणि मोहसीन मामू यांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार मानले. अध्यक्षीय समारोपात हेमंतराव आढळकर यांनी पत्रकारांचे बँकेला असलेले सहकार्य स्पष्ट करून दर्पण दिनांच्य...

बोरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे व साबीर नदाफ यांच्या वतीने बोरगाव परिसरातील पत्रकारांचा जाहीर सत्कार.

इमेज
निपाणी तालुक्यातील बोरगाव या शहरी असणारे तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी बोरगाव परिसरात सामाजिक कार्यात एक वेगळाच ठसा उमटवला आहे त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत गोरगरिबांसाठी अन्नधान्याची मदत मजुरांसाठी ब्लॅंकेटचे वाटप वाहनधारकासाठी कमी किमतीमध्ये पेट्रोलचे वाटप विद्यार्थ्यांसाठी विमान प्रवास अशा अनेक प्रकारे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आर्थिक भरतीचा हात पुढे करणारा बोरगाव परिसरातील एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजातून ओळखला जात आहे. पत्रकार दिनाचे औचित साधून आज बोरगाव - इचलकरंजी या मार्गावरील हॉटेल ग्रँड जनता येथे बोरगाव परिसरातील पत्रकार अण्णासाहेब कदम,उत्तम माने, शिवाजी भोरे, अजित कांबळे, अशोक दुर्गमर्गे, सुयोग किल्लेदार, प्रशांत कांबळे इत्यादी पत्रकारांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन उपस्थित मान्यवर तुषार कांबळे, अण्णासाहेब कदम, मौला मुजावर, आजुबा पांगिरे, साबीर नदाफ. यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. या पत्रकार दिनाचे औचित्य  साधून घेण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सद...

स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांसाठी उत्तम दर्जाचे शिक्षण व सांस्कृतिक वातावरण अत्यंत महत्त्वाचे - शिक्षणाधिकारी बसवराजप्पा आर.

इमेज
रायबाग;   स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांसाठी उत्तम दर्जाचे शिक्षण व सांस्कृतिक वातावरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे क्षेत्र शिक्षणाधिकारी बसवराजप्पा आर.         श्री रामू मारुती यांनी शनिवारी शहरातील कुलगुडे एज्युकेशन फाउंडेशनच्या ब्राइट लँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वर्धापन दिनाच्या उद्घाटनप्रसंगी भाषण केले.          संस्थेच्या अध्यक्ष शशिकांत कुलगुडे यांनी भाषण करून संस्थेच्या विकासासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे स्मरण केले.  CRP.  आर.एम.कुराडे, अनिल सुतार, सुरेश गेन्ननवर, प्राचार्य डॉ.   प्रिशित छिब्बर, इम्रान सिंदनोल्ली, अश्विनी नावी, आनंद साने, संतोष भुई, अजय मांडिके, व शिक्षक उपस्थित होते.

46 कोटी पाणी योजनेचे काम तात्काळ सुरू करा अन्यथा मूख्याधिकारी दालनात आंदोलन करण्याचा नागरिक हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य समिती शहर प्रमुख अभिनव गोंधळी यांचा इशारा

इमेज
हुपरी प्रतिनिधी -  हुपरी शहरासाठी नगरोत्थान महाभियानातर्गत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. त्या योजनेची वर्क ऑर्डर देऊन पाच महिने झाली तरी अद्याप कामाला सुरुवात झाली नाही सुरुवातीपासूनच ही योजना फिक्सिंग टेंडर प्रक्रिये मधुन पार पाडली आहे.जास्तीत जास्त मलिदा कसा मिळवता येईल याचेच नियोजन करून या योजनेचे एकूण कामकाज आतापर्यंत झाले आहे. जाचक जिओ टॅगची अट घालून आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला टेंडर मिळावे यासाठीच तीन ठेकेदारांन जिओ टेक प्रमाणपत्र देण्यात आले होते. सर्व टेंडर हे अभाव रक्कमेने म्हणजेच टेंडर रक्कमे पेक्षा जास्त रक्कमेने भरण्यास सांगितले होते जेणेकरून टेंडर हे मूळ किमतीलाच मिळावे यासाठी हे सर्व फिक्सिंग मॅनेज टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती यामध्ये या सर्व घडामोडी करण्यासाठी प्रशासन व ठेकेदार आघाडीवर होते. ही योजना आता मॅनेज टेंडर प्रक्रियेतून झाली असल्याचे आता जनतेसमोर येत आहे. यामुळे या योजनेची चौकशी होऊन प्रशासनातील अधिकारी यांची चौकशी करून रिटेंडर करण्याची गरज होती. तरीही असे न करता दाबून रेटून वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. वर्क ऑर्डर देऊनही आता पाच महिन...

