पोस्ट्स

एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश सिबीएसई स्कूल ची सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.      सेलू : दि.13 सिबीएसई बोर्ड दिल्ली द्वारा आज दहावी या वर्गाचा निकाल घोषित केला. यावर्षी एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश सिबिएसई शाळेतून प्रथम ऋग्वेद कीर्तने 97.2%, द्वितीय वरद कदम 96.8%, तृतीय इशिका पवार 96%, वरद सारडा  95.6%, प्रथमेश लाहोटी 95.4%, रामप्रसाद काळे 94.6 %, तेजस मोगल 94.2% पूनम पारपीयानी93.8% , लक्ष्मीकांत कुलकर्णी 93.6%, तनिष्क ढालकरी  93%, रोहित ढगे  93%,  सुमित संगेवार 92%, आदिती आवटे  92 %, स्नेहा घुमरे 91.8%, गौरी रोकडे 91.2%, तनय मोगल 91%, अपूर्वा मोगल 90.4% यांनी अनुक्रमे गुण प्राप्त केले.90 % च्या वरती एकूण 16 विद्यार्थी आहेत, 80% च्या वरती 16 विद्यार्थी, 70% च्या वरती 8 विद्यार्थी, 60 % वरती 8 विद्यार्थी आहेत.या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे सचिव डॉ सविता रोडगे, डॉ आदित्य रोडगे, डॉ अपूर्वा रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, नारायण चौरे, बाजीराव मोगल, रीना ठाकूर सर्व शिक्षक कर्मचारी यांनी गु...

साईबाबा बँकेला भारतरत्न सहकारिता सन्मानित.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  भारतरत्न सहकारिता सन्मान - 2024. सेलूतील साईबाबा बँकेला सर्वोत्कृष्ट संचालकासह दोन पुरस्कार.  सेलू : सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेला भारतरत्न  सहकारिता सन्मान 2024 अंतर्गत बेस्ट डायरेक्टर ऑफ द ईअर आणि बेस्ट डिजिटल पेमेंट इनीशेटिव्ह, असे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. अध्यक्ष हेमंतराव आढळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांनी ही माहिती दिली.भारत को ऑपरेटिव्ह बँक मुंबई या संस्थेच्यावतीने  साईबाबा बँकेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दि. 22 मे रोजी मुंबई  येथील हॉटेल ललित येथे आयोजीत  सभारंभात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, असे लाडाने साहेबांनी सांगितले आहे. दरम्यान पुरस्काराबद्दल अध्यक्ष हेमंतराव आढळकर आणि साईबाबा बँक संचालक मंडळ,अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विवीध क्षेत्रातील मान्यवरां कडून  अभिनंदन आणी कौतुक होत आहे.

सेलूत श्रीपरशुराम जन्मोत्सव शोभायात्रा उत्साहात.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   पालखी मिरवणूक, सजीव देखाव्यांसह महिलांचा मोठा सहभाग. सेलू : भगवान श्री परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त सेलू् शहरात शुक्रवार १० मे रोजी सायंकाळी श्री परशुरामांच्या भव्य प्रतिमेसह पालखी मिरवणूक व शोभायात्रा उत्साहात संपन्न झाली.येथील श्री परशुराम जन्मोत्सव समिती, सर्वशाखीय, बहुभाषिक ब्राह्मण समाज बांधवांच्या वतीने भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शुक्रवारी सकाळ पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जन्मोत्सवानिमित्त श्री गायत्री माता मंदिरात सकाळी सात वाजता भगवान श्री परशुराम यांच्या मूर्तीला महा अभिषेक करण्यात आला.यावेळी शहरा तील वेदशास्त्र संपन्न ब्रम्हवृदांच्या उपस्थिती त महाभिषेक व मंत्र उच्चारासह जय घोषांनी परिसरात उत्साह संचारला होता. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता  श्री केशवराज बाबा साहेब महाराज मंदिरापासून ढोल व ताशांच्या गजरात शोभायात्रा व पालखी मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली. मंदिर संस्थानचे विश्वस्त वामनराव मंडलिक व सुधीर मंडलिक यांच्या हस्ते भगवान श्री परशुराम यांच्या मूर्तीचे तसेच प...

मोहमद रफिक सर यांचा सेवा (शिक्षक )निवृत्त झाल्या बद्दल सत्कार.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.    सेलू :-दि. 09 रोजी सेलू येथील गुलमोहर कॉलनी येथे मुस्लिम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी च्या वतीने सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील  मोहंमद रफिक सर हे नियत वयोमानानुसार शिक्षक या पदावरून सेवा निवृत्त झाले आहे त्यांनी शेवली येथील अलिजोहर उर्दू हायस्कुल सस्था  मध्ये 30 वर्ष कार्य केले  उपस्थित मान्यवरानी शिक्षक रफिक सर यांनी केलेल्या सेवेचा आणि त्त्याच्या कार्याचा गुण गौरव केला. या त्याच्या सेवानिवृत्ती चा दिवस म्हणजे एक त्यांना सन 2024 मध्ये ते  पवित्र हज यात्रा ला नंबर लागला आहे. हे त्याच नशीब म्हणावं लागेल. त्याचा सेवा निवृत्ती चा काळ आनंदात व चांगले आरोग्य लाभो या साठी शुभेच्छा दिल्या व मान्यवराचे हस्ते त्यांना हार शाल मक्का मदीना चे फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार ला उत्तर देताना रफिक सर म्हणाले कि मला सेलू शहरातील काही वरिष्ट लोक व मित्रा चे वेळो वेळी मिळालेले मार्गदर्शन व सहकार्य ते मी शिक्षक पदाचे सेवा यशस्वी रित्या पार पाडू शकलो यशस्वी सहकार्य मिळणे अतिशय महत्वाचं आहे माणसाने आपल्या जीवनात...

