जगजीवन रामसभा भवनात महसूल दिन साजरा
चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी यांच्या हस्ते विभागातील कर्मचाऱ्यांना गुणात्मक व मूल्यवर्धित सेवेबद्दल प्रशंसापत्र देऊन सोमवारी जगजीवन रामसभा भवनात महसूल दिन साजरा करण्यात आला.
तहसीलदार सुरेश मुंजे, ग्रेड 2 तहसीलदार परमानंद मंगसुली, डी.एस.जमादार, सीपीआय एचडी मुल्ला, कृषी अधिकारी विनोद मावरकार, बीईओ बसवराजप्पा आर., अभिषेक बोंगाळे, रायबाग/कुडची होबलिसचे महसूल निरीक्षक, गावातील सर्व अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या