पोस्ट्स

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे प्राण वाचलेल्या "दुवा" चा वाढदिवस..,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा

इमेज
कोल्हापूर, दि.8   मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मागील वर्षी वेळेत अर्थसहाय्य झाल्यामुळे प्राण वाचलेल्या "दुवा" या चिमुकलीचा महिला दिनी पहिला वाढदिवस हातकणंगले येथे झालेल्या 'शिवराज्य भवन' कोनशिला अनावरण कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वैदयकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून करण्यात आला. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा वैद्यकीय समन्वयक प्रशांत साळुंखे, साई स्पर्श हॉस्पिटलचे डॉक्टर विजय गावडे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून वेळेत अर्थसहाय्य मिळाल्यामुळे प्राण वाचलेल्या चिमुकलीच्या आईने कोल्हापूर मध्ये 13 जून 2023 मध्ये तपोवन मैदान येथे झालेल्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आभाराचे पत्र दिले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऋण व्यक्त करण्याच्या भावनेने त्यांनी...

नंणदी परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या सातबारा उताऱ्याचे आधार लिंक करून घेण्याचे तहसील कार्यालयाकडून आव्हान

इमेज
एकसंबा प्रतिनिधी - चिकोडी तालुक्यातील नणदी नणदीवाडी एकसंबा मलिकवाड नागराळ नेजः परिसरातील शेतकऱ्यांना चिकोडी तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे की येत्या 31 मार्च 2024 च्या आत आपल्या नावावरील सर्वच्या सर्व सातबारा उतारा आधार लिंक व मोबाईल लिंक करून घेणे आहे हे आधार लिंक व मोबाईल लिंक प्रत्येक गावातील ग्रामवन कार्यालयामध्ये करण्यात येणार आहे जर आपण आपल्या सातबारा उतारा आधार लिंक व मोबाईल लिंक केला नाही तर आपल्याला भविष्यात मिळणाऱ्या शासनाच्या अनुदान व इतर सवलती तसेच भविष्यात मिळणारे पीक कर्ज मिळणार नाही तसेच भविष्यात जर केंद्र सरकारकडून तसेच राज्य सरकारकडून पीक कर्जमाफी मिळाली तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही तसेच 31 मार्च पूर्वी जर उतारा आधार लिंक केला गेला नाही तर त्यापुढे आधार कार्ड व उतारा लिंक करण्यास मोठी पेनल्टी लावण्यात येणार आहे तरी सर्वांनी येत्या 31 मार्च 2024 पूर्वी आपले सर्व उतारे आधार कार्ड लिंक करून घ्यावे असे आवाहन चिकोडी तहसील कार्यालय व नणदी नेज तहसील विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे

खोतवाडी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा थकीत वेतन मिळण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हा परीषद समोर बोंब ठोक आंदोलन

इमेज
हातकणंगले वृत्तसेवा - मोजे खोतवाडी येथील ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी यांना मागील आठ महिन्यापासुन वेतन मिळालेले नाही. तसेच कामगारांचा फंड अद्याप भरलेला नाही. त्याचप्रमाणे वाढीव पगाराचा फरक मिळालेला नाही. मयत कामगार व सेवानिवृत्त कामगार यांना कोणताही फंड, फरक, सव्हिस दिलेला नाही. मागील ७ ते ८ वर्षापासून कामगारांचा होणाऱ्या छळाबद्दल न्यायाच्या मागणीसाठी दलित समाज विकास परिषदेच्यावतीने दि. ३१/०१/२०२०२३ रोजी गटविकास अधिकारी हातकणंगले यांच्या कार्यालयावर उपोषण केले होते. त्याठिकाणी गटविकास अधिकारी व ग्रामसेवक उपोषण सोडण्यासाठी झालेली चर्चा करुन ग्रामपंचायत खोतवाडी यांचेकडील चेक देवुन उपोषण सोडण्यास सांगितले त्यांनी ३ चेक कामगारांना दिले. त्यापैकी एक चेक कामगारांनी वर्तवला त्यामध्ये ९ महिनेपैकी ३ महिनेचा पगार जमा झाला व उर्वरीत दोन चेक ग्रामसेवक खोतवाडी यांनी पैसे जमा करतो म्हणुन परत घेतले, तेव्हापासुन आजअखेर परत ८ महिन्याचा पगार थकीत आहे. फंड व फरक व मयत कामगार व सेवानिवृत्त कामकार यांना कोणताही फंड व सर्व्हिस परत दिलेली नाही. सदर बाब ही ग्रामसेवक यांना विचारली असता, त्यांनी उडव...

सैनिकीमुळे मलिकवाड गावचे नाव उज्जवल.,खास. अण्णासाहेब जोल्ले यांचे मत.,जयहिंद असोसिएशन कमानीवर जवान मुर्ती प्रतिष्ठापना

इमेज
मलिकवाड प्रतिनिधी : अमर माने -  मलिकवाड मधिल गेले  पिढया अन पिढया देश सेवेसाठी झटत असलेल्या चिक्कोडी तालुक्यातील एकमेव गाव म्हणून  ओळखले जाणारे सैनिक मलिकवाड गावचे नाव नावा रूपाला आणले आहे. आज देखील प्रत्येक वर्षी तीन ते चार युवक सैन्यात भरती होऊन गावचे नाव रोशन केले आहे. त्यासाठी त्याला माजी सैनिक, असोसिएशनचे पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन  ठरत असल्याचे मत चिक्कोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी व्यक्त केले. ते जयहिंद असोसिएशन स्वागत कमानीवर जय जवान जय किसान जवान मूर्तीचे प्रतिष्ठापना करून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण उंदूरे होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. ग्रामपंचायत अध्यक्षा अनिता इंगळे, उपाध्यक्ष संभाजी पाटील, सुनीलराव देशपांडे, महादेव रायजाधव जवान मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाला प्रारंभ देऊन दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री. जोल्ले पुढे म्हणाले, या छोट्याशा गावातील लोक व प्रत्येक घरातील एक व्यक्ती सैन्यात भरती होऊन देशाचा अभिमान वाढवितो आहे. यापुढे आणखीन देश सेवेसाठी युवकांनी सहभाग व्हावे....

माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णाप्पा लक्ष्मण मगदूम यांचे निधन

इमेज
जनवाड वार्ताहर शितल कुडचे/- जनवाड तां.चिककोडी येथील प्रतिष्ठित व्यक्ती अण्णाप्पा लक्ष्मण मगदूम यांचे आज दि.5.03,2024 रोजी सकाळी 6.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले ते 95 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात तीन मुले दोन मुली सुना नातवंडे परतुंडे असा आप्त परिवार आहे. अण्णाप्पा लक्ष्मण मगदूम हे सी.बी. कोरे नंदी कारखान्याचे संचालक म्हणून पद भूषविले त्याचबरोबर ग्रामपंचायत अध्यक्ष म्हणून देखील ते बरेच वर्षे पद भूषविले व महादेव स्वामी मठ जिर्णोद्धार कमिटीचे देखील ते बरेच वर्षे अध्यक्ष म्हणून पद भूषविले आहे .त्याचबरोबर प्राथमिक कृषी पतीन संघाचे अध्यक्ष म्हणून ही पद भूषविले आहेत .असे अनेक संघ संस्थाचे ते संचालक म्हणून काम पाहिले आहेत त्यानंतर त्यांचा मोठा मुलगा राजू अण्णाप्पा  मगदूम हे माजी  ग्रामपंचायत सदस्य . तर मधला मुलगा पिरगोंडा अण्णाप्पा   मगदूम  महादेव स्वामी मठ जिर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष यांचे ते वडील होत . एकंदरीत मगदूम कुटुंबातील अण्णाप्पा लक्ष्मण मगदूम हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे मनमिळावू तसेच सढळ हाताने मदत करणारे गावातील न्यायनिवाडा करणारे होते. त्या...

जयसिंगपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सिद्राम कांबळे तर उपसभापती पदी दऱ्याप्पा सुतार

इमेज
शिरोळ/प्रतिनिधी:   जयसिंगपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी  सिद्राम दत्तु कांबळे (रा. नांदणी) व उपसभापतीपदी दऱ्याप्पा बाबू सुतार (रा. दत्तवाड) यांची बिनविरोध निवड झाली.       बाजार समितीच्या सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर सभागृहात संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती व उपसभापती पदासाठी विशेष सभा झाली. सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल नादरे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.        यावेळी सभापती पदासाठी सिद्राम कांबळे यांचे नाव सुभाषसिंग रजपूत यांनी सुचविले व  किरण गुरव यांनी अनुमोदन दिले. तर उपसभापती पदाकरिता दऱ्याप्पा सुतार यांचे नाव शिवाजी चव्हाण यांनी सुचविले, त्यास महावीर पाटील यांनी अनुमोदन दिले. यावेळी सभापती पदासाठी सिद्राम कांबळे व उपसभापती पदाकरिता दऱ्याप्पा सुतार यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने या पदाच्या निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल नादरे यांनी जाहिर केले. नुतन सभापती सिद्राम कांबळे व उपसभापती दऱ्याप्पा सुतार तसेच सहाय्यक निबंधक तथा निवडणूक अधिकारी अनिल नादरे यांचा...

जलतज्ञ डॉ राजेंद्रसिंह राणा यांना डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील समाजभूषण पुरस्कार भास्करराव पेरे - पाटील यांना समाजकार्य तर पै अमृता पुजारी हिला युवाप्रेरणा पुरस्कार जाहीर

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी : शिरोळ तालुक्याचे माजी आमदार व दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार स्व आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांनी शिरोळ तालुका व परिसरात शेतकरी सहकारी संस्थांच्या माध्यमातून समृद्धीची आणि संपन्नतेची बीजे रोवली डॉ सा रे पाटील यांनी आयुष्यातील ६० वर्षाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात अतुलनीय काम केले त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या तरुण पिढीला कळावा यासाठीच त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ. त्यांच्या नावे यावर्षीचा देण्यात येणारा डॉ अप्पासाहेब उर्फ सा रे पाटील समाजभूषण पुरस्कार जलतज्ञ डॉ राजेंद्रसिंह राणा तर समाजकार्य पुरस्कार भास्करराव पेरे पाटील यांना आणि युवा प्रेरणा पुरस्कार पै अमृता पुजारी हिला देण्यात येणार आहे हा पुरस्कार वितरण सोहळा १ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी५ वाजता श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील कै दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या मैदानावर होणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष विनोद शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना विनोद शिरसाठ पुढे म्हणाले  राज्याचे शिल्पकार स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी ...

हुपरी येथे जवाहर कारखाना पेट्रोल पंपाच्या दारात एकाचा अपघात जागीच ठार

इमेज
हुपरी प्रतिनिधी - हुपरी जवाहर साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक बसून  संजय तातोबा भोसले (व.व.54.रा-मानेनगर हुपरी)  जवाहर साखर कारखान्यात काम करुन.पंपावरून पेट्रोल टाकून घरी जात असताना  समोरून आलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोराची धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला  जवाहर साखर कारखान्याच्या बेशिस्त वाहनामुळे दोन दिवसापुर्वी गावभाग वस्तीत ट्रॅक्टर ट्रॉली मेडिकल गिफ्ट गॅलरीमध्ये घुसली  प्रसंगावदानाने कोणती जीवित हानी झाली नाही  परंतु यावर तात्काळ ट्रॅक्टर-ट्रॉलीवर बंदी आणावी जवाहार कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ड्रायव्हरांना समज देऊन  हुपरीच्या यात्रेमुळे रहदारीचे प्रमाण वाढले असल्याने सध्या ट्रॅक्टर व ऊस वाहतूक बंद करण्यात यावे  अशी गावकऱ्यांची मागणी असून यावर कुठेतरी पाय बंद घातला पाहिजे निदान यात्रा असल्याने अशी चर्चा सुरू आहे.

चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रा ऐवजी आधुनिक सोयींनी सुसज्ज असे कम्युनिटी हेल्थ सेंटर सुरू व्हावे.

इमेज
सदलगा शहर प्रतिनिधी,:  सदलगा शहरातील नागरिकांची व शहर परिसरातील खेड्यातील जनतेची आग्रही मागणी. चिकोडी तालुक्यातील सदलगा हे शहर सर्वात मोठे असून सदलगा शहराची लोकसंख्या अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस हजार असून शहर परिसरातील नागराळ, मलिकवाड, वडगोल, बहिणाकवाडी, यादयानवाडी, जनवाड या खेड्यांचा समावेश सदलगा शहरातील आरोग्य केंद्रात केला जातो, त्यामुळे एकूण 60 ते 70 हजार लोकसंख्येला सदलगा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र योग्य पद्धतीने न्याय देऊ शकत नाही. या ठिकाणी फक्त तीन सिस्टर असून चार मदतनीस आहेत अजूनही 6 सिस्टर व सहा मदतनीस यांची गरज या केंद्राला आहे. कारण उपचार घेणारे जादा व सुविधा पुरवणारे शासकीय यंत्रणा कमी यामुळे नागरिकांचे बरेच हाल होत आहेत. सदलगा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या फक्त सहा बेड असून अजूनही किमान 30 बेडची अपेक्षा आहे .या प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त एकच वैद्यकीय अधिकारी असून या ठिकाणी अजून किमान चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे. दररोज किमान 100 ते 150 रुग्ण उपचारासाठी येत असतात त्यांना या सोयी अपुऱ्या पडत आहेत, सदलगा या शहरापासून जवळच असलेल्या जनप्रतिनि...

लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधानसभामध्ये पाकिस्तान जिदबादचा नारा देणाऱ्यांचा चिक्कोडीत निषेध.