कबड्डीतून खेळाडूंना भविष्य घडविण्याची संधी : अमरसिंह पाटील बाल शिवाजी मंडळाच्यावतीने उन्हाळी कबड्डी प्रशिक्षणास सुरुवात

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी : गेल्या काही दिवसापासून कबड्डी खेळाला विशेष व्यासपीठ मिळाले आहे देशातील कबड्डी प्रो या स्पर्धेत ग्रामीण भागातील अनेक खेळाडू चमकत आहेत त्यामुळे कबड्डीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन या परिसरातील खेळाडूंनी आपले भविष्य घडवण्याची संधी प्राप्त करून घ्यावी असे आवाहन बाल शिवाजी मंडळाचे उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले  येथील बाल शिवाजी मंडळाच्या वतीने दहा दिवसाचे उन्हाळी कबड्डी प्रशिक्षण शिबिरास मंडळाचे उपाध्यक्ष अमरसिंह पाटील व अध्यक्ष रावसाहेब देसाई सचिव प्रा आण्णासाहेब माने गावडे यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली यावेळी अमरसिंह पाटील हे उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करत होते  बाल शिवाजी मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब देसाई म्हणाले की लहानपणापासूनच खेळाडूंना मैदानी खेळाची आवड असणे गरजेचे आहे भविष्यात कबड्डीतून आपले करिअर उज्वल घडेल यासाठी कबड्डी प्रशिक्षणाची गरज आहे मंडळाने आयोजित केलेल्या या प्रशिक्षण शिबिराचा सर्वांनीच लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले  मंडळाचे सचिव प्रा आण्णासाहेब माने गावडे यांनी उपस्थित खेळाळून कबड्डी...

यड्राव येथे 74 . 16 % मतदान झाले . शांततेत मतदान पार पडले .

इमेज
यड्राव (प्रतिनिधी ) येथे लोकसभा निवडणूकीच्या झालेल्या मतदानामध्ये यड्रावमध्ये 6792 एकूण मतदानापैकी 5037 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला . यामध्ये 74 . 16 % मतदान झाले .                               सकाळ पासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मोठया रांगा लागल्या होत्या . सर्व मतदान केंद्रावर चूरशीने मतदारांनी मतदान केले . काही ठिकाणी मतदारांचे मतदारयादीमध्ये फोटो वेगळे असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आले नसल्यामुळे काही मतदार नाराज व्यक्त करत असल्याची चर्चा ऐकावयास येत होती .

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघासाठी रायबाग आणि कुडची मतदारसंघात मंगळवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

इमेज
रायबाग : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघासाठी रायबाग आणि कुडची मतदारसंघात मंगळवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.  सायंकाळी ५ वाजेपर्यंत कुडची मतदान केंद्रावर ६९.३३ टक्के तर रायबाग मतदान केंद्रावर ६९.९७ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.  आज झालेल्या मतदान प्रक्रियेत युवक, युवती व महिलांनी उत्साहात मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.  सकाळपासून दुपारपर्यंत मोठ्या संख्येने मतदारांनी मतदानात सहभाग घेतला, दुपारी कडक उन्हामुळे मतदानाचा वेग मंदावला होता, सायंकाळी पुन्हा मतदानाची लगबग सुरू होती, मोठ्या संख्येने मतदारांनी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. 

खोतवाडी तारदाळात शांततेत मतदान, खोतवाडीत 68% टक्के, तर तारदाळात 70% मतदान

इमेज
विशालक्रांती वृतसेवा - हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा हक्काचा खासदार निवडीसाठी लागलेली निवडणूक प्रक्रिया आज मंगळवार दिनांक 7 मे रोजी सकाळी सात वाजले पासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खोतवाडी तारदाळ येथे सकाळपासूनच प्रत्येक बुथवर मतदान करण्यासाठी पुरुष आणि महिलांनी मतदारांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. खोतवाडीत  एकूण 4028 मतदार असून 2739 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 68% मतदान झाले तर, तारदाळ येथे 11536 मतदार असून 8087 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच एकूण 70% मतदान झाले.           मतदान केंद्र 23 - एकूण मतदान 1440 पैकी झालेले मतदान 967,  केंद्र क्रमांक 24 - एकूण मतदान 1377 पैकी झालेले मतदान 955,  तर केंद्र क्रमांक 25 - एकूण मतदान 1211 पैकी झालेले मतदान 817 असे एकूण 2739 मतदान झाले. तारदाळ केंद्रनिहाय झालेले मतदान असे,       क्रमांक १४ - एकूण १२०६  पैकी झालेले मतदान  ८५३,     ...

सचखंड एक्सप्रेसच्या मार्गात तात्पुरता बदल.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  परभणी : दि.06 उत्तर रेल्वे विभागाच्या कार्यक्षेत्रात विवीध जिल्ह्यातील  आंदोलनांमुळे काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकांवर त्याचे परिणाम उमटले असून सातत्याने रेल्वे उशिराने धावत आहे  त्यामुळे नांदेड-अमृतसर-नांदेड या सचखंड एक्सप्रेसच्या मार्गात सुध्दा रेल्वे विभागाने सहा दिवसांसाठी तात्पुरता बदल केला आहे.7 मे रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 127145 हुजूर साहिब नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस सकाळी 9.30 ऐवजी दुपारी 3 वाजता सुटणार आहे. तर 4 ते 9 या दरम्यान नांदेड अमृतसर एक्सप्रेस जाखल, धुरी व लुधियाना मार्गे धावणार आहे. तर अमृतसर-नांदेड एक्सप्रेस लुधियाना, धुरी व जाखल मार्गे परतीचा प्रवास करणार आहे. नांदेड ते जम्मुतावी एक्सप्रेस 10 मे रोजी जाखल, धुरी आणि लुधियाना मार्गे धावणार आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली.

रासायनिक खतांच्या किंमती तातडीने कमी करा. दबाव गटाची मागणी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : दि 06 सध्या सगळीकडे खतांच्या किमती वाढत असल्याचे विविध प्रसारमध्यमांवर दिसत आहे.यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात असतांना रासायनिक खतांची भाववाढ ही शेतकऱ्यांना धसका देणारी आहे.त्यामुळे तातडीने ही भाववाढ रद्द करण्याची मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने आज दि 06 मे रोजी कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.  तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आधीच अपूरा पाऊस तर कधी अवकाळी पाऊस याने शेती व्यवसाय संकटात आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण आहे. त्यात पुन्हा शेत मालाला भाव नाही. चोहोबाजूने शेतकरी पिळून काढला जात आहे.त्यात आता पुन्हा रासायनिक खतांच्या किंमतीत विनाकारण भरमसाठ वाढ करण्यात आल्याच्या बातम्या सातत्याने चालू आहेत. त्यात दिसणारी भाववाढ ही अत्यंत अन्यायकारक आहे. शासनास व खत, औषधी कंपन्यांना शेती व्यवसाय बंद करायचा की काय?अशी अवस्था निर्माण झाली आहे तसेच खरीप हंगामापूर्वी ही केलेली भाववाढ तात्काळ रद्द करण्यात यावी त्याच प्रमाणे पूर्विच्याच दरात खरीप हंगामात पुरेसा व  दर्जेदार खत, औषधी पुरवठा करण्याब...

