मौजे आगरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्व. गजाननबापू पाटील यांची पुण्यतिथी संपन्न
शिरोळ : प्रतिनिधी : विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. गजाननराव (बापू) पाटील यांची चौथी पुण्यातिथी त्याचबरोबर विद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी कै. उदय वसंतराव ढोकळे यांची प्रथम पुण्यतिथी संपन्न झाली .
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ जगदीश पाटील सचिव मेजर के. एम् भोसले, खजिनदार कृष्णात पाटील, संचालक सुरेश पाटील,भगवान कांबळे, संग्रामसिंह देसाई, अणुसया चव्हाण ,अमोल चव्हाण,अमित जाधव,अरुण पोटे,मनोज पाटील,शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै. गजाननराव पाटील (बापू ) व कै. उदय वसंतराव ढोकळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली .स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे यांनी केले. मेजर के. एम् भोसले यांनी आपल्या मनोगतातून कै. गजाननराव पाटील (बापू) यांच्या कार्याची ओळख करून दिली .
संस्थेचे अध्यक्ष जगदीश पाटील यांनी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळच्या अध्यक्ष व ट्रेझररपदी निवड झालेल्या मान्यवरांचे स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .
रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळच्या अध्यक्षपदी तुकाराम पाटील ( भैय्या ) व ट्रेझरर म्हणून चंद्रकांत भाट यांची नियुक्ती झालेबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला .
यावेळी चंद्रकांत भाट यांनी आपल्या मनोगतातून सत्कार केल्याबद्दल संस्थेचे व शाळेचे आभार मानत भविष्यात विद्यालयासाठी हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले .
आभार संस्थेचे सचिव मेजर के. एम भोसले यांनी मानले.
टिप्पण्या