इमेज
    चिक्कोडी - भारतीय विद्यार्थी परिषद चिक्कोडीच्या नेतृत्वाखाली आज विधानसौदा येथे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांच्या विरोधात चिक्कोडी विधानसौदा समोर आंदोलन करण्यात आले.  राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सय्यद नसीर हुसेन यांचा विजय झाल्यानंतर सरकारने दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली असून त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या.       पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत असताना आजूबाजूच्या लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि तिथे असलेल्या नासिर हुसेननेही विरोध केला नाही. काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीतील विजयावेळी बेळगावात पाकिस्तान झिंदाबादचा नारा देण्यात आला, आणि पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला.देशद्रोह्यांना विधानसभेत जागा देण्यात आली ही चिंताजनक घटना आहे.हा प्रश्न अतिशय गंभीर असून सरकारने कोणतीच कारवाई केली नाही, अशा घटना वारंवार घडत आहेत.  सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी अभाविपची मागणी आहे.  पाकिस्तानपूरचा नारा देणाऱ्या व्यक्त...

रुग्णवाहिका चालक व वैद्यकीय तंत्रज्ञाच्या कार्यतत्परतेमुळे युवकास जीवदान

इमेज
मांजरी प्रतिनिधी - (अलका रोडे.)  रुग्णवाहिका चालक व वैद्यकीय तंत्रज्ञ यांच्या कार्यतत्परतेने रायबाग येथील अपघातातील जखमी युवकास दवाखान्यात दाखल केल्याने युवकाचे प्राण वाचले रुग्णवाहिका चालक व वैद्यकीय तंत्रज्ञ या दोघांचेही यामुळे कौतुक केले जात आहे रायबाग येथील नागराळ क्रॉस येथे झालेल्या २७ रोजी संध्याकाळी ४.30 वाजता झालेल्या मोटरसायकल अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला व एक किरकोळ जखमी झाला सगसद्दी गावचे रहीवासी असलेले प्रदीप कनदाळी व माळींगा कनदाळी हे मोटर सायकल वरून जात होते त्यांचे ट्रॅक्टरशी धडक झाली यामध्ये हे युवक जखमी झाले होते  स्थानिकांनी अंकली येथील 108 रुग्णवाहिके शी संपर्क साधला असता रुग्णवाहिका चालक शब्बीर सुलेमान मुल्ला व वैद्यकीय तंत्रज्ञ आनंद मंटूर यांनी कार्यतत्परता दाखवत जख्मी युवकांना दवाखान्यात दाखल केले. गंभीर युवकाचा यामुळे प्राण वाचला. रुगणवाहीका चालक व तंत्रज्ञ यांच्या कर्तव्यदक्षतेचा पुन्हा एकदा अनुभव आला त्यांच्या या कार्यकर्ते बद्दल वरिष्ठानकडून तसेच परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. 

मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय सेलू येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : सकल मराठा समाज सेलूच्या वतीने मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना उपजिल्हाधिकारी कार्यालय सेलू यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,उपजिल्हाधिकारी कार्यालय सेलू येथे मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी अडवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मराठा कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी सेलू व जिंतूर या तालुक्यातील मराठा बांधव उपजिल्हाधिकारी सेलू येथे हेलपाटे मारून त्रस्त झाले आहेत, काही ना काही कारण काढून व त्रुटी काढून आपल्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी  मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. लोकांनी आपल्या कार्यालयात विचारपूस केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. वारंवार जिल्हाधिकार्यालय परभणी व उपजिल्हाधिकारी सेलू येथे लेखी व तोंडी निवेदने देऊन काहीही फरक पडला नाही. मराठा समाजाला मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी मुद्दामहून प्रशासनातर्फे वेठीस धरले जात आहे असा याचा अर्थ निघतो. याचा निषेध म्हणून दिनांक 04-03- 2024 सोमवार पासून उपजिल्हाधिकारी कार्यालय, सेलू येथे सकल मराठा समाज सेलू व जिंतूर च्या व...

जादूगार सम्राट शिवम यांच्या फुल टू कॉमेडी व  जादूच्या शो ने सेलूकर भारावले.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  जादूगार शिवम यांनी पैशाचा पाऊस पाडून केले प्रेषकांना आश्चर्यचकित. सेलू : दि.२८ फेब्रु. बुधवारी सायंकाळी ७ वा. साई नाट्य मंदिर सेलू येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त श्रीराम प्रतिष्ठान सेलू चे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी जादूगार सम्राट शिवम जगप्रसिद्ध यांच्या फुल टू कॉमेडी व जादू  शो चे आयोजन केले होते. या जादू शो ची सुरुवात जादूगार शिवम यांनी डोळ्यावर पट्टी बांधून संपूर्ण सेलू शहरात बाईक चालवून दाखवली आणि प्रेशकांची दाद मिळवली. सोबत श्रीराम प्रतिष्ठान येथील सर्व कर्मचारी यांनी ही विज्ञान दिनानिमित्त बाईक रॅली मध्ये सहभाग नोंदवला. जादूगार सम्राट शिवम जगप्रसिद्ध यांच्या फुल टू कॉमेडी व जादू  या शोचे उद्घाटन  श्रीराम प्रतिष्ठान सेलू चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, घटक संस्थेचे मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, शालिनी शेळके, अशोक बोडखे आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून मॅजिक शोची सुरुवात ह...

सेलू येथील गजानन महाराज मंदिर संस्थान च्या वतीने प्रगट दिनानिमित्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : दि.29 डिसेंबर स्वामी विवेकानंद नगर येथील  श्री संत गजानन महाराज मंदिर   कमिटीच्यावतीने तीन दिवसीय प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 1 मार्च पासून या प्रगट दिन सोहळ्यास प्रारंभ होत असून दि.03 मार्च रोजी या सोहळ्याची सांगता होणार आहे. यामध्ये दररोज सकाळी 5 ते 8 या वेळेत श्री च्या मूर्तीस भक्तांचे अभिषेक होणार असून 8 ते 11 यावेळेत संत गजानन विजय या ग्रंथाचे समूहिक पारायण होणार आहेत. दुपारी 3 ते 4 या वेळेत महिला मंडळाचे भजन होणार आहे. दि. 3 मार्च या मुख्य दिवशी सकाळी 5 ते 10 या वेळेत श्री च्या मूर्तीस भक्तांकडून अभिषेक होऊन 11 ते 1:30 या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार व भागवताचार्य ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाआरती होऊन दुपारी 2 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन  करण्यात आले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून श्रवणाचा,दर्शनाचा तसेंच महाप्रसादाचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराच्या सर्व कार्यकारी संचालक मंडळातील सभासद आ...