बावन सौंदत्ती येथे ट्रॅक्टर, दुचाकीच्या धडकेत एकजण जागीच ठार.

इमेज
रायबाग : तालुक्यातील बावन सौंदत्ती गावात शनिवारी सायंकाळी ट्रॅक्टरची धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.  दुचाकीस्वार वसंत बाबासाहेब देसाई (६४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  ते पत्नी व नातवासोबत रायबाग येथून स्वा गाव सौंदत्तीकडे जात असताना चिंचाळीकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.  दुचाकीवर असलेली पत्नी व नातू सुरक्षित बचावले.  याप्रकरणी रायबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संविधानाच्या विरोधात बोलणारे आणि संविधान बदलण्याचा दावा करणारे भाजपचे केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे उमेदवार देशद्रोही - हिम्मडी.

इमेज
रायबाग : देशाची अस्मिता आणि आत्मा ही संविधानच आहे. संविधानाच्या विरोधात बोलणारे आणि संविधान बदलण्याचा दावा करणारे भाजपचे केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे उमेदवार देशद्रोही आहेत. अशा जनविरोधी भाजपला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करून काँग्रेस पक्षाला सत्तेत आणले पाहिजे, असे डॉ. यल्लप्पा हिम्मडी हाक मारली.        ते शनिवारी चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील सिद्धपूर गावातील चेन्नडसर येथील सामुदायिक सभेत बोलत होते. या वेळी संविधानाच्या रक्षणासाठी, संविधानाच्या अस्तित्वासाठी, आपल्या सर्व हक्कांच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना विजयी करण्याची विनंती केली. .    गाव पक्षाचे सदस्य कल्लाप्पा गनीगेरा, जिल्हा भटक्या विमुक्त अंमलबजावणी समितीचे सदस्य उदय गनिगेरा, नेते नारायण अक्केनवरा, परप्पा गनीगेरा, लक्ष्मव्वा अक्केनवरा, दुर्गव्वा कामशेट्टी, रुक्माव्वा दलवाई, हनुमंता अक्केननावारा, तानाजी अक्केननावारा, तानाजी अक्केनवारा, पराप्पा गनिगेरा वारा, प्रा. सदाशिव गनीगेरा, हनुमंत...

पी.एम.श्री जि. प. कें. प्रा. शा. मानवत, शाळेची, स्कॉलरशिप परीक्षेत उत्तुंग भरारी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   पाचवी चे 35 व आठवीचे 11 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र. मानवत : मानवत तालुक्यातील पी.एम.श्री. जि. परिषद  के.प्राथमिक शाळेची महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येत असणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये  46 विद्यार्थीची निवड झालेली आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये जि. प.के.प्राथमिक शाळा  ही एकमेव शाळा आहे ज्या शाळेच्या एकूण 46 विद्यार्थ्यांची निवड या परीक्षेमध्ये झालेली आहे. माध्यमिक शिष्यावृती परीक्षा इयत्ता आठवी 11 विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप परीक्षेमध्ये निवड झाली आहे. तसेच इयत्ता पाचवी च्या 35 विद्यार्थ्यांची   निवड झालेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळेतील शिक्षकांनी अतिरिक्त वेळ देऊन शाळेमध्ये स्कॉलरशिप परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली होती. या मध्ये  इ.पाचवीतील  विद्यार्थी 1)हर्षदा दीपक अंबुरे -172, 2)शिवम शंकर शिंदे-196, 3)रोहित संजय कुऱ्हाडे -166, 4)केतकी संदीप पवार -200, 5)जय नारायण कोरेबैनवाड -142, 6)रामेश्वर भागवत शिंदे -124, 7)श्लोक शाम लिपारे-224, 8)शिवम राम दगडू -210, 9)अंजली ...

राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत शौर्या पाटील प्रथम

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी : युनिक स्कॉलर अबॅकस कोल्हापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत शिरोळमधील स्मार्टकीड अबॅकसची विद्यार्थिनी कु शौर्या जगदीश पाटील हिने सी 3 या विभागात प्रथम क्रमांक मिळवला  कोल्हापूर येथील अक्षता मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत विविध राज्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता शौर्या पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवत शिरोळचा नावलौकिक केला  डॉ श्रद्धा जवारजल वर्षा दलिंबकर हरिहर ॲडवोकेट्स असोसिएशन दावणगिरीचे माजी अध्यक्ष ॲड रुद्रगोंडा पी यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शौर्या पाटील हिला गौरविण्यात आले  शौर्या पाटील ही शिरोळचे माजी सरपंच व शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्व गजाननबापू पाटील यांची नात आहे तिला स्मार्टकीड अबॅकसच्या शिक्षिका सौ मनीषा कुंभार यांचे  मार्गदर्शन लाभले सदर क्लासमधील 34 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते त्याबद्दल त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच शौर्या पाटील हिचे वडील डॉ जगदीश पाटील आई अध्यापिका सौ जयश्री पाटील यांचे प्रोत्साहन लाभले तिच्य...

चिक्कोडी लोकसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील दिग्गेवाडीत पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार

इमेज
रायबाग प्रतिनिधी  चिक्कोडी लोकसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील दिग्गेवाडी गावातील माने व चौघाला मळ्यात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात आला.  मोसाळी जमादार जावेद मुल्ला बाबाला जमादार माजी ग्रामपंचायत अध्यक्ष आझाद जमादार सिद्ध सलागरे चिदानंद म्हैशाळे मारुती नगराळे बंडगर गजानना चौगुला महादेव बंडगर कृष्णाप्पा सागरे शंकरा सागरे बाबासाहेब जमादार कृष्णाप्पा सलागरे आदी मान्यवर उपस्थित होते.

धरणगुत्ती चोरीचा 24 तासात लागला छडा तिघांना अटक 5 लाखाचा ऐवज जप्त : रोहिणी सोळंके

इमेज
जयसिंगपूर: प्रतिनिधी : धरणगुत्ती (ता शिरोळ) येथील गोसावी टेक खंडोबा मंदिरासमोर राहणाऱ्या श्रीमती पुनम अभिजीत पवार यांच्या घरात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शिरोळ पोलिसांना अवघ्या 24 तासात यश आले  तिघांना अटक करून त्यांच्याकडून 5 लाख रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे संशयित आरोपींना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने 3 मे 2024 अखेर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके यांनी पत्रकार परिषदेत दिली  सोळंके म्हणाल्या की धरणगुत्ती येथील पुनम अभिजीत पवार यांच्या 25 एप्रिल ते 28 एप्रिल 2024 च्या मुदतीत बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील तिजोरीचे लॉक मोडून 5  लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केली असल्याची फिर्याद दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी शिरोळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती या चोरीचा तपास शिरोळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने सुरू केला असता गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या 24 तासात प्रवीण सुभाष गाडीवडर वय 30 वर्षे रा...