भारज ता. जाफ्राबाद जि. जालना येथे ग्रामपंचायत कार्यालयात स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन साजरा.

इमेज
भारज ता. जाफ्राबाद जि. जालना येथे ग्रामपंचायत कार्यालयात स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी दैनिक विश्वजगत चे जालना जिल्हा प्रतिनिधी तथा माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे जाफ्राबाद तालूका कार्यध्यक्ष आणि राजकिय , सामाजिक कार्यकर्ते श्री राजेश दौलतराव दामधर तसेच सरपंच पूत्र श्री शरद तेलंग्रे , शेख रफिक टेलर , श्री विजय देशमुख , समितीचे तालूका सचिव श्री ज्ञानेश्वर निकाळजे , सदस्य श्री गजानन फलफले, श्री म्हस्के मामा , श्री मंगेश उसारे , समाधान कतोरे, वॉटरमॅन श्री मधूकर बेराड , शेख असदखाँ मामू , आदी गावकऱ्यांनी उपस्थित राहून स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून फुल अर्पण केली आहे .

बालकलाकार अर्पिता भिंगारदिवे मराठीतील मोठ्या चित्रपटात वेगळ्या भूमिकेत झळकणार.

इमेज
प्रतिनिधी -सारंग महाजन.              कलेचे माहेरघर पुणे येथील प्रसिद्ध बालकलाकार अर्पिता भिंगारदिवे लहान वयातच अभिनयाची आवड असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रीतम पाटील यांच्या ॲक्ट प्लॅनेट  अकॅडमी मध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले असून  त्याचा  खूप फायदा झाला. अर्पिताने आत्तापर्यंत तीन मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी मराठीतील मोठ्या चित्रपटामध्ये वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे. आपल्या अभिनयाने संपूर्ण चित्रपट गाजवला आहे.  एवढे कमी वयात अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील  असून अर्पिताला आई-वडिलांचा पण  सपोर्ट आहे. अर्पिताच्या  अभिनयाबद्दल मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांकडून  कौतुक व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

राम नाम लेखन प्रतियोगिता पुरस्कार वितरण समारोह.

इमेज
रिपोर्टर- सारंग महाजन            ता.4 जनवरी 2025 को मासुळकर कॉलनी, पिंपरी, पुणे में प्रेरणामूर्ति भारती श्रीजी की प्रेरणा से सत्प्रेरणा ट्रस्ट द्वारा आयोजित विश्व हिंदू परिषद, बजरंग दल संत तुकाराम नगर प्रखंड और श्री गुरुदत्त सेवा मंडल के सहयोग से "राम नाम लेखन" प्रतियोगिता का पुरस्कार वितरण समारोह सम्पन्न हुआ। जिसमे बच्चो ने मिलकर 8,30,000 रामनाम लिखे। नैतिक झंवर ने 55,570 राम नाम लिखकर प्रथम स्थान प्राप्त किया, जबकि अन्य बच्चों ने भी प्रतियोगिता में उत्साहपूर्वक भाग लिया। मुख्य अतिथि श्री धनंजय गावडे, श्री विशाल मासुळकर, श्री अरविंद दीक्षित एवं श्री अर्जुन ठाकरे ने बच्चों का उत्साहवर्धन किया। बच्चों को राम नाम का महत्व और आवश्यकता बताई साथ ही उपहार और शुभकामनाएँ भी दी। सत्प्रेरणा ट्रस्ट पहले से ही ऐसे कई समाज उपयोगी कार्य कर चुका है और सत्प्रेरणा ने अब तक 311 करोड़ 50 लाख रामनाम बच्चो, युवाओं एवं वृद्धों द्वारा विभिन्न कार्यक्रमों के माध्यम से लिखवाये हैं। श्री धनंजय गावड़े ने कहा कि आगे भी ऐसे कार्य करते रहना चाहिए जिसका विश्व हिंदू परिषद, बजर...

