पट्टण कोडोली तील यश अबॅकस च्या विद्यार्थ्याची इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड.
मौजे पट्टण कोडोली येथील यश अबॅकस यांचा विद्यार्थी कुमार अथर्व संजय धनगर राहणार मांगुर याची इंटरनॅशनल (इंडोनेशिया) अबॅकस स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
त्याचे प्राथमिक शिक्षण मराठी शाळा मांगुर व माध्यमिक शिक्षण भैरवनाथ हायस्कूल मांगुर येथे सुरु आहे त्याच्या निवडीसाठी त्याला मोलाचे सहकार्य दिपाली सुनील बोंगाळे(मॅडम)सुनील वसंत बोंगाळे (सर) यांच्या कडून लाभले त्याच्या इंटरनॅशनल स्पर्धे मध्ये निवडी बद्दल त्याचे गावातून तसेच शाळेतून कौतुक होत आहे त्याच्या यशामध्ये त्यांच्या आई-वडिलांचा मोलाचा वाटा आहे पुढील वाटचालीसाठी त्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
टिप्पण्या