डॉ.बी.आर.आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही, विधान परिषद सदस्य चालवादी नारायणस्वामी

इमेज
रायबाग प्रतिनिधी - (संभाजी चव्हाण) .बी.आर.आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही, असा आरोप विधान परिषद सदस्य चालवादी नारायणस्वामी यांनी केला, काँग्रेस पक्ष खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहे.  बुधवारी शहरातील महालिंगेश्वर शैक्षणिक संस्थेत चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारासाठी आलेल्या भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना त्यांनी राज्य काँग्रेस सरकारने हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी प जातीसाठी राखून ठेवलेला पैसा वापरल्याचा आरोप केला. .  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या प्रत्येक योजना सर्व जातीधर्माच्या लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे.  अण्णासाहेब जोल्ले यांना आणखी एक मोदी पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन भाजपच्या कामगिरीची माहिती द्यावी.  आमदार दुर्योधन ऐहोळे, चिक्कोडी जिल्हा भाजप अध्यक्ष सतीश आप्पाजीगोला, रायबाग मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाधव, बाबासाहेब केंचन्नावर,  राजशेखर खंडाळे, शिवानंद नवनाळे, मनोजकुमार मनागु...

सेलू शहरातील समस्या बाबत आमदार मेघना बोर्डीकर यांनी घेतला आढावा.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.    नगरपरिषद, विजवितरण अधिकाऱ्यासोबत बैठक संपन्न.  सेलू : सेलू येथील  रामप्रसाद बोर्डीकर यांच्या निवासस्थानी शहरातील स्वच्छता, वीज समस्या बाबत रामप्रसाद बोर्डीकर यांनी आढावा घेतला. सेलू शहरातील तुंबलेल्या नाल्या मच्छर फवारणी आणि हेमंत नगर, झाकीर हुसेन नगर, शिवाजीनगर नाल्या लगत चा भाग या ठिकाणची नाल्याची साफसफाई करण्यात यावी. व तसेच सेलू शहरात लोमकळलेल्या तारा तिच्या खांद्यावर आलेले झाडे यांची कटाई करावी व लाईन जाणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदार मेघना दीदी बोर्डीकर यांनी दिल्या.या बैठकीस नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास जाधव ओ.एस. मल्लिकार्जुन स्वामी, स्वच्छता निरीक्षक व महावितरण चे प्रवीण थोरात यांची उपस्थिती होती.यावेळी एडवोकेट दत्तराव कदम, अशोक अंभोरे, कपिल फुलारी, गणेश काटकर, संदीप बोकन, गणेश गोरे, कृष्णा गायकवाड, अशोक शेलार आदींची उपस्थिती होती.

देऊळगाव गात येथे मराठा आरक्षण आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मनोज जरांगे पाटील यांनी दिली सांत्वन पर भेट.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.      सेलू : सेलू तालुक्यातील  देऊळगाव गात येथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरागे पाटील यांनी दिनांक एक मे रोजी दुपारी 3:30 दरम्यान मराठा आरक्षण मिळावे याकरिता दि. 16 एप्रिल रोजी  देऊळगाव गात येथील बाबासाहेब  गायकवाड यांनी पळसाच्या झाडाला स्वतःच्या शर्टाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानिमित्ताने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या आई- वडिलांची भेट घेऊन चौकशी करून  कुटुंबाला धीर दिला.  मराठ्यांच्या मुलांनी रडायचे नाही तर लढायचे असे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी जाता जाता  उपस्थित मंडळींना व तरुणांना मराठा आरक्षण मिळावे यासाठी रडायचे नाही तर लढायचे कोणीही आत्महत्या करू नये. आत्महत्या केल्यामुळे आई-वडिलांना काय दुःख होते त्या कुटुंबावर काय दुःख कोसळते हे सहन होणे शक्य नाही.  त्यामुळे रडायचे नाही तर लढायचे असा मोलाचा संदेश दिला.

पि.एस.कौसडीकर सेवानिवृत्त

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेवागौरव सन्मान. सेलू : सेलू दि.30 एप्रिल मंगळवार रोजी शहरातील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय येथील माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक पि. एस. कौसडीकर सेवानिवृत्त झाल्याबद्दल शहरातील सामाजिक कार्यकर्ते आपला_माणूस सुनिल गुलाबराव गायकवाड, सतीश जाधव अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष, प्रशांत ठाकूर सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने सेवानिवृत्त निमित्त्त सेवागौरव सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय नागरे,मुख्याध्यापक बालासाहेब हळणे, शेषराव कौसडीकर, शोभा कौसडीकर, पल्लवी कौसडीकर सिध्दार्थ एडके आदि उपस्थित होते.  या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, प्रदिप शेषराव कौसडीकर सर नियत वयोमानानुसार आज दि. ३०एप्रील २०२४ रोजी आपण मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होणार आहात. आपल्या एकंदरीत तीस वर्षाच्या सेवाकार्यात आपण विद्यार्थिप्रिय शिक्षक, उत्तम मार्गदर्शक, सहकार्य पूर्ण मुख्याध्यापक असा ठसा उमटवलेला आहे.सामाजिक, सांस्कृतिक कार्यात आपण सर्वतोपरी सहभाग नों...

शिरटीत श्री भैरेश्वर यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक उत्साहात

इमेज
जयसिंगपूर प्रतिनिधी: शिरटी( ता शिरोळ) येथील जागृत ग्रामदैवत श्री भैरेश्वर यात्रेच्या मुख्य दिवशी सोमवारी सकाळी श्री भैरेश्वराची पालखी  मिरवणूक सोहळा धार्मिक व भक्तीमय वातावरणात आणि अमाप उत्साहात पार पडला. या निमित्ताने भाविकांनी मुक्तपणे गुलाल खोबरे व भंडाऱ्याची उधळण करीत श्री भैरेश्वराच्या नावानं चांगभलंचा अखंड जयघोष करून श्री भैरवेश्वराच्या पालखीचे दर्शन घेतले  जागृत ग्रामदैवत श्री भैरेश्वर देवाच्या यात्रेस शनिवारपासून सुरुवात झाली या निमित्ताने भाविकांनी शनिवारी रात्री देवास दंडवत घालून आपली मनोकामना पूर्ण केली तसेच रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले यावेळी श्री भैरेश्वरास अभिषेक घालून पूजा करून नैवेद्य अर्पण करण्यात आला दरम्यान यात्रेच्या मुख्य दिवशी सोमवारी मानकरी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी झाली होती धनगरी ढोल पारंपारिक वाद्याचा निनादात पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी उपस्थित भाविकांनी मुक्तपणे गुलाल खोबरे व भंडाऱ्याची उधळण करून भैरेश्वराच्या नावानं चांगभलं चा गजर करीत पालखी व भैरेश...