लवकरच बांधकाम कामगारांचे ऑनलाइन पोर्टल चालु करणार : कामगार मंत्री आकाशजी फुंडकर

इमेज
मुंबई : कामगारांचे पोर्टल अद्यावत करून पुन्हा नोंदणी सुरू करावी याबाबतचे निवेदन कामगार मंत्री आकाशजी फुंडकर यांना देताना कामगार नेते अमित कदम व मान्यवर. इस्लामपूर / प्रतिनिधी :         महाराष्ट्रात कामगार सेतुमुळे तालुक्यातील सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ होत आहे.  कामगारांचा विचार करून लवकरच बांधकाम कामगारांचे पोर्टल अद्यावत करुन सुरू करावे.  याबाबतचे निवेदन कामगार नेते अध्यक्ष अमित कदम यांनी कामगार मंत्री आकाशजी फुंडकर यांना दिले. मंत्री फुंडकर यांनी लवकर पोर्टल सुरू करू असे आश्वासन दिले.          या निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्रात कामगार सेतुमुळे सर्व तालुक्यातील सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ होत आहे.  कामगारांना नियोजना अभावी रिकाम्या हातांनी मागे जावे लागत आहे. जे रोजंदारी वर काम करत आहेत त्यांना नाहक त्रास होत आहे.  बांधकाम कामगार हा प्रामुख्याने स्थायी नसतो. तो काम मिळेल तेथे जात असतो. त्यामुळे पहिली नोंदणी ज्या ठिकाणी केली आहे. त्याच ठिकाणी त्याला इतर लाभासाठी जावे लागत आहे . त्यामुळे ह...

अकिवाट गावच्या अंगणवाडी सेविका सौ सुमन बाबासो शिरगावे मॅडम व पुष्पा दत्तात्रय वाळके मॅडम याना आदर्श अंगणवाडी सेविका तसेच महिला श्रमशक्ती परिवारामध्ये उत्कृष्ठ कार्यकर्ती या पुरस्काराने सन्मानित.

इमेज
आपल्या अकिवाट गावच्या अंगणवाडी सेविका सौ सुमन बाबासो शिरगावे मॅडम व पुष्पा दत्तात्रय वाळके मॅडम याना आदर्श अंगणवाडी सेविका तसेच  महिला श्रमशक्ती परिवारामध्ये उत्कृष्ठ कार्यकर्ती या पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विशाल क्रांती न्यूजसाठी सचिन मठपती

रायबाग शहरातील महावीर कन्नड माध्य.विद्यालयात इयत्ता 1994-95 च्या माजी विद्यार्थ्यांचा गुरुवंदना व स्नेह संमेलन संपन्न.

इमेज
रायबाग: शहरातील महावीर कन्नड माध्यमिक विद्यालयात इयत्ता 1994-95 च्या वर्ग 7 च्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या गुरुवंदना व स्नेह संमेलनाचा एक भाग म्हणून "आठवणीची बोट" कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरुमातेचा सत्कार केला.   शिक्षिका निर्मला खटरे, पुष्पा मळगेन्नवर, राजश्री पाटील, अरुणा पोम्मई, सुनीता कुंदरगी, सुजाताकुमारी भंगा, कस्तुरी चौगला, व माजी विद्यार्थी उपस्थित होते. 

