रायबाग : शहरातील नृत्य कलाकार आणि अभिनेता रसुल जलील मोमिन (५५) यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व नातेवाईक, मित्र, शिष्य असा मोठा परिवार आहे.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : सेलू शहरात विकासकामांचा धडाका मागील काही दिवसांपासून सुरू आहे.नवीनरस्ते,नाली,सुशोभीकरण आदी नागरिकांच्या सुविधे साठी करण्यात येत आहे.याचाच भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ते मदरसा पर्यंत असलेला रस्ता हा नगर परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करून नवीन राज्य महामार्ग गेल्यावर्षी तयार करण्यात आला होता.या राज्य महा मार्गावर दळण वळण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून नागरी वस्ती मुळे दरदिवशी अनेक अपघात होत आहेत.त्यातच भरीस भर म्हणून वालूर नाका परिसरात जलवाहिनी जोडणीचे काम मागील दीड महिन्यापासून हाती घेण्यात आले असून नवीन झालेल्या रोडवर मोठ्या प्रमाणा त खोदकाम करण्यात आले आहे अद्यापही हे काम पूर्ण झालेले नसून नवीनच झाले ल्या राज्य महामार्गाचे मोठे नुकसानकरण्यात आले आहे.हा राज्य महामार्ग बनविण्याचे काम सुरू असताना अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अंतर्गत असलेल्या जलवाहिनीचे काम त्याच वेळी हाती घेवून पूर्ण केले गेले नाही त्यामुळे सद्यस्थितीत नवीन झालेला रोड खोदून जोडणी करण्यात येत आहे.या मनमानी कारभारामुळे नागरिकांकडून गोळा केलेला पैशाच...
गांधीनगर: वळीवडे येथील कपिल मारुती घाटगे सदस्य,ग्रामपंचायत वळीवडे यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीच्या निमित्ताने मानवतवादी सांस्कृतिक चळवळ व दिक्षा चारिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्यावतीने सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय व जनसेवेच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२५ राजर्षी शाहू स्मारक भवन,मिनी सभागृह,कोल्हापूर येथे मा.अनिल म्हमाने यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार देण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.भरत रसाळे,प्रा.किसनराव कुऱ्हाडे, मा.भरत लाटकर, मा. प्राचार्य डॉ.प्रशांतकुमार कांबळे, डॉ. सोमनाथ कदम या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मानवतावादी सांस्कृतिक चळवळीचे विश्वासराव तरटे,अंतिमा कोल्हापूरकर,अहर्त मिणचेकर, विशाल फुले व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू :आज दि. 11 फेब्रू. रोजी पोलीस स्टेशन सेलू येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने एक निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे की, सेलूतील अनेक सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांचा वावर वाढत आहे. त्या मध्ये अष्टविनायक मंदिर शास्त्रीनगर, साईबाबा मंदिर महेश नगर, जायकवाडी परिसर व इतर अनेक सार्वजनिक ठिकाणी अश्लील जाळे करणारे खुलेआम अश्लील चाळे करत आहेत त्यामुळे तेथील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कधी बोलायला गेल्यास ही जोडपी हमरी तुमरीवर येत आहेत. या जोडप्यां मुळे शाळेतील लहान मुलांवर वाईट परिणाम होत आहेत. तसेच देवदर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांना यांचा त्रास होत आहे आता 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे येत आहे त्यामुळे या जोडप्यांचे जास्तच पेव फुटत आहेत यामध्ये भरपूर मुली अल्पवयीन आहेत.तरी ताबडतोब या अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांचा बंदोबस्त करावा.नसता भारतीय जनता पार्टी सेलूच्या वतीने यांचा बंदोबस्त करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे निवेदन जयसिंग शेळके, नामदेव झिंबरे, नागेश ठाकूर, शिवहरी शेवाळे, अशोक शिंदे, शिवाजी रा...
टिप्पण्या