यड्राव येथे एकाची गळफास घेऊन आत्महात्या .

इमेज
यड्राव (प्रतिनिधी ) यड्राव (ता . शिरोळ )   येथील   रेणूकानगर येथे श्रीपाद बेकर्स टपरीमध्ये अमोल तुळशीदास शिऊडकर (वय ३८ वर्षे ) याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली . सदरची घटना सोमवार सांय . ७ - ३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली . सदर घाटनेची नोंद शहापूर पोलीस ठाणेस करणेत आली .                                             घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहीत अशी की , मयत अमोल त्याची पत्नी , आई व मुले असे कुटूंबीसोबत रेणूकानगर येथे रहात आहे . अमोल हा आपल्या कुटूंबीयाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी  बेकरीचे व खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय टपरीमध्ये करत होता .  गेली काही दिवस अमोल व त्याची पत्नी यांच्यात वाद चालू होता . त्या वादातून त्याने टपरीमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली . सोमवार सांय . ७ -३० वाजता त्याची आई टपरीकडे आली असता सदरची घटना उघडकीस आली .                 ...

चिक्कोडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कागवाड मतदारसंघातील अनंतपुर जिल्हा पंचायतीतील गुंडेवाडी गावात चिक्कोडी लोकसभेचे खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले,यांनी प्रचार सभा

इमेज
रिपोर्टर राजू मुंडे निपाणी. चिक्कोडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कागवाड मतदारसंघातील अनंतपुर जिल्हा पंचायतीतील गुंडेवाडी गावात चिक्कोडी लोकसभेचे खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले,यांनी प्रचार सभा घेऊन, कार्यकर्त्यांना उद्देशून संबोधित करून, प्रचार केले. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत, डिजिटल इंडिया, मुद्रा, जलजीवन आणि अशा अनेक लोकप्रिय योजनांद्वारे आम्ही प्रत्येकाचे जीवन सुकर करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. सशक्त भारताच्या दिशेने पाऊल टाकून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी मला आपल्या अमूल्य मताचा आशीर्वाद द्यावा असे विनंती केले. यावेळी राज्यसभा सदस्य श्री ईरण्णा कडाडी, माजी मंत्री श्री श्रीमंत पाटील, मंडल अध्यक्ष श्री तम्मण्णा पारशेट्टी, श्री अभय अकिवाटे, श्री अप्पासाब अवताडे, श्री प्रभाकर चव्हाण, श्री निंगप्पा खोकले, स्थानिक नेते, मान्यवर आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

साखर उद्योगासंदर्भात माधवराव घाटगे-मुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चा घाटगे यांच्या निवासस्थानी भेट; साखर उद्योगाला सहकार्याची ग्वाही

इमेज
जयसिंगपूर, प्रतिनिधी      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता.२७) श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन साखर उद्योग संदर्भात सविस्तर चर्चा केली. सुमारे ४५ मिनिटे त्यांनी साखर उद्योगातील विविध धोरणांवर चर्चा केली.      मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, केंद्र सरकार व राज्य सरकारने महाराष्ट्रातील साखर उद्योगाला पाठबळ देण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातील साखर उद्योगाच्या विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन या उद्योगाला उर्जितअवस्था आणली. साखर उद्योगाला भरावा लागणारा दहा हजार कोटी रुपयांचा आयकर माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन साखर कारखानदारीला स्थिरता देण्याचा प्रयत्न केला.      तसेच साखर उद्योगासंदर्भात अनेक चांगले धोरणात्मक निर्णय घेऊन कारखानदारी टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील इंधनावर होणाऱ्या परकीय चलनामध्ये बचत करण्यासाठी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी म्हणून इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारने प्रोत्साहन दिले आहे असेही...

कर्नाटक लोकसभा निवडणुकीत 28 सीट जिंकणार अबकी बार चारसो पार,

इमेज
रिपोर्टर राजू मुंडे बेळगावी. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज बेळगावी शहरात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकसित भारताला विजय संकल्प समावेशात माजी मंत्री आणि निपाणी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सौ. शशिकला जोल्ले आणि चिक्कोडी लोकसभेचे खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले,यांनी सहभागी होऊन, उपस्थितांना मार्गदर्शन केले. समावेशात चिक्कोडी आणि बेळगावीच्या जनसमुदायाला उद्देशून संबोधित केलेले पंतप्रधान विकसित भारतासाठी मतदारांना भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन करताना भारत माता की जय या घोषणा घुमत होता. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे चित्र बदलून टाकली असून, मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावेत यावर आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे एकमत आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री श्री बी.एस. यडियुरप्पा जी, खासदार, विधान परिषद सदस्य, विद्यमान माजी आमदार, भाजप-जेडीएस पक्षाचे नेते, पदाधिकारी, महिला नेत्या व कार्यकर्ते उपस्थित होते.

जनवाड येथे लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार कुमारी प्रियांका जरकिव्हळी यांची प्रचार सभा विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न.

इमेज
सदलगा प्रतिनिधी -   चिकोडी तालुक्यातील जनवाड  या गावी महादेव स्वामी धर्मरमठ देवस्थानातील  सभा मंडपात आज आगामी लोकसभा चिकोडी मतदार क्षेत्राचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार कुमारी प्रियंका जारकिव्हळी यांची प्रचार सभा विकास रत्न विधान परिषद सदस्य सन्माननीय श्री प्रकाश अण्णा हुक्केरी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.  प्रारंभी जनवाड येथील  युवा कार्यकर्ते शितल कुडचे यांनी व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रचार सभेचे प्रास्ताविक भाषण  केले. अलीकडेच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे संपूर्ण कर्नाटकातील सर्वाधिक म्हणजे 78 हजाराचे मताधिक्य देऊन जनप्रिय असलेल्या आमदार यादीमध्ये  आमदार गणेश हुक्केरी यांना जसे सर्वाधिक मताध्धिक्याने निवडून दिले, त्याप्रमाणेच यावेळीही लोकसभेसाठी कुमारी प्रियांका जारकिव्हळी यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन सन्माननीय प्रकाश हुक्केरी यांनी उपस्थित मतदार बंधू भगिनी यांना केले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रकाश हुक्क...