निराधार वृद्ध आजी आजोबांना वृद्धाश्रमाचा आधार वृद्धाच्या मदतीला धावून आले सामाजिक कार्यकर्ते

इमेज
प्रतिनिधी .सारंग महाजन. चिखली - मेहकर तालुक्यातील एका गावातील वयोवृद्ध आजी आजोबा यांना तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून दिला आश्रय  सविस्तर असे कि सदर आजी आजोबा यांना मुल मुली असून सुद्धा त्यांना कोणीही सांभाळ करू शकत नाही असे सुरेशअप्पा हाव व परसराम अंभोरे यांनी सामाजिक कार्यकर्ते हिम्मतरावं जाधव, मनोज जाधव, पत्रकार भरत जोगदंडे, दीपक साळवे, राहुल गवई व मच्छिन्द्र मघाडे यांना सांगितले तेव्हा यांनी ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम,भोकर येथे निराधार बेघर घरातून काढून दिलेले ज्यांना मुल मुली व इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांना सांभाळू शकत नाही असे आजी आजोबा,यांना सर्व सुविधा देऊन मोफत संगोपन होत आहे. येथे असलेल्या निराधार वृद्धाना चांगल्या प्रकारचे भोजन, उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक सेवा देऊन मानवाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणजे वृद्धपकाळ हा सुखद व आनंदमई जावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे असे तुकाराम आश्रय वृद्धाश्रम चे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांना बोलावून ...

खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

इमेज
शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित,खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पुजनाने व दिपप्रज्वलनाने झाली. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांचे हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजन संपन्न झाले.        यानंतर इयत्ता 7 वी ब ची विद्यार्थीनी कु.अलिशा शब्बीर अत्तार हिने आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये तिने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली.तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातुन सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती तसेच स्त्रियांच्या शिक्षणा साठी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याची माहिती आपल्या मनोगतातुन सांगितली.         या कार्यक्रमासाठी विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी,शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.हेमगिरे एस.के.यांनी केले.तर आभार श्री.समाजे सी.बी. यांनी मानले.

वाढदिवस साजरा न करता त्या पैशातून उपजिल्हा रुग्णाल्यास स्टेशनरी साहित्य भेट.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : सेलू येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवा निवृत्त कर्मचारी प्रदीप किशनराव शिंदे यांनी आपला वाढदिवस   साजरा न करता त्याला फाटा देत त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा चांगल्या कार्यासाठी विनियोग व्हावा म्हणून सेलू येथील उपजिल्हा रुग्णाल्यास अवश्यक असणारी स्टेशनरी खरेदी करून रुग्णाल्याचे अधीक्षक डॉ. जनार्धन गोळेगावकर,वैधकीय अधिकारी डॉ.कोंडावार, पत्रकार डॉ.शिवाजी शिंदे,शुक्राचार्य शिंदे, परिसेविका एम.ए.घडमोडे,कारकून दीपक बहोत,कारकून भारत गायकवाड,कारकून बाळासाहेब रोडे,सहाय्य्क अधिकारी यु.एन.काटकर,शिपाई पवन फरकांडे आदी जनाच्या उपस्थित स्टेशनरी देऊन आपला वाढदिवस साजरा केला.यावेळी प्रस्ताविक डॉ.शिवाजी शिंदे यांनी केले.तर स्टेशनरी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या या अनोख्या उपक्रमास डॉ.गोळेगावकर यांनी शुभेच्छा देत त्यांचे आभार व्यक्त केले.

जीवनात डोळ्यांची काळजी घेणे अधिक महत्वाचे.हाल शुगर उपाध्यक्ष पवनकुमार पाटील यांचे मत. कारखाना परिसरात नेत्र चिकित्सा कार्यक्रम संपन्न.

इमेज
बोरगांव / प्रतिनिधी.  सृष्टीतील सजीवांना अन्न व प्राणवायू जितका आवश्यक आहे,तितकेच डोळे असणे महत्वाचे आहे, जे जन्मापासून अंध आहेत त्यांना जग पाहण्यासाठी दृष्टीची नितांत गरज आहे मात्र दुर्लक्षामुळे अनेकांचे डोळे गेलेले आहेत. त्या कारण दृष्टी असलेल्यांनी डोळ्यांचा रक्षणासाठी वेळेवर काळजी घेणे अत्यावश्यक आहे असे मत निप्पाणीतील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पवन कुमार पाटील यांनी केले. ते साखर कारखान्याच्या वतीने आयोजित जोल्ले उद्योग समूह प्रेरणा उत्सवाच्या निमित्ताने  कारखाना व अंकुर हॉस्पिटल निपाणी कोल्हापूर यांच्या वतीने कारखान्याच्या परिसरातील कामगारांच्या साठी नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते       प्रारंभी धनवनत्री देवीचे पूजन उपस्थीत मान्यवर व नेत्र शिबिराचे डॉक्टर्स,कारखाना चे MD, अप्पासाहेब शिरगावे यांच्या हस्ते करण्यात आले.       पुढे म्हणाले बोलतांना पाटील म्हणाले की माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या  मार्गदर्शनाखाली आमच्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या करिअरच्या विकासासाठी अनेक य...

