जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली.,राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग
कोल्हापूर, दि. 16 जिल्ह्यातील राधानगरी धरणात 4.69 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, कासारी नदीवरील- येवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, वालोली, बाजार भोगाव, वारणा नदीवरील -चिंचोली, तांदूळवाडी, कोडोली व खोची, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कुंभी नदीवरील- शेनवडे, मांडुकली व कळे असे एकूण 31 बंधारे पाण्याखाली आहेत.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 4.69 टीएमसी, तुळशी 1.95 टीएमसी, वारणा 20.61 टीएमसी, दूधगंगा 10.92 टीएमसी, कासारी 1.69 टीएमसी, कडवी 1.90 टीएमसी, कुंभी 1.34 टीएमसी, पाटगाव 2.70 टीएमसी, चिकोत्रा 0.65 टीएमसी, चित्री 1.30 टीएमसी, जंगमहट्टी 1.12 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.04 टीएमसी, सर्फनाला 0.28 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 30.2 फूट, सुर्वे 28.6 फूट, रुई 58.9 फूट, इचलकरंजी 55.6 फूट, तेरवाड 50.6 फूट, शिरोळ 43.3 फूट, नृसिंहवाडी 42.6 फूट, राजापूर 31 फूट तर नजीकच्या सांगली 16.6 फूट व अंकली 31 फूट अशी आहे.
टिप्पण्या