नाईट कॉलेज इचलकरंजी चे पुरपरिस्थीतीत प्रशासनास मदत.
नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अति पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये इचलकरंजी महानगरपालिकेच्या पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जनजागृती करण्यात येते या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शिरदवाड रोड पूर परिस्थिती मुळे बंद आहे तसेच या उद्भवलेल्या परिस्थिती मध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पूर् नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने नदीवेस नाकाबंदी केलेल्या ठिकाणी जाऊन मदत केली यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ सचिन चव्हाण यांनी नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन आणि पूर्ण नियंत्रण याविषयी माहिती दिली सदरचा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पुरंदर नारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला यावेळी पोलीस उपनिरीक्षक किशोर आंबुडकर महानगरपालिका अग्निशामक दलाचे जवान तुषार हेगडे, रिलायन्स जिओचे मॅनेजर श्री परशुराम बोटे , सुनिल आवळे,नवल कुरणे,प्रा सौरभ पाटणकर, प्रा अभिजीत पाटील,प्रा माधव मुंडकर, प्रा एफ एन पटेल,उपस्थित होते सदर मदत कार्यास राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व माजी विद्यार्थी उपस्थित होते सदर मदत कार्याचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा डॉ सचिन चव्हाण यांनी केले
टिप्पण्या