रायबाग शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने वाहनधारक व नागरिक त्रस्त.

इमेज
रायबाग : शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने वाहनधारक व नागरिक त्रस्त आहेत. आठवड्याच्या पवित्र सोमवारी गावातून जाण्यासाठी चकरा माराव्या लागतात.  सांता डेच्या दिवशी फळ विक्रेते व गाड्यांवर विक्री करणारे विक्रेते चिंचली रोड आणि हारुगेरी-अंकली मुख्य रस्त्यावर आपला व्यवसाय करतात, त्यामुळे वाहनधारकांना, लोकांना, शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी खूप त्रास होतो.  अलिकडे विक्रेत्यांनीही बसस्थानकालाच आपला व्यवसाय थाटल्याने बसस्थानकाच्या आतील बसेसना ये-जा करण्यासाठी गंभीर समस्या निर्माण होत असून, प्रवाशांचेही हाल होत आहेत. शहरातील मुख्य रस्त्यालगत बँका व हॉटेल्स असल्याने व येथे पार्किंगची नीट व्यवस्था नसल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर बेशिस्तपणे दुचाकी पार्क करतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते.  सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने उसाने भरलेले ट्रॅक्टर शहरातील रस्त्याच्या मधोमध अडकल्यास इतर वाहनांना तासनतास उभे राहावे लागते.  अशा वेळी रुग्णवाहिकेसारख्या अत्यावश्यक वैद्यकीय वाहनांचा पुरवठा कमी असल्याने रुग्णांचे रस्त्यावरच हाल होतात.  संत दिनानिमित्त वा...

नवनिर्वाचित कुडची होबळी कसाप अध्यक्ष संतोष सनदी यांचा रायबागचे आम.दुर्योधन ऐहोळे यांच्या हस्ते सतकार.

इमेज
रायबाग : तालुक्याचे नवनिर्वाचित कुडची होबळी कसाप अध्यक्ष संतोष सनदी यांचा रविवारी रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांच्या हस्ते त्यांच्या गृहकार्यालयात सत्कार करण्यात आला.    तालुका कसाप अध्यक्ष रवींद्र पाटील, एस.एस.कांबळे, अरुण ऐहोळे, शंकर कास्ती, टी.एस.वंतगुडी, सुखदेव कांबळे, रमेश पाटील, अब्बास लतीबवनावर, एम.एस.बलवड, नंदेश कांबळे, गुलाब सय्यद, गजानन माळी, बाबू होसट्टी आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दहावीचे वर्गमित्र तब्बल २१ वर्षांनंतर आले एकत्र

इमेज
पारडगाव : अनेकांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा घनसावंगी प्रतिनिधी शालेय जीवन म्हणजे सर्वांसाठी एक प्रकारचा सुवर्णकाळ असतो.माणुस वय,पद, किंवा संपत्तीने कितीही मोठा असला तरी त्याला त्याचे शालेय जीवन आठवत असतो.अशाच प्रकारे शालेय आठवणींना उजाळा देण्यासाठी घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील सन २००२-२००३ या शैक्षणिक वर्षांतील दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधत स्नेहमेळावा घेतला. यावेळी वर्गमित्रांनी तब्बल एकवीस वर्षांपुर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.व चालू वर्तमानकाळात कोण काय करतो याबाबत देखील एकमेकांशी संवाद साधत होते.शेवटी सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत यापुढे देखील प्रत्येकवर्षी स्नेहमेळावा आयोजित करण्यात येईल,असा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष खोसे, दत्तात्रय खिल्लारे, संजय कामठे, सेवानिवृत्त शिक्षक टी.बी.जईद, अनिल माकोडे,रविंद्र आकणीकर,खरात, सचिन बाहेकर, राजेश नवल, मुकुंद खंदारे यांच्यासह विद्यार्थी गोविंद उफाड, ओमप्रकाश हजारे, सोमनाथ हजारे, रमेश सुरशे,मंगल ढेर...

शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था वर्धापनदिन उत्साहात संपन्न.

इमेज
शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कुल,खोतवाडी येथे संस्था वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाची सुरवात आचार्य प.पु.108 शांतीसागर महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने व दिपप्रज्वलनाने झाली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजन संपन्न झाले.          यानंतर विद्यालयाचे अध्यापक श्री.हेमगिरे एस.के.यांनी आपल्या मनोगतातुन संस्थे विषयी माहिती सांगितली.यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातुन संस्थेनी केलेल्या कार्याची,संस्थेमध्ये राबलेल्या उपक्रमाविषयी माहिती आपल्या मनोगतातुन व्यक्त केली.तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा यांनी आपल्या मनोगतातुन  संस्था वर्धापनदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.तसेच संस्था वर्धापन दिना निमित्त विद्यालयामध्ये देशभक्तीपर गीत-गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.      या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी,...

नूतन कन्या प्रशालेने रूजवली जीवनमूल्ये.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. डॉ.इच्छा शिंदे यांचे प्रतिपादन, सेलूत माजी विद्यार्थिनी मेळावा उत्साहात.  सेलू : अभ्यासक्रम पूरक उपक्रमातून विद्यार्थिनींचा व्यक्तिमत्व विकास करतानांच आमच्या वरती माणूस  घडवि ण्याची जीवनमूल्ये रूजवली. तसेच चारित्र्य, त्याग नम्रता या संस्कारातून आम्ही घडत गेलो म्हणूनच आज आम्ही वेगवेग ळ्या क्षेत्रात स्वाभिमा नाने उभे आहोत, असे प्रतिपादन पहिल्या बॅचच्या माजी विद्यार्थिनीप्रा.डॉ.इच्छा शिंदे यांनी रविवारी, २९ डिसेंबर रोजी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त २८, २९ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थिनी मेळाव्यात विविध कार्यक्रम झाले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया होते. व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उद्योजक रामप्रसाद घोडके, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, उपाध्यक्ष डी.के.देशपांडेगुरुजी सहसचिव जयप्रकाश बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोर बाहेती, प्रकाशच...

प्रत्येकाच्या आरोग्यासाठी मधु तारा प्रत्येकांसाठी

इमेज
प्रतिनिधी -सारंग महाजन दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आणि आम्ही गोराईकर जागृत संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पश्र्चिम मुंबई बोरिवली येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिर पार पडले. मधु तारा आरोग्य समिती प्रमुख श्री रमेशजी शेळके यांच्या माध्यमातून भक्ती वेदांत हॉस्पिटल मिरा रोड यांच्या सहकार्याने शिबिर नियोजित करण्यात आले.या वेळी असंख्य गोराईकर यांनी आपल्या आरोग्याची तसेच नेत्र तपासणी करून घेतली.  या वेळी मधु तारा फाउंडेशनच्या पद नियुक्ती करण्यात आली.हाई कोर्ट एड योगिता सावंत यांना पश्चिम मुंबई उपाध्यक्षा.प्रेरणा राणे यांना गोराई बोरिवली उपाध्यक्षा.अर्चना चव्हाण यांना बोरिवली गोराई अध्यक्षा या पदावर नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी गुरुवर्य श्री धनंजय पवार सर.सामाजिक कार्यकर्ते श्री हुसैन भाई.श्री उमेश महाडिक.रुग्ण अधिकार परिषद प्रमुख श्री सुनील शेजवळ.तसेच असंख्य आम्ही गोराईकर जागृत संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी मधु ताराच्या कार्याची प्रशंसा गोराईकर पदाधिकारी यांनी केली. श्री धनंजय पवार साहेब.श्री सुनील शेजवळ सर.श्र...