हातकलंगलेत गद्दारांना घरी बसवा मतदारांनी मशाल पेटवा सत्यजित पाटील सरुडकर यांना विजयी करा सुषमा अंधारे

इमेज
जयसिंगपूर प्रतिनिधी  वाढती बेरोजगारी  शेतीमालाला भाव नाही महिलांना सन्मान नाही दुसऱ्या  पक्षाचे नेते चोरणाऱ्या आणि पक्षाशी गद्दारी करणाऱ्या गद्दारांना घरी बसून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्यजित पाटील सरूडकर यांना विजय करून मशाल पेटवावी असे शिवसेनेच्य उद्धव ठाकरे गटाच्या  सुषमा अंधारेे आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली जयसिंगपूर येथील सुदर्शन चौक येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या निवडणूक प्रचार सभेत त्या बोलत होत्या अंधारे पुढे म्हणाल्या देशामध्ये दहा वर्षात भाजप सरकार आल्यापासून शासकीय नोकर भरती झाली नाही अच्छे दिन चा जनतेला वाईट अनुभव आला मोदींनी गॅरंटी च्या नावाखाली सर्वसामान्यांना फसवले आहे अस्थिर सरकार मुळे उद्योजक महाराष्ट्रात उद्योग सुरू करत नाहीत खासदार संजय मंडलिक यांच्यावर सडकून टीका करत यावेळी चाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले होते त्यावेळी मंडलिक यांनी आम्ही 24 कॅरेट सोने  आहोत असे म्हटले होते आता तेच शिंदे  गटात सामील होऊन त्यांचे बेन्टेक्स झाले ...

डॉ.शिवाजी रामभाऊ शिंदे यांना दुसऱ्यांदा डॉक्टरेट पदवी ने सन्मानित.

इमेज
सेलू तालूका प्रतिनिधी.  पं. दीनदयाल उपाध्याय हिन्दी विद्यापीठ यांच्या वतीने  "विद्या वाचस्पति सारस्वत  सम्मान समारंभाचे भव्य आयोजन.  सेलू : सेलू येथील  श्रीमती ल.ला.रा.नूतन कन्या प्रशालेचे  सेवानिवृत्त आदर्श ग्रंथपाल  डॉ.शिवाजी रामभाऊ शिंदे यांनी कोरोना काळात सर्व शाळा,महाविद्यालये बंद होती.अशातच शासनाने ऑनलाईन शाळा सुरु करून विद्यार्थी वर्गाचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपाय करीत ऑनलाईन शाळा महाविद्यालय सुरु केल्या.यानंतर देश विदेशातील नामवंत विद्यापीठानी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ऑनलाईन वेबिनार चे आयोजन करून सर्व ग्रंथपालांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.याच संधीचा फायदा घेत सेलूच्या नूतन कन्या प्रशालेच्या स्व.सौ.दुर्गाताई द.कुलकर्णी स्मृति ग्रंथालयाचे ग्रंथपाल शिवाजी शिंदे यांनी सहभाग घेऊन आपले ग्रंथालय जगातील 108 विद्यापीठाशी जोडून विवीध उपक्रमांची माहिती सादर केली.वाचन संस्कृती वाढावी म्हणून काय काय उपाययोजना करता येतील,ग्रंथालया समोर काय काय आवाहने आहेत त्यावर काय उपाययोजना करता येतील यावर परखडपणे आप...

नांदेडमध्ये बेरोजगार तरुणाने फोडले ईव्हीएम मशीन

इमेज
नांदेड - मतदान करण्यासाठी आलेल्या एका तरुणाने मतदान केंद्रात प्रवेश करताच ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट व इतर साहित्याची कुऱ्हाडीने नासधूस केली. तरुणाच्या हातात कुऱ्हाड पाहून केंद्रावरील निवडणूक अधिकारी व इतर कर्मचारी आणि एजंट यांनी केंद्रातून बाहेर पळ काढला. तद्नंतर पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेतले. ही घटना बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे घडली. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. जिल्ह्यात जवळपास सगळीकडे शांततेत मतदान होत असताना हदगाव, माहूर, किनवट, देगलूर आदी तालुक्यातील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडण्याचा प्रकारही उघडकीस आला. दरम्यान, बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील वार्ड क्रमांक ३ मध्ये मतदान असलेल्या भैय्यासाहेब आनंदराव एडके या तरुणाने मतदानासाठी मतदान केंद्रात प्रवेश केला. तद्नंतर सोबत आणलेली कुऱ्हाड काढून मतदान यंत्र फोडली. तरुणाच्या हातातील कुऱ्हाड पाहून भयभीत झालेल्या कर्मचाऱ्यांनी आणि मतदान प्रतिनिधींनी केंद्राबाहेर पळ काढला. वेळीच पोलिसांनी आरोपी भैय्यासाहेब एडके यास ताब्यात घेतले. आपण एम.ए.चे शिक्षण घेवून देख...

शिरटीचे ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिर कलशारोहण व वास्तुशांती सोहळा उत्साहात संपन्न प्रमुख सात कलशासह 49 कलशाची विधिवत स्थापना हजारो भाविकांनी घेतले दर्शन

इमेज
शिरोळ / प्रतिनिधी : शिरटी (ता शिरोळ) येथील जागृत ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराच्या कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्याच्या तिसऱ्या तथा मुख्य दिवशी शुक्रवारी विविध धार्मिक कार्यक्रम कलश पूजन होमहवन कलशारोहण सोहळा महाप्रसादाचे वाटप हास्य गंध हा करमुनिकेच्या कार्यक्रमाबरोबरच विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती या धार्मिक सोहळ्यामुळे गावात चैतन्यदायी व भक्तिमय वातावरणात निर्माण झाले होते.                  येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सर्वांच्या सहकार्याने करण्यात आला आहे श्री भैरेश्वर देवालयाचे काम पूर्णत्वास आले आहे यामुळे या मंदिराचा कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्यास बुधवारपासून  श्रीक्षेत्र आडी येथील श्री दत्त देवस्थान मठाचे प्रमुख परमाब्धिकार प पू परमात्मा महाराजांच्या दिव्य सानिध्यात मांगुरचे शाम भटजी यांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा अमाप उत्साहात चैतन्यदायी व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या धार्मिक सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांन...

