राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य कडून कोल्हापूर महानगरपालिकेला निवेदन
आज कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील कोल्हापूरहून पुणे मुंबई कडे जाणाऱ्या मार्गावरील तावडे हॉटेल येथील कमानीवर छत्रपती शाहूमहाराज यांच्या नावाचा कमानीवर दोन्ही बाजूला बोर्ड लावण्यात आलेला आहे पण कमानीवरील एका बाजूचा बोर्ड हा पूर्ण पणे खराब झालेला आहे काही दिवसापूर्वीच हा बोर्ड त्या कमानीवर बसवण्यात आला होता आज राजे फाऊंडेशन कडून त्या कमानीवर डिजिटल बोर्ड न बसवता कायम स्वरूपी ऍक्रेलिक (लाईट)बोर्ड बसवण्यात यावा या विषयाचे निवेदन कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा.राहुल रोकडे यांना देण्यात आले येत्या पंधरा दिवसात जर हा बोर्ड कमानी वरती दोन्ही बाजूला बसविण्यात नाही आला तर राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कडून कोल्हापूर महानगरपालिका प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.यावेळी राजे फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे, पश्चिम महाराष्ट्र सचिव रशीद सय्यद, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा.संग्राम पाटील,कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष मा.नरेंद्र पोवार, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा. संजीव भालेकर, कोल्हापूर जिल्हा सचिव मंजूर सय्यद, कोल्हापूर शहर महिला अध्यक्ष स्वरूपा खुरंदळे, कोल्हापूर शहर सचिव मोहसीन सय्यद आदी उपस्थित होते.
टिप्पण्या