क्रांतीसुर्य फाऊंडेशन कोल्हापुरच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने दिपक शेवाळे याना सन्मानित

इमेज
क्रांतीसुर्य फाऊंडेशन कोल्हापुर यांच्यातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार 2024 दिपक शेवाळे याना सन्मानित करण्यात आले. माजी.जी पं.सदस्य मा.राजेंद्र पवार(वडर) , उद्योजक युवराज कोळी, सौ.मनिषा नाईक, सौ.हर्षदा परिट (महसूल सहाय्यक मुंबई), संस्थेचे अध्यक्ष विशाल मोरे, उपाध्यक्ष योगेश दाभाडे व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.  दीपक शेवाळे यानी आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यापैकी त्यानी आडी येथे 2018 पासून 'एक दिवस समाजासाठी' या उपक्रमातून दर रविवारी शालेय मुलाना योग्य मार्गदर्शन करणे, शालेय   आभ्यासासोबत भौगोलिक माहिती मिळावी व योग्य संस्कार व्हावेत यासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत. गावातील आंबेडकर भवनची वेळोवेळी स्वच्छता करणे असे काम केले आहे. तसेच कोरोना काळात घरोघरी जाऊन योग्य माहिती देवून लोकांच्या मनातील भिती काढण्याचे कामं त्यानी केले आहे. त्यानी आजपर्यंत संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित शाळा व विविध गावात अनेक व्याख्यानद्वारे समाजाला जागृत करण्याचे काम केले आहे. निपाणीसह परीसरातील सामाजिक चळवळीमध्ये न...

नूतन कन्या प्रशालेच्या परिसरात रमल्या माजी विद्यार्थिनी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. वर्ग मैत्रिणींसह गप्पागोष्टी, खेळातून जागवल्या आठवणी. सेलू : येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थीनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पहिल्या दिवशी शनिवारी ( दि. २८ ) माजी विद्यार्थीनी शाळेत दाखल झाल्या. शालेय परिसर, आपल्याला शिकवत असलेले शिक्षक, वर्ग मैत्रिणींना पाहून एकाच वेळी माजी विद्यार्थीनीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले तर, डोळ्यात नकळत पाणीही तराळले.शाळे च्या प्रवेशद्वारावर आजी विद्यार्थीनींनी माजी विद्यार्थीनींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.नूतन कन्या प्रशालेच्या १९७४ ते २०१५ या वर्षातील दहावीच्या बॅचच्या हैदराबाद, करिमनगर, मेहकर, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, परतूर, नाशिक, वाशिम, नांदेड, बार्शीसह राज्यभरातून आलेल्या जवळपास ७६२ माजी विद्यार्थीनींची नोंदणी पहिल्या दिवशी झाली. माजी विद्यार्थीनींनी उत्साहात प्रार्थना, राष्ट्रगीत म्हटले. आपण शिकत असलेल्या वर्गात जाऊन वर्ग मैत्रिणींसह गप्पागोष्टी करत जुन्या आठवणी ताज्या केल्या. संगीत खुर्ची, गोळाफेक, थ...

निडगुंडी येथील विवाहित महिला तिच्या २ वर्षांच्या मुलीसह बेपत्ता.

इमेज
रायबाग : तालुक्यातील निडगुंडी गावातील विवाहित महिला तिच्या २ वर्षांच्या मुलीसह बेपत्ता आहे.  निडगुंडी गावातील कविता तुकाराम बास्कर (२८) ही बेपत्ता विवाहित महिला आहे.  19 डिसेंबरला सकाळी कुणालाही न सांगता ती पतीच्या घरातून निघून गेली आणि परत आलीच नाही.    ती 5 फूट 4 इंच उंची, बांधणीत मजबूत, गोरा रंग, गोलाकार चेहरा, तिच्या उजव्या हाताला कविता-तुकाराम आहे, घरातून बाहेर पडताना सोनेरी रंगाची ब्लाऊज, लाल साडी नेसले, कन्नड, मराठी भाषा बोलते.