हुपरी येथे गिफ्ट गॅलरी व मेडिकल मध्ये घुसला ट्रॉली-ट्रॅक्टर

इमेज
हुपरी येथे अंबाबाई मंदिर कमानी शेजारी असणाऱ्या सुमित वॉच अँड गिफ्ट गॅलरी व  कामाख्या मेडिकल मध्ये ब्रेक निकामी झाल्याने ट्रॅक्टर भरधाव वेगाने दारातील कट्टडा तोडून आत मध्ये घुसला वेळप्रसंगी कोणतीही जीवित हानी झाली नाही. दुपारची वेळ असल्याने मेडिकल बंद असते मात्र सुमित वॉच गिफ्ट गॅलरी चालू असताना  दुकानाच्या शटर उचकटत वरील पत्रा तोडत मेडिकल व वॉच गिफ्ट गॅलरीच्या मधील सिमेंटच्या पिलरला जोरदार धडक देत  मोठे नुकसान या ठिकाणी झाले, त्याचा पंचनामा करण्याचे काम हुपरी पोलीस करत होते. या ट्रॅक्टर ऊस वाहतुकीमुळे हुपरी गावांमध्ये मेन रोड वरून येणारी अवजड वाहतूक बंद करावी  अशी नागरिकांची मागणी असून यावर नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी तात्काळ उपाययोजना करून  मार्चच्या तीन तारखेपासून हुपरीची यात्रा सुरू होणार आहे. पार्किंगचे व रहदारीचे नियोजन योग्य रीतीने व्हावे इतकेच हुपरीकरांची अपेक्षा आहे.

सदलगा शहरातील कुयंपु शालेय संकुलात सदलगा शहरातील नवोदित उद्योगपती व सुप्रसिद्ध अशा हॉटेल अमरचे मालक श्री अमरजीत पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने शालेय विद्यार्थ्यासमवेत मोठ्या उत्साहात साजरा.

इमेज
सदलगा प्रतिनिधी - सदलगा शहरातील तरुण उद्योगपती व सुप्रसिद्ध अशा पुना बेंगलोर हायवे वरील हॉटेल अमरचे मालक श्री अमरजीत पाटील यांचा पन्नासावा वाढदिवस  शालेय विद्यार्थ्यासमवेत त्यांचे बंधू रणजीत उर्फ मुन्ना पाटील, सुनील पाटील, ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम, ए पी जे अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष श्री अझरुद्दीन शेखजी, पत्रकार तात्यासाहेब कदम, सामाजिक कार्यकर्ते वशाअल्ला मुजावर, कोयंम्पू प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जे एस मगदूम सर, मुबारक अत्तार, आकाश जमादार, साई थोरात. शालेय शिक्षिका सौ. एस के व्हंनायक, सौ एस एस चौगुले सौ ए आय पाटील, यांच्या उपस्थितीत प्रशालेतील इयत्ता पाचवी, सहावी, सातवी, या वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयाचे पारितोषिक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. आणि  वाढदिवसानिमित्त शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊन शिक्षणाचे महत्त्व उपस्थित विद्यार्थ्यांना समजावून दिले.  व  अमरजीत पाटील कुटुंबीयांनी शैक्षणिक मदतीच्या आधारे सामाजिक बांधिलकी जोपासून समाजासमोर एक आदर्श ठेवला. या शालेय सं...

जयसिंगपूर येथील तलाठीसह महसूल सहाय्यक लाचलुचपतच्या जाळ्यात

इमेज
जयसिंगपूर येथील तलाठी स्वप्नील वसंतराव घाटगे(वव - 39, रा. रुकडी, ता.हातकणंगले) आणि तहसील कार्यालयातील महसूल सहायक शिवाजी नागनाथ इटलावार(वव 32,सध्या रा.कसबा बावडा,कोल्हापूर, मुळ रा. कुंडलवाडी, ता.बिलोली, जि.नांदेड) यांनी सात बारा वर असलेली अडचण दूर करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उप. आधीक्षक सरदार नाळे यांनी दिली आहे  तक्रारदार यांचे  जयसिंगपूर डवरी वसाहतीत 2260 स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे. सदर प्लॉट विकणेचा आहे. मात्र, प्लॉटच्या सात बारावर तफावत होती. यामुळे विकताना अडचणी येत होत्या. ती अडचण दूर करण्यासाठी तक्रारदारानं जयसिंगपूर तलाठी स्वप्निल घाटगे यांच्याकडे अर्ज केला होता. सदर अर्ज शिरोळ तालुका तहसीलदार यांच्याकडे पाठवून त्यावर कारवाई होऊन सदर प्लॉट विकण्या योग्य नसल्याचं कळवलं होतं. त्यानंतर सदर प्लॉट विकण्या योग्य करणेकरिता तहसीलदार यांना वीस हजार, महसूल सहाय्यक शिवाजी इटलावार यांना 5000, तर टायपिस्टला अडीच हजार असे एकूण 27500 रु. लाच देण्याची मागणी स्...

राधे धामणगाव ता. सेलू येथे दप्तरा विना शाळा कार्यक्रम संपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   एचएआरसी संस्थेचा उपक्रम. सेलू : संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून परभणी येथील होमिओपॅथीक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्यावतीने  बालकांचे मोबाईल व्यसन दूर व्हावे व बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी आणि बालकांचा कला विकास मनोरंजक पद्धतीने व्हावा या उद्देशाने सदरील कार्यशाळेचे आयोजन (ता. 24फेब्रु.) शनिवार रोजी करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर    मुख्याध्यापक राजू दयावरवार, सह शिक्षक तानाजी राजे भोसले,अमोल श्रीखंडे, श्रीमती शकुंतला बरसाले व कार्यशाळेचे मुख्य प्रवर्तक तथा कला शिक्षक पांडुरंग पाटणकर हे उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन राजू दयावरवार यांनी केले. कार्यशाळेत पांडुरंग पाटणकर यांनी सकाळ सत्रात चित्र, शिल्प,नृत्य,नाट्य, गायन आणि वादन आदि ललित कला विषयी मार्गदर्शन केले .  या बरोबरच कागदकाम, टाळ्यांचे प्रकार, विविध माध्यम प्रिंट, कोलाज चित्र आणि सुतळी काम या विषयी मार्गदर्शन  केले. द्वितीय सत्रात कृतियुक्त गाणं आणि शेकोटी कार्यक्रमात  बालकांच्या चेहऱ्यावर आ...

संपूर्ण जिल्ह्यात जोरदार रास्तारोको.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  ठिकठिकाणी वाहतूक ठप्प : मराठा आरक्षणाकरीता संतप्त प्रतिक्रिया. परभणी : दि.24सकल मराठा समाजाने सगे सोयर्‍यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करावे या मागणीसाठी शनिवारी (दि.24) पुकारलेल्या रास्तारोको आंदोलनास संपूर्ण जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद मिळाला.ठिकठिकाण च्या या आंदोलनात हजारो समाजबांधव सहभागी होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्ग तसेच जिल्हांतर्गत मार्गावरील वाहतूक काही तास पूर्णतः ठप्प होती. ठिकठिकाणी दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली.परभणी तील रास्तारोकोने वाहतूक ठप्प.जिंतूर रस्त्यावरील विसावा कॉर्नर भागात सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले.त्यामुळे जिंतूर व पाथरी या महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली. शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडून होते. राज्य सरकारच्या विरोधात या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संपूर्ण परिसर अक्षरशः दणाणला होता. तालुक्यात अर्धाडझन ठिकाणी रास्तारोको... परभणी तालुक्यातील झरी तसेच असोला, राहाटी, वाडी...

