माजी आमदार मा.मालोजीराजे छत्रपती यांच्या कडून पूर परिस्थितीची पाहणी
कोल्हापूर शहरामध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे पूर आलेल्या भागातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले व ते भयभीत झालेले आहेत अशा परिस्थितीत माजी आमदार माननीय मालोजीराजे छत्रपती यांच्याकडून कोल्हापूर शहरातील पूर आलेल्या भागात पाहणी करून त्यांना दिलासा देण्यात आला तसेच त्यांना मदत करण्याची तयारी दर्शवली माननीय मालोजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर शहरातील शाहूपुरीतील कुंभार गल्ली, कदमवाडी,बापट कॅम्प, न्यू पॅलेस परिसर,वागळे मळा, चित्रदुर्ग मठ, पंचगंगा तालीम परिसर, रमणमळा,जाधववाडी अशा पूर आलेल्या विविध भागात जाऊन त्यांची पाहणी केली यावेळी त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या