शिरोळ तालुका खाजगी शिक्षक सेवकांची सह.पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
शासनाकडून शिक्षण संस्थेला देण्यात येणार्या वेतनेत्तर अनुदानात वाढ व्हावी. शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावे, या प्रलंबित प्रश्नासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. शिरोळ तालुका खाजगी शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेने सभासदांना आर्थिक पाठबळ दिले. त्याप्रमाणे त्यांच्या मुलांना आपल्या भागात रोजगार व्यापार उपलब्ध व्हावा, यासाठी ही सामाजिक संकल्पना हाती घेऊन भविष्यात काम करावे, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.,
शिरोळ तालुका खाजगी शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्थेचा रौेप्य महोत्सवी वर्ष त्यानिमित्ताने सेवानिवृत्ती शिक्षक गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अशा संयुक्त कार्यक्रमात आमदार यड्रावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर होते.
महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, पतसंस्थेचे संस्थापक बादशाह जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील सोनाबाई इंगळे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बादशाह जमादार यांनी खाजगी शिक्षक सेवक वंचित घटकांना आर्थिक पाठबळ मिळावे त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे या उद्देशाने ही पतसंस्था स्थापन केली. या पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी आमदार जयंत आसगांवकर यांच्या नेतृत्वाखाली शासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवला जाईल असे अभिवचन ही त्यांनी दिले.
अध्यक्षीय भाषणात आमदार आसगांवकर म्हणाले, सध्याच्या काळात आर्थिक संस्था चालवणे अत्यंत कठीण बनत चालली आहे. अशा परिस्थितीत ही बादशाह जमादार यांच्यावर संचालक मंडळ व सभासदांनी विश्वास ठेवला आहे त्या पतसंस्थेचे कार्य आदर्शवत असून सेवानिवृत्त शिक्षकांनी पुढील काळात समाजासाठी मार्गदर्शन करावे.
यावेळी भरत रसाळे म्हणाले, पतसंस्थेने दिलेल्या आर्थिक पाठबळावरच सभासदांची अनेक मुले उच्चभू शिक्षण घेऊन मोठ्या पदावर कार्यरत आहेत. पतसंस्थेच्या संचालक मंडळाने सेवाभावी वृत्तीने कामकाज केले त्यामुळेच पतसंस्थेचा प्रगतीचा आलेख वाढत आहे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली त्रिशला पोवळे यांनी स्वागत गीत म्हटले. चेअरमन महावीर पाटील यांनी स्वागत केले. सेक्रेटरी संजय यादव यांनी अहवाल वाचन केले.सभासदांनी एकमताने सर्व विषयांना मंजुरी दिली. पतसंस्थेचे संस्थापक बादशाह जमादार यांनी प्रास्ताविकात पतसंस्था स्थापनेचा हेतू विशद करून पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
संचालक मंडळाच्या सहकार्यामुळे सभासदांच्या विश्वासात पात्र राहुन संस्थेचे पारदर्शक कामकाज केले जाईल पतसंस्थेची स्वमालकीचे इमारत असून सतत संस्थेला अवर्ग मिळाला असून सभासदांना प्रत्येक वर्षी रोख व भेटवस्तू स्वरूपात 25 टक्के लाभांश दिला जातो. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक महावीर पाटील सूर्यकांत शितोळे यांचा सह पत्नीकतसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभाग माजी सभापती महादेव धनवडे, केशव राऊत, हिदायत नदाफ, सुभाष मुरगुंडे, पतसंस्थेचे संचालक सुनील कोळी, नलिनी काळे संगीता शेडबाळे, बाळाप्पा कोरे, मोहम्मद रफीक मुलाणी, सुभाष नलवडेे बाबासो तिबिले किशोर मोरे राहुल नोकुडकर , सीमा बोराटे, सुमन नकाते यांच्यासह सभासद कर्मचारी सेवक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन रविंद्र शेटके यांनी तर आभार व्हा.चेअरमन दीपक कोलप यांनी आभार मानले.
टिप्पण्या