यशवंत विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ.

इमेज
शिवाजी शिंदे सेलू तालूका प्रतिनिधी. सेलू : दि. 24 फेब्रु. शनिवार रोजी इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांचा यशवंत विद्यालय सेलू, येथे निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाची सुरवात  सरस्वतीच्या प्रतिमेचे  पूजनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक  साईराज मुकेशराव बोराडे सर यांनी स्वीकारले,तसेच विशेष उपस्थिती लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख कन्या प्रशाला सेलू येथील एकनाथ जाधव सर होते.प्रमुख पाहुण्यांनी मुलांना मार्गदर्शन करताना परीक्षासाठी शुभेच्छा दिल्या.यशवंत प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोरे सर व यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक थटवले सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांगुळे सरांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ, रेवलकर मॅम,पाचपुते सर,गजभारे सर,मगर सर, बरसाले सर शिसोदे मॅम, सौ. पंडित मॅम, बोराडे सर, ब्रम्हराक्षे सर यांनी विशेष परिश्रम घेतले

पत्रकार सुरेश सपकाळ यांना सांगली भूषण पुरस्काराने सन्मानित

इमेज
सांगली शहरातील गणेश मार्केटमध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीनिमित्त जरवर्षी, सांगलीला चांगली बनवण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तीचा सांगली भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते  यावर्षी सातजणांचा या पुरस्काराने सन्मानित केले. यामध्ये माहिती अधिकार व पत्रकार समितीचे जिल्हाध्यक्ष व न्यूज चॅनलचे सांगली जिल्हा प्रतिनिधी  सुरेश सपकाळ यांना सांगली भूषण पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सांगलीचे लाडके, कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे आमदार सुधीर (दादा)गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सांगलीचे उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त वैभव साबळे,  महावितरण कार्यकारी अभियंता आप्पासाहेब खांडेकर,माजी महिला बालकल्याण सभापती अस्मिता सलगर,सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस कल्याण निधीचे अभिजित देशमुख,नगरसेवक सुब्राव मद्रासी, गणेश मार्केट चे अध्यक्ष गणेश कोडते, सूत्रसंचालन आदित्यराज घोरपडे, उपाध्यक्ष अल्ताफ शेख, कार्याध्यक्ष संजय शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

जयसिंगपूरमध्ये रविवारी आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांना विनयांजलीमहाराष्ट्र कर्नाटकमधील श्रावकांची उपस्थीती

इमेज
जयसिंगपूर, प्रतिनिधी संतशिरोमणी आचार्यश्री १०८ विद्यासागरजी महामुनिराज यांचे डोंगरगड (छत्तीसगड) येथे अत्यंत उत्कृष्ट सल्लेखना पूर्वक समाधी मरण झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीस  विनम्र विनयांजली वाहण्यासाठी संपूर्ण देश-विदेशामध्ये एकाच वेळी कार्यक्रम आयोजित केले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक भागातील सर्व श्रावक-श्राविकांसाठी जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डनमध्ये रविवार (ता.२५) रोजी दुपारी १२ वाजता विनयांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.  यावेळी मंगलाचरण, आचार्यश्रीजींच्या प्रतिमेचे अनावरण, दीपप्रज्वलन, प्रास्ताविक, आचार्यश्रीजींचे पूजन, मान्यवरांचे मनोगत, आचार्यश्रीजींची आरती, जिनवाणी स्तुतीने सांगता होणार आहे.  यावेळी आचार्यश्रींच्या अंतिम समयीच्या प्रत्यक्ष घटनांचे साक्षिदार असणारे बालब्रम्हचारी तात्या भैय्या यांच्याकडून आचार्यश्रींच्या समाधीमरणाच्या अंतिमसमयीचा संपूर्ण घटनाक्रम विषद करण्यात येणार आहे.  या विनयांजली कार्यक्रमासाठी सकल दक्षिण वासियांनी मोठ्या संखेने उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिक्षण घेतल्या शिवाय प्रगती नाही : डॉ.प्रताप घोडके.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : सेलू तालुक्यातील घोडके पिंपरी येथे गावातील विवीध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार समारंभासाठी  आयोजीत कार्यक्रमात डॉ.प्रताप घोडके बोलत असतांना म्हणाले की,दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत जात आहे त्याचबरोबर विभक्त कुटुंब प्रणाली मुळे पूर्वी जी शेतीवर गुजराण होत होती ती आत्ता होणे कठीण जात आहे त्यामुळे दारिन्द्र दूर करण्यासाठी  उच्च शिक्षणाशिवाय प्रगती होणे शक्य नाही त्यामुळे आजच्या काळात शिक्षण घेणे गरजेचे आहे त्याशिवाय कुटुंबाची, देशाची प्रगती शक्य नाही. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ नागरिक पंडितराव घोडके होते.यावेळी सुप्रसिद्ध  उद्धोजक रामप्रसाद घोडके,माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रताप घोडके,माजी जिल्हा परिषद सभापती अशोकनाना काकडे यांची उपस्थिती  होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता असून योग्य ते मार्गदर्शन आणि पालकांनी लक्ष दिल्यास हे विद्यार्थी यश संपादन करु शकतात असा विश्वास डॉ.घोडके यांनी व्यक्त केला. उद्धोजक रामप्रसाद घोडके,डॉ.प्रताप घोडके,डॉ.रवींद्र घोडके, डॉ.दिगंबर घोडके, डॉ.किरण घोड...

शिरोळात शिवस्फुर्ती व्याख्यानमाला उत्साहात संपन्न रावसाहेब देसाई, ॲड.उदय मोरे , प्रवीण चुडमुंगे , शिवम माळकर , प्रज्ञा माळकर यांच्या व्याख्यानाला उदंड प्रतिसाद

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त शिरोळ येथील व्हिजन आयडॉल्स करिअर अकॅडमी , साप्ताहिक राधा महिला सोशल फौडेंशन , शिवम अध्यात्मिक व सामाजिक सेवाभावी संस्था व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली शिवस्फुर्ति व्याख्यानमाला  उत्साहात संपन्न झाली.                                       व्याख्यानमालेचे पहिले पुष्प श्री.पद्माराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे संपन्न झाले.यावेळी बोलताना प्रमुख वक्ते  रावसाहेब देसाई म्हणाले , " ध्येयहीन व दिशाहिन बनत चाललेल्या आजच्या युवापिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे.युवापिढीने आपले शरीर सुदृढ व मन कणखर बनवले पाहिजे." या कार्यक्रमाचे स्वागत  राजू नाईक  यांनी तर प्रास्ताविक ॲड. श्रीकांत माळकर यांनी केले.अध्यक्षस्थानी प्राचार्य ए. ए.मुल्ला  होते. माजी मुख्याध्यापक  एस.एस.पाटील  य...