जयसिंगपूर येथे सत्यजित पाटील-सरूडकरयांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटनसरूडकर यांची मशाल घराघरात पोहोचवा : गणपतराव पाटील

इमेज
जयसिंगपूर : प्रतिनिधी - हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरूडकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जयसिंगपूर येथे गुरूवारी झाले. दत्त शेतकरी सह. साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील व माजी आ. उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन झाले. स्वागत अमरसिंह निकम यांनी तर प्रास्ताविक माजी नगरसेवक अशोकराव कोळेकर यांनी केले. गणपतराव पाटील म्हणाले, जयसिंगपूर शहर परिसरात कॉंग्रेस भक्कमपणे उभी आहे. कॉंग्रेसने नेहमीच पुरोगामी विचार जोपासला आहे. स्व. डॉ. सा. रे. पाटील यांनी जयसिंगपूरात कॉंग्रेसला चांगले वातावरण निर्माण करून दिले. त्यामुळे आजही या ठिकाणी कॉंग्रेसला अनुकूल वातावरण निर्मिती दिसून येते. कॉंग्रेसने समन्वयातून तोडगा काढला आहे. आजपर्यंतच्या निवडणुका कॉंग्रेसने मित्र पक्षाला सोबत घेवून लढवून जिंकल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरूडकर यांना भरघोस मताधिक्य मिळण्यासाठी घराघरात मशाल पोहोचविण्याचे काम जोमाने करावे असे आवाहनही गणपतराव पाटील यांनी केले. ...

सौ शैलजा परमणे कोल्हापूर यांना राष्ट्रीय साई कलारत्न समाज भूषण पुरस्कार जाहीर .

इमेज
हातकणंगले       शिर्डी येथील ओमसाई विकास प्रतिष्ठाण  आणि बी .बी .सी . फिल्म प्रोडक्शन या संस्थेचा कोल्हापूर येथील कवियत्री सौ शैलजा मोहन परमणे कोल्हापूर यांना  राष्ट्रीय स्तरांवरील साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार  जाहीर झाला आहे पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ३/५/२४ रोजी सिद्ध संकल्प लॉन साकुरी शिर्डी अहमदनगर येथे संपन्न होणार आहे .   सौ शैलजा परमणे यांच्या काव्यक्षेत्रातीला  व शिक्षण अध्यापन क्षेत्रातील योगदान कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील साई कलारत्न समाजभूषण हा पुरस्कार मान्यवरांचे हस्ते देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे सदर पुरस्कार वितरण सोहळा ओम साई विकास प्रतिष्ठण व बी बी सी फिल्म प्रोडक्शन या संस्थेचे प्रमुख अध्यक्ष मान . श्री सुदाम संसारे सर  यांनी व त्यांचे संस्थेचे पदाधिकारी यांनी आयोजन केले आहे . नुकताच त्यांनी सदर पुरस्काराचे निवडपत्र दिले आहे .  सौ शैलजा परमणे यांना निवड झालेल्या पुरस्कारासाठी साहित्य क्षेत्रात कौतुक होत आहे .

भारतीय जनता पार्टी चिक्कोडी जिल्हा आणि मंडलाच्या वतीने एस.सी मोर्चा

इमेज
प्रतिनिधी - राजू मुंडे चिकोडी. चिक्कोडी शहरात भारतीय जनता पार्टी चिक्कोडी जिल्हा आणि मंडलाच्या वतीने एस.सी मोर्चा पदाधिकाऱ्यांची चिक्कोडी लोकसभेचे खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले, यांनी बैठक घेऊन, उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विधान परिषद सदस्य व प्रभारी श्री पी.एच. पूजार, माजी आमदार श्री बाळासाहेब वड्डर, जिल्हाध्यक्ष श्री सतीश अप्पाजीगोळ, एस.सी. मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री केंचन्नवर, जिल्हा एस.सी. मोर्चा आणि मंडल पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

नवीन कार्यकर्त्यांच्या आगमनाने भाजपा पक्षाला आणखी बळ.

इमेज
चिक्कोडी प्रतिनिधी - राजु मुंडे. भाजपचे सिद्धांत “सेवा हेच संघटना” व देशाचे अभिमानी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे “सब का सात सब का विकास” या सिद्धांतावर विश्वास ठेऊन आणि खासदार श्री अण्णासाहेब जोल्ले यांनी केलेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन चंदूर गावातील श्री बाळु पाटील, श्री अशितोष पाटील, श्री किसन बोळे, श्री महेश चौगले, श्री आकाश पाटील, श्री कृष्णात कणीरे, श्री रवि घाटगे, श्री शिवानंद पाटील, श्री अशोक पाटील, श्री गोंदा पाटील, श्री दादा मधबावे, श्री अशोक समाजे, श्री अनिल माने आणि त्यांच्या टीममधील सदस्यांनी काँग्रेस पक्ष सोडून आमच्या भाजपा पक्षात प्रवेश केले. त्या कार्यकर्त्यांचे * माजी मंत्री आणि निपाणी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सौ. शशिकला जोल्ले जी * आणि * चिक्कोडी लोकसभेचे खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले,जी * यांनी भाजपा पक्षात स्वागत केले. वार्तादार राजू मुंडे चिकोडी.

मुलांच्या जडणघडणीत आई बाबांची भूमिका महत्वाची : ॲड. प्रा .श्रीकांत माळकर., राजाराम विद्यालयातील बालसंस्कार शिबिराची सांगता

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी : केवळ पुस्तकी ज्ञानामुळे बालकांचा व्यक्तिमत्व विकास होत नाही पालकांनी सुद्धा आपली जबाबदारी ओळखून बालकांच्या संपूर्ण विकासासाठी बालमनावर सुसंस्कार करीत त्यांना संस्कारक्षम बनवणे गरजेचे आहे तरच येणारी भावी पिढी सुजाण होईल यासाठी मुलांच्या जडणघडणीत आई-बाबाची भूमिका महत्त्वाची आहे असे विचार प्रसिद्ध व्याख्याते ॲड. प्रा. श्रीकांत माळकर यांनी व्यक्त केले. येथील राजाराम विद्यालय नं 2 या शाळेत दोनदिवसीय बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराच्या सांगता समारंभात प्रा. श्रीकांत माळकर यांचे * बालक- पालक सुसंवाद व आपल्या मुलांचा व्यक्तिमत्व विकास * याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. प्रा.श्रीकांत माळकर बोलताना पुढे म्हणाले की ," संस्कारक्षम बालक घडवण्याची खरी जबाबदारी आईची असते पण सध्या हीच आई टीव्हीवरील मालिकेत गुंतली असल्यामुळे आपल्या मुलांवर तिचे लक्ष नाही याचा परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर होत आहे. यासाठी आपला मुलगा काय करतो आहे याची माहिती पालकांना असणे आवश्यक आहे. मुलांना योग्य दिशा मिळावी यासाठी महापुरुषांची...

