शहापूर खुनाच्या गुन्हयातील तीन आरोपीना काही तासातच केले जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शहापूर पोलीस ठाणेची संयुक्तीक कारवाई

शहापूर इचलकरंजी - 
दिनांक ०३/०६/२०२४ रोजी रात्री २३.१५वा ते दिनांक ०४/०६/२०२४ गंजी ०७.३० वा. या मुदतीत शाहापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये डॉ सरोजनी नायडू विद्यालय क्र.४३ चे मार्ग उघडयावर मुशांत दिपक कांबळे, वय १८ रा. आसरा नगर इचलकरंजी ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या तरुणाचा अज्ञात कारणासाठी अज्ञात आरोपीने धारदार शस्वाने तोंडावर, पाटीवर, मांडीवर वार करून, त्याचा खून केला. त्याबाबत त्यानी आई श्रीमती दिपाली दिपक कांबळे यांनी शहापूर पोलीस ठाणेस आरोपींचे विरुध्द दिलेल्या तक्रारी प्रमाणे शाहपुर पोलीस ठाणेस गुन्हा रजि.न. २२८/२०२४ भा.न्या.स. कलम १०३(१), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. घडलेल्या घटनेचे गांभीर्य ओळखुन मा. पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर यांनी आरोपी तात्काळ ताब्यात घेणे बाबत शहापूर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुर्यवंशी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे, पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांना सुचना दिल्या.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सदरच्या गुन्हयाबाबत माहिती घेवुन गुन्हयातील आरोपीना ताब्यात घेणे करीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडील पोलीस उप निरीक्षक संदिप जाधव व शेष मोरे यांचे अधिपत्याखाली व शहापूर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवंशी यांनी पोलीस उप निरीक्षक श्रीकृष्ण दरेकर यांचे पथक, अशी दोन तपास पथके तयार करुन, त्यांना सुचना देवुन रवाना केले. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शना प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण तपास पथक गुन्हयातील संशयीत आरोपी अतिष नेटके, आर्यन चव्हाण, प्रदिप पारस सर्व रा.इचलकरंजी शोध घेत असताना, सदरचे आरोपी हे कोल्हापूर येथे राजाराम कॉलेजच्या इमारतीच्या मागील बाजुस असले मैदानामध्ये आले असल्याचे समजुन आले. त्याबाबत खात्री करुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने व शहापूर पोलीस ठाणेच्या पथकाने संयुक्तरित्या सापळा लावुन त्यांना जागेवरच ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीना नाव पत्ता विचारले असता त्यानी त्यांची नावे १) अतिष उर्फ टक्या दत्तात्रय नेटके वय १९ रा.१०२ सहकारनगर इचलकरंजी, २) आर्यन सरदार चव्हाण वय २१ रा.गणेश नगर इचलकरंजी, ३) बाळु उर्फ प्रदिप पारस यादव वय २० रा.जे.के.नगर शहापूर यांचेकडे चौकशी करता यांनी केलेल्या गुन्हयाची कबुली दिली.

नमुद आरोपीकडे अधिक चौकशी केली असता आरोपी न.१ अतिष दत्तात्रय नेटके हा व मयत सुशांत दिपक कांबळे हे दोघ एकमेकाचे मित्र होते. त्यांचेत घोडागाडी परत मागितलेचे कारणावरुन व घोडागाडी शर्यतीच्या जुन्या कारणावरुन गेल्या काही दिवसापुर्वी वाद झाले होते. पुर्वी झालेल्या भांडणाचा मनात राग धरुन काल दिनांक ०३/०७/२०२४ रोजी मयत सुशांत दिपक कांबळे हा डॉ. सरोजनी नायडु विद्यालया जवळ थांबलेला असताना आरोपी अतिष उर्फ टक्या नेटके, आर्यन चव्हाण, प्रदिप यादव
   एका गाडीवरुन तेथे आले व मयत सुशांत दिपक कांबळे याना धारदार शस्वाने त्याचे तोंडावर, पाटीवर, मांडीवर वार करून, त्याचा खुन केला. अशी त्यांचेकडुन माहिती दिली. सदर आरोपी हे सदरचा प्रकार घडल्या नंतर काही तासातच त्याना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने व शहापूर पोलीस ठाणे कडील पथकाने मुंयुक्तीकरित्या ताब्यात घेतले आहेत.

सदरची कामगीरी मा.पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित सारे कोल्हापूर, मा. अपर पोलीस अधीक्षक, निकेश खाटमोडे पाटील, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शना प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, शहापूर पोलीस ठाणंचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस उप निरीक्षक श्रीकृष्ण दरेकर, स्था.गु. शाखेकडील पोलीस उप निरीक्षक संदिप जाधव, शेष मारे, सहा फौजदार खंडेराव कोळी, पो.हे.कॉ. प्रकाश पाटील, प्रशांत कांबळे, पो.ना. सागर भौगुले, संजय कुंभार, महेश खोत, चालक राजेंद्र वरांडेकर तसेच शहापूर पोलीस ठाणे कडील साजिद कुरणे प्रमोद भांगरे, मोहिते, अर्जुन फातले यांनी केलेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.