मौजे आगरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सहात संपन्न झाली .
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महर्षि व्यास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली .स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे यांनी केले .उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला .
नविन प्रवेशित विद्यार्थ्यांना विद्यालयाकडून शालेय गणवेश , स्कूल बॅग व शालेय साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले .
यावेळी विद्यार्थी अमृता लाड , हर्षदा चव्हाण , चैत्राली सावळे , ओंकार लाड , श्रावणी चव्हाण , अस्मिता कांबळे , महेक शेख इत्यादी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात गुरूच महत्व विशद केले .
रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव मेजर के. एम् भोसले व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे नूतन सदस्य अमित जाधव यांचा सत्कार करण्यात आला .
संस्थेचे उपाध्यक्ष शहाजीराव दाभाडे यांनी गुरुचे आपल्या जिवनातील असलेले महत्त्व याविषयी माहिती दिली .
आभार संस्थेचे सचिव मेजर के. एम् भोसले यांनी मानले .सुत्रसंचालन शिक्षक नितिन बागुल व कु हिरकणी कोळी यांनी केले . कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. भोजलिंग नरळेध सुरेश जाधव , श्रीकांत जाधव लालासो पाटील , संस्थेचे खजिनदार कृष्णात पाटील , संचालक अमोल चव्हाण , शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
टिप्पण्या