शिरोळ स्टेट बँक शाखेला ४० लाखांची फसवणूक- म्हैसाळ येथील ठकसेन संशयित अशोक कोरवी पोलिसांच्या ताब्यात ; कोल्हापूर सह सांगली जिल्ह्यात आर्थिक फसवणूक केल्याची चर्चा

इमेज
जयसिंगपूर प्रतिनिधी सांगली जिल्हयातील म्हैशाळ ( ता मिरज )  येथील एका ठकसेनाने स्वतःची मिळकत आहे असे भासवून शिरोळ येथील स्टेट बँकेच्या शाखेला तारण देऊन चाळीस ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत  स्टेट बँक शिरोळ शाखेचे शाखा अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी शिरोळ पोलिसात फिर्याद दिली आहे .  दरम्यान , संशयित आरोपी अशोक मारुती कोरवी याला पोलिसांनी अटक केली आहे.           याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ,  म्हैशाळ येथील संशयित आरोपी अशोक मारुती कोरवी याने सिटी सर्व्हे नंबर २७३  मिळकत  ही स्वतःची आहे असे बँकेला भासवले होते. त्याने सदरची मिळकत स्वतःच्या मालकीची नसताना शिरोळ स्टेट बँक शाखेला तारण देऊन ३९ लाख रुपयांचे कर्ज घेतले .सदर कर्जाची रक्कम २५ जुलै २०१९ रोजी बँकेच्या खात्यामधून उचलले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अशोक कोरवी यांनी कर्जाची रक्कम उचल केल्यानंतर आजअखेर कर्ज व त्यावरील व्याज रकमेची बँकेला परतफेड केलेली नाही . यामुळे सदरचे कर्ज थकीत झाले असल्याने या थकबाकीच्या रक्कम वसुलीबाबत शिरोळ स्टेट ...

डॉ. संजय रोडगे यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या सेलू तालुकाध्यक्षपदी निवड.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू : (ता. 21) रोजी येथील सेलू तालुका तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये निरंतर निस्वार्थी सेवा करणारे डॉ. संजय रोडगे यांची मा. ना. संजयजी बनसोडे, मंत्री,पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य तथा पालकमंत्री परभणी, सेलू - जिंतूर विधानसभेच्या लोकप्रिय आ. सौ. मेघनादीदी साकोरे- बोर्डीकर यांनी तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती म्हणून केलेल्या शिफारशी नुसार जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्याकडून संजय गांधी निराधार योजना समितीच्या सेलू तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.या योजने अंतर्गत राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यामध्ये खास करून महिला, बालके, मागासवर्गीय, आदिवासी इत्यादी घटकांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाते. तसेच राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून विधवा महिला, अनाथ, अत्याचारित महिला, आणि निराधार महिला यांच्यासाठी देखील या योजनेचा लाभ दिला जातो.यावेळी बोलताना डॉ. संजय रोडगे म्हणाले की...

प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे प्रेसिडेन्शियल टेस्ट मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर आर प्रिन्स  इंग्लिश सीबीएसई स्कूल येथे आज संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांच्या हस्ते प्रेसिडेन्शियल टेस्ट मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रेसिडेन्शियल टेस्ट मधील गुणवंत विद्यार्थी पहिल्या वर्गातून माधवी साळुंखे,सानवी ईक्कर, दुसऱ्या वर्गातून प्रांजल सानप, स्वरूप हाडुळे, तिसऱ्या वर्गातून समर्थ सुरवसे समृद्धी सुरवसे चौथी वर्गातून प्रज्वल रोडगे श्रेयश पोद्दार, प्रेरणा काष्टे, उन्नती राठी, पाचवी वर्गातून वीरेन सोनी साची सोमानी, गौरी अबुज, ओम साई कदम सहावी वर्गातून तत्वमसी शिंदे, तेजश्री चौधरी, अभिराज मोगल शौर्य काकडे, सानवी मरेवार,वरद कुटे,अजित झाडे, हर्षल जाधव,आठवी वर्गातून ओंकार खुडे,अनिकेत आंबेकर, तनिष्का तेलभरे, क्षितिजा खजिने, नववी वर्गातून श्रुती हाडुळे, अथर्व नंद, ख़ुशी मानधणे, आदित्य लाटे या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमवेत प्रथम विद्यार्थी ऑरेंज कॅप व द्वितीय विद्यार्थी येल्लो कॅप देऊन मान्यवरांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले.प्रिन्स इंग्लिश ...

सेलू तालूक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   संपूर्ण तालुक्यातील समाज बांधवांनी आव्हानाला जोरदार समर्थन देत जागोजागी  रस्ता रोखो,चक्का जाम.    सेलू : दि.16 मराठा समाजाच्या आरक्षणा च्या प्रश्‍नावर विशेष अधिवेशन बोलवावे, आध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणास पाठींबा म्हणून सेलू सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी  16 फेबु्रवारी रोजी पुकारलेल्या जेल भरो  आवाहनास जोरदार प्रतिसाद मिळाला होता. शहरासह तालुक्यातील सर्व खेड्यातील समाज  आणि भागींनीनी स्वतः हजर राहून जेल मध्ये भरती झाले. सेलू शहरात या जेल भरो आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सकल मराठा समाजाने पुन्हा एकदा रस्ता रोको व चक्का जाम   या आंदोलनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळेच सर्व खेड्या पाड्यातील समाज बंधू आणि भगिनींनी आपले शेतातील व दैनंदिन कामे सोडून  या आवाहनास प्रतिसाद देत दि.17 फेब्रुवारी   शनिवार  रोजी  सकाळपासूनच देवगाव फाटा,मोरेगाव, पाथरी रोडवर ...

दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू:- येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयात इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्याना निरोप समारंभाचा कार्यक्रम दि.15 गुरुवार रोजी    विद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे , संस्था सचिव डॉ.सविता रोडगे शाळेचे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ कांबळे, प्राथमिक विद्याल्याच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यानी आपल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून आपली वेगळी छाप उमटवली पाहिजे. जेणेकरून आपल्या शाळेतील इतर विद्यार्थ्यानी तुमचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या शाळेतील विद्यार्थी हे मोठमोठ्या पदावर रुजू व्हावे जसे कि कलेक्टर,जिल्हाधिकारी, आय.पी.एस, डॉक्टर, वकील, इंजिनियर आदी आणि यापुढे योग्य असे क्षेत्र निवडून तुम्ही सर्व एक आदर्श व्यक्ती बनाल. असा विश्वास या वेळी संस्थेचे अध्यक्ष यांनी आपल्या मनोगातातून व्यक्त केला.इयता दहावीच्या विद्यार्थ्यांना गिफ्ट देऊन नववीच्या विध्यार्थ्या...

