शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाराही पाण्याखाली

शिरोळ : प्रतिनिधी : धरण व पाणलोट क्षेत्राबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे यात पंचगंगेबरोबर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून कृष्णा नदीवरील महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील शेवटचा राजापूर बंधारा मंगळवारी रात्रीच्या सुमारास पाण्याखाली गेला. त्यामुळे या मार्गावरुन कर्नाटकात जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. तर तालुक्यातील शिरोळ तेरवाड कनवाड हे बंधारे सुद्धा पाण्याखाली असल्यामुळे ा बंधार्‍यावर होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे
  दरम्यान पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाणी तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्यावरुन वाहत आहे. त्यामुळे तेरवाड बंधाऱ्याला तटलेली जलपर्णी वाहत शिरढोण पुलाला तटली आहे.
   शिरोळ तालुका पावसाअभावी कोरडा असला तरी पंचगंगा व कष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात धुवाॅधार पाऊस होत असल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली असून तालुक्यातील तेरवाड व शिरोळ बंधारा दोन दिवसा पूर्वीच पाण्याखाली गेले आहे.
  कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने राजापूर बंधारा पाण्याखाली गेला त्यामुळे या मार्गावरुन मंगावती, जुगुळ या कर्नाटकातील गावांत जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.