नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनची पूरग्रस्तांना मायेची उब.नानीबाई चिखली, बानगे, कुरुकली येथील पूरग्रस्तांना ब्लॅंकेटचे वाटप.....

कागल, दि. ३०: (डॉ. सचिन  पोवार प्रतिनिधी )
नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनने पूरग्रस्तांना मायेची ऊब दिली आहे. वेदगंगा नदीला आलेल्या महापुरामध्ये स्थलांतरित झालेल्या नानीबाई चिखली, बानगे, कुरुकली येथील पूरग्रस्तांना नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
              
वेदगंगेच्या या महापुरामुळे या तिन्ही गावातील अनेक महापूरग्रस्तांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. या सर्वांचे संसार पाण्याखाली बुडून भिजून गेले होते. यावेळी नानीबाई चिखली येथील-१५०,  कुरुकली येथील-७१,  व बानगे येथील-६६, अशा एकूण २८७ महापूरग्रस्तांना ब्लॅंकेट्सचे वाटप झाले.
यावेळी कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नानीबाई चिखलीचे बिद्री कारखान्याचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य सदाशिव तुकान, बानगेचे राजू पाटील, धनाजी पाटील, संतराम पाटील,  कुरुकलीचे महेश पाटील, प्रकाश दाभोळे, माजी उपनगराध्यक्ष प्रविण काळबर, अर्जुन नाईक आदी प्रमुख उपस्थित होते.
...................
       
कागल: नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने कागल तालुक्यातील नानीबाई चिखली, बानगे व कुरुकली येथील पूरग्रस्तांना ब्लॅंकेट्सचे वाटप पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.