सेलू शहरात मराठा बंधू भगिनींचे जेल भरो आंदोलन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   संपूर्ण तालुक्यातील समाज बांधवांनी आव्हानाला जोरदार समर्थन देत जेल भरती मध्ये सहभाग. सेलू : दि.16 मराठा समाजाच्या आरक्षणा च्या प्रश्‍नावर विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणास पाठींबा म्हणून सेलू सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवार  16 फेबु्रवारी रोजी पुकारलेल्या जेल भरो  जेल भरो आवाहनास जोरदार प्रतिसाद मिळाला. शहरासह तालुक्यातील सर्व खेड्यातील समाज  आणि भागींनीनी स्वतः हजर राहून जेल मध्ये भरती झाले . सेलू शहरात या जेल भरो आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सकल मराठा समाजाने  या आंदोलनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळेच सर्व खेड्या पाड्यातील समाज बंधू आणि भगिनी उपस्थित राहून या आवाहनास प्रतिसाद देतील हे अपेक्षितच होते. त्याप्रमाणे शुक्रवार रोजी  सकाळपासूनच रायगड चौकापासून ते नूतन महाविद्यालयाचे मैदान येथे एकत्र जमवून सेलू पोलीस ठाणे येथे  सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह अन्य खेड्यापाड्यातील  कार्...

कोरेगाव येथे अतिक्रमण करून दवाखाना बांधण्यात आला असून जे बांधकाम केलेली जागा मोकळी करून मिळावी.कोरेगाव आर पी आयची मागणी

इमेज
कोरेगाव / सातारा - भारती अशोक देडीया यांच्या प्लॉट २१ नंबर मध्ये अमोल मच्छिंद्रनाथ ननावरे यांनी दवाखाना बांधून अतिक्रमण केले असून, व रीतसर नगर पंचायतकडून  परवाना व दुरुस्त अथवा रिव्हाईज केले नसेल तर त्यांना पुर्णत्वाचा दाखला देण्यात येऊ नये याबाबत मा. मुख्याधिकारीसो, नगरपंचायत कोरेगाव यांना आर पी आय कोरेगावच्या वतीने निवेदन देण्यात आले.       मौजे कोरेगाव, ता. कोरेगाव जि. सातारा भारतीय अशोक देडीया यांचा जुना रेल्वे प्लॉट नं. २१ असून, २०२० साली अमोल ननावरे यांनी देडिया यांच्या प्लॉट नंबर २१ मध्ये दीड दोन फूट आत सरून बेकायदेशिर बांधकाम केले असून सदर जागा देडिया यांची मालकीची असून ती इमारत पूर्णता बेकायदेशीर असून देडिया यांच्या जागेत जेवढी  दीड - दोन फूट जागेत अतिक्रमण केले असून ती जागा मोकळी करून मिळावी.  अन्यथा येणाऱ्या काळात सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ व कोरेगाव तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल, याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल. असा इशारा आर पी आयच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर कोरेगाव...

शनिवारी विश्व विजय मानगावे आयोजित जांभळी पट्ट्यावर भव्य बैलगाडीच्या शर्यती

इमेज
जयसिंगपूर :  सावकार गणपती प्रतिष्ठाण संचलित सावकार गणपती मंदिर माणगांवेवाडी नांदणीच्या वर्धापन दिनानिमित्ताने विश्व विजय माणगांवे आयोजित भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यतीचा थरार शनिवारी (दि.17  फेब्रुवारी) रोजी सकाळी 9 वाजता जांभळी पट्टा जांभळी-हरोली तालुका शिरोळ येथे पहायला मिळणार आहेत. यासाठी 1 लाख रुपयांचे बक्षिस व डब्बल केसरी पै.चंद्रहार पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक विजय माणगांवे यांनी दिली. महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील बैलगाडी शर्यत प्रेमीना प्रोत्साहन मिळण्यासाठी तसेच युवा पिढीला बैलगाडी शर्यत पहाता यावी यासाठी स्व.पै.बी.ए.माणगांवे यांच्या प्रेरणेतून या शर्यतीचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. या शर्यती छत्रपती शाहू पश्चिम महाराष्ट्र असोसिएशन यांच्या सहकार्यातून होणार आहेत. यात जनरल बैलगाडी अ गट, बैलगाडी ब गट, दुस्सा-चौस्सा बैलगाडी, आदत बैलगाडी व जनरल घोडागाडीच्या शर्यती होणार आहेत. विजेत्या गाडीला विश्व केसरी शिल्ड व निशान देण्यात येणार आहे. यावेळी  असंख्य शर्यत प्रेमी शेतकरी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर य...

सेलू शहरासह संपूर्ण तालुक्यात ‘बंद’ला जोरदार प्रतिसाद.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सकाळपासूनच कडकडीत बंद. सेलू : दि.14 मराठा समाजाच्या आरक्षणा च्या प्रश्‍नावर विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणास पाठींबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार 14 फेबु्रवारी रोजी पुकारलेल्या सेलू  बंदच्या आवाहनास जोरदार प्रतिसाद मिळाला. शहरासह तालुक्यातील सर्व व्यापारीपेठा, प्रतिष्ठाने संस्था पूर्णतः बंद होत्या. सेलू शहरात या बंदच्या पार्श्‍वभूमीवर सकल मराठा समाजाने  पुकारलेल्या बंदला   व्यापारी महासंघाच्या  सर्व व्यापार्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून या आंदोलनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळेच विविध व्यापारी या आवाहनास प्रतिसाद देतील हे अपेक्षितच होते. त्याप्रमाणे बुधवारी सकाळपासूनच मध्यवर्ती भागातील तसेंच गल्लीतील व्यापारी पेठेतील एकही दुकान निर्धारित वेळेत उघडले नाही. अन्यत्रही तेच चित्र होते. बाजारपेठांमधून कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळेच सर्वदूर कमालीचा शुकशुकाट होता. सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह ...

उपजिल्हा रुग्णालय ते निपाणी टाकळी 5 कि.मी रस्त्याचे डांबरीकरण करा.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  अनेकदा निवेदन देऊन ही लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष.  सेलू : दि.12 सोमवार रोजी जिंतूर-सेलू मतदारसंघांच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांना भेटून   उपजिल्हा रुग्णालय ते निपाणी टाकळी हा 5 कि.मी. चा रोड चे डांबरीकरण पूर्ण करून हा रोड रहदारीस सोईस्कर करावा अशी मागणी लेखी यापूर्वी सेलूतील विविध सामाजिक संघटना,सेलू तालूका  दबाव गट,दैनिक एकजूटचे सेलू तालूका प्रतिनिधी शिवाजी शिंदे ,समाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड आदीसह अनेकदा निवेदन देन्यात आले होते. वेळोवेळी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी जनतेच्या निवेदनाला केराची टोपली दाखविली.वारंवार जनतेमधून मागणी होत आहे याच अनुसंगाने दि.12 फेब्रु.रोजी परत एकदा सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड व निपाणी टाकळी चे रहिवासी तथा शारदा विद्यालय सेलू चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रशेखर नावाडे यांच्या सह अनेक लोकांनी सेलू जिंतूर विधान सभेचे आमदार सौ.मेघनाताई बोर्डीकर-साकोरे यांना निवेदन सादर केले या निवेदनात  सेलू ते निपाणी टाकळी या 5 कि.मी रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रख...