बावन सौंदत्ती गावच्या ओंकारा आश्रम मठात श्री शिवशंकर स्वामीजींच्या उपस्थितीत शरण अक्कमहादेवीची जयंती साजरी

इमेज
रायबाग वार्ताहर -  रायबाग तालुक्यातील बावन सौंदत्ती गावच्या ओंकारा आश्रम मठात श्री शिवशंकर स्वामीजींच्या उपस्थितीत शरण अक्कमहादेवीची जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी मातोश्री भ्रमरांबिकादेवी, मातोश्री नागलंबिकादेवी यांच्यासह अनेक शरण शरण व ग्रामस्थ उपस्थित होते.

एकसंबा येथे ट्रकची स्कूटरला धडक ; एक ठार

इमेज
एकसंबा प्रतिनिधी ट्रक आणि दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी एकसंबा - उळागड्डीवाडी रस्त्यावर घडली. अनिल महादेव सांगावे (वय 51 रा. एकसंबा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.            याबाबत घटनास्थळावरून मिळालेले अधिक माहिती अशी की, सी.बी कोरे कारखान्याकडून एकसंबा कडे येणाऱ्या ट्रक क्रमांक केए 29-9580 ने उळागड्डीवाडी हून एकसंबाकडे येणाऱ्या एक्टिवा केए 23 इआर 9245 ला जोराची धडक दिली. अनिल सांगावे (रा. एकसंबा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्कुटीवर असणाऱ्या निर्मला विनायक म्हेत्रे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी चिकोडी येथील इस्पितळात हलविण्यात आले. उळागड्डीवाडी येथे घराचे बांधकाम सुरू असल्याने ते सदर बांधकामास पाणी मारून घरी परतत असताना सदरचा अपघात घडला. दरम्यान अनिल सांगावे यांच्या घरातील मंडळी ज्योतिबा यात्रेनिमित्त ज्योतिबा डोंगरास गेले होते.  त्यांना फोन द्वारे संपर्क साधून बोलाविण्यात आले.         घटनेची माहिती मिळताच एकसंबा परिसरातील नागरिक...

काँग्रेस पक्षाच्या विकास कामांच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वासावर कुमारी प्रियांका जारकीहोळी दिल्लीला नक्की जाईल. -- प्रकाश हुक्केरी

इमेज
सदलगा - प्रतिनिधी -- लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार कुमारी प्रियांका सतीश जारकिहोळी यांची सदलगा शहरातील मुख्य कार्यकर्त्यांची प्रचार सभा विद्यमान विधानपरिषद सदस्य व कर्नाटक सरकारचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी मा. प्रकाश हुक्केरी यांच्या नेतृत्वाखाली सदलगा शहरातील कुंद कुंद प्रशालेतील सभाभवनात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आज संपन्न झाली. चिकोडी लोकसभा मतदार क्षेत्रातील काँग्रेस पक्षाच्या विकास कामांच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वासावर काँग्रेसची अधिकृत उमेदवार कुमारी प्रियांका जारकीहोळी दिल्लीला नक्की जाईल. -- विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी. आज सदलगा शहरातील कुमारी प्रियंका सतीश जारकीहोळी यांची प्रचार सभा संपन्न झाली .त्यावेळी माननीय प्रकाश हुक्केरी यांनी विकास कामांचा आढावा घेऊन काँग्रेस पक्षाच्यावतीने आतापर्यंत चिकोडी लोकसभा क्षेत्रात केलेल्या विकास कार्याचे त्यांनी कौतुक केले. प्रारंभी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री अरुण देसाई यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाला सुरुवात केली.  त्यानंतर इतर कार्यकर्त्यांम...

निवडणूक लोकशाही विरुध्द हुकुमशाही :उध्दव ठाकरे यांचा परभणीतून हल्लाबोल.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  वार्‍यासह पावसात जंगी जाहीर सभा      परभणी : दि.23 लोकसभेच्या या निवडणूका अत्यंत महत्वपूर्ण आहेत. विशेषतः ही निवडणूक लोकशाही विरुध्द हुकुमशाही अशीच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांनी लोकशाही वाचविण्याकरीता महाविकास आघाडीच्या मागे भक्कम ताकद उभी करावी, असे आवाहन शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री परभणीतील जाहीर सभेतून केले. परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या निवडणूक प्रचारार्थ येथील स्टेडिअम मैदानावर मंगळवारी (दि.23) आयोजित केलेल्या जोरदार जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार श्रीमती फौजिया खान, माजी मंत्री आमदार राजेश टोपे, उमेदवार संजय जाधव, आमदार सर्वश्री सुरेश वरपुडकर, राहुल पाटील, राजेश राठोड,  माजी आमदार सर्वश्री विजय गव्हाणे, सौ. मिराताई रेंगे, सुरेशदादा देशमुख, विजय भांबळे, सुरेश जेथलिया, सितारामजी घनदाट, संतोष सांबरे, जिल्हाप्रमुख विशाल कदम, ए.जे. बोराडे, डॉ. विवेक नावंदर, सिध्दार्थ हत्तीअंबीरे, भगवानराव वाघम...

जरांगेंची लढाई सामाजिक, राजकीय नव्हे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

इमेज
जिल्हा प्रतिनिधी परभणी.  जरांगे यांचे आभार  भ्रम पसरविणार्‍यांना जागा दाखवा. परभणी : दि.23  मनोज जरांगे पाटील यांची आरक्षणासाठीची लढाई सामाजिक आहे, राजकीय नाही, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करीत या लोकसभा निवडणूकीत मनोज जरांगे पाटील यांनी भाग न घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले. या मतदारसंघात मराठा समाजाने आपणास पाठींबा व्यक्त केल्याच्या विरोधकांनी सुरु केलेल्या अफवा सपशेल खोट्या आहेत. विरोधकांचे हे गैरप्रकार मराठा समाजाने हाणून पाडावेत, विरोधकांना जागा दाखवून द्यावी, असे आवाहनही केले.  परभणी लोकसभा मतदार संघांतर्गत महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांची मंगळवारी (दि.23) पाथरीत जोरदार जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या जंगी सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, उमेदवार महादेव जानकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार आशिष देशमुख, माजी खासदार अ‍ॅड.सुरेश जाधव, डॉ. केदार खटींग, परभणीचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण देशमुख,...