अकिवाटचे प्रगतशील शेतकरी तात्यासाहेब सदलगे यांची नाथ कु.ऋतूजा पाटील(जयसिंगपूर)हिचे सी.ए.परिक्षेत यश

अकिवाट वार्ताहर / सचिन मठपती 
      जयसिंगपूर येथील कु.ऋतूजा रामगोंडा पाटील हिने मे २०२४ मध्ये झालेल्या सी.ए.परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.तिचे प्राथमिक शिक्षण दिप पब्लिक स्कूल जयसिंगपूर तर उच्च माध्यमिक शिक्षण डी.के.टी.ई कॉलेज इचलकरंजी येथे झाले आहे.या यशासाठी आई,बाबा यांची प्रेरणा शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन तर मित्रपरिवार यांचे सहकार्य लाभले.अकिवाट येथील प्रगतशील शेतकरी तात्यासाहेब सदलगे यांची ती नाथ आहे.तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.