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे ऍडीशनल एस पी रितू खोखर यांना निवेदन

इमेज
सांगली - माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती सांगली जिल्हा यांच्यावतीने माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य सचिव सतीश मोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ऍडीशनल एस पी रितू खोखर यांना जिल्ह्यामध्ये व राज्यात होत असलेल्या माहिती अधिकारी(RTI)कार्यकर्ते व अंत्यत हुशार ,निर्भीड व परखडपणे सामाजिक मत मांडणारे पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ला याबाबत निषेध व्यक्त केला व आश्याप्रकारचा  संविधानिक मार्गाने जाणाऱ्या पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्ते ,माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावर  होणारे हल्ले हे समाज्यातील विघ्नसंतोषी लोक करतात हे समाजाच्या दृष्टीने विघातक आहे त्यामुळे त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी व अश्या प्रकारे आपल्या अधिकार क्षेत्रांमध्ये व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून घडू नये यासाठी उपाय योजना करण्याची   व शासन नियमाप्रमाणे संरक्षण देण्याची मागणी केली यावेळी इंडियाचा आवाज न्यूज चॅनलचे संपादक  रवींद्र कांबळे, विशाल क्रांतीचे संपादक आप्पासाहेब भोसले ,माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती जिल्हा अ...

शाळा हीच आमच्या यशाची गुरुकिल्ली-वंदना कुलकर्णी.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : दि.11फेब्रु. आमच्या यशाच्या, ध्येयाच्या पाठीशी आमची शाळा, आमचे नूतन कन्या शाळेतील गुरूजन भक्कम पाठीशी होते.त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीच्या जोरावरच आम्ही आमचे उचित ध्येय साध्य करू शकलो.नूतन कन्या प्रशालेत 1993 च्या बॅचच्या माजी विद्यार्थीनी वंदना कुलकर्णी यांनी प्रतिपादन केले.नूतन कन्या प्रशालेत 1993 च्या 10 वी च्या batch च्या माजी विद्यार्थीनी मेळावा प्रसंगी विद्यार्थीनी बोलत होत्या.प्रशालेत  व्यासपीठावर नूतन कन्या प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक रोहिदास मोगल,उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, नूतन विद्यालयाचे  प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील,भालचंद्र गांजापुरकर, सेवानिवृत्त शिक्षक नारायण इक्कर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रशालेच्या जयश्री लोसरवार, अनिता देशमुख, मिनाक्षी काटकर, वंदना कुलकर्णी, मीरा जोशी,मुरारी राजमनी, लता गिल्डा, स्नेहा राठी,मनीषा कुलकर्णी, प्रज्ञा देशपांडे,आश्विनी दांडेकर, सुनीता मालाणी,शेख बेगम यांनी प्रशाले विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. अतिशय भावनिक वातावरणात हा मेळावा संपन्न झाला.सूत्र...

भगवान महावीर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबईचा यश पाटील विजेता

इमेज
महावीर महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकाला बक्षीस देताना चेअरमन ॲड. के. ए. कापसे. सोबत बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रशासकीय अधिकारी श्री. गणेश अंबरे आणि चेतन माने, मोहन गरगटे, गुणवंत रोटे, प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, प्रा. जयवंत दळवी.                                   कोल्हापूर  : (सुरेश केसरकर) महावीर महाविद्यालयात गेली ४४ वर्षे भगवान महावीर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा अव्याहतपणे सुरु असून स्पर्धेचे हे ४५ वे वर्ष होते. यावर्षी या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दि. १० फेब्रुवारी रोजी आयोजित या स्पर्धेमध्ये मुंबईच्या यश पाटील याने प्रथम क्रमांक पटकाविला. ४५ व्या भगवान महावीर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन श्री. आ. दे. शि. प्र. मंडळाच्या संचालिका डॉ. सुषमा रोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी वक्तृत्व ही कला असून, ती जोपासणे हे सर्वांची जबाबदारी आहे. महावीर महाविद्यालय गेली ४५ वर्षे ही वक्तृत्व कला जोपासण्याचे कार्य या ...

लोकसभा निवडणूक जाहिर, महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात होणार लोकसभा निवडणूक

इमेज
पहिला टप्पा -11 एप्रिल: (7 लोकसभा सीट) नागपुर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गढ़चिरौली, चंद्रपुर और यवतमाल-वाशिम दूसरा टप्पा -18 एप्रिल: (10 लोकसभा सीट) अकोला, बुलढाणा, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड़, उस्मानाबाद, लातूर, सोलापुर तीसरा टप्पा -23 एप्रिल: (14 लोकसभा सीट) औरंगाबाद, जलगांव, रावेर, जालना, रायगढ़, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सतारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापुर, हातकणगले चौथा टप्पा – 29 एप्रिल: (17 लोकसभा सीट): नंदुरबार, धुलिया, दिंडोरी, नासिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावल, शिरूर, शिर्डी, मुबई उत्तर, मुंबई उतर पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उतर-मध्य, मुंबई दक्षिण- मध्य और मुंबई दक्षिण

पालकांनो सावधान हे ८ दिवस आपापल्या मुलामुलींकडे लक्ष द्या.

इमेज
आपण जरी जागरूक असलो तरीही शाळा कॉलेज मध्ये हल्ली व्हॅलेंटाईन विक मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात, इंग्रजांनी पेरलेली ही घाण सुज्ञ समाजात जरी दिसत नसली, तरीही शाळा कॉलेज मधील अल्पवयीन नासमज मुलामुलींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे, या ८ दिवसात तुमच्या मुलामुलींची बॅग तपासा, त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांच्याकडे गुलाब, चॉकलेट, तेडिबियर, गिफ्ट आदी गोष्टी दिसतात का ते बघा. तुमचा मुलामुलींचे शाळा, कॉलेज, क्लासेस चे टाईम वारंवार तपासात रहा, त्याव्यतिरिक्त ते अन्य ठिकाणी कुठे जातात का याची खबरदारी घ्या. आपल्याला जरी हा बालिशपना वाटत असला तरीही याचं अठवड्याभरात भारतातील लाखो मुली चुकीचा मुलांचा जाळ्यात अडकतात. छोट्याश्या गिफ्ट, चॉकलेट ला भाळून चुकीचा मुलांचा प्रेमात पडतात, म्हणून ८ दिवस वेळात वेळ काढून याची खबरदारी घ्या. असंख्य मुलींना फसविण्यासाठी चुकीचा लोकांकडून व्हॅलेंटाईन विक चा वापर केला जातो आणि याच आठवड्यात असंख्य मुली त्यांचा जाळ्यात अडकतात. हि वास्तविकता नाकारता येत नाही. सावधान......!