कृष्णाकाठची जनावरे स्थलांतरित

अकिवाट प्रतिनिधी / सचिन मठपती 
 अकिवाट  तालुका शिरोळ येथील आलास पाणवठामळी भाग येथील शेतकऱ्यांनी आपली जनावरे व वाळला चारा ओला चारा पशुखाद्य ट्रॅक्टर ट्रॉलीतून सुरक्षित ठिकाणी आणत आहेत
जनावरे आणण्यासाठी मित्रमंडळी व पै पाहुणे मदत करताना दिसत आहेत. तांबोळी रजपूत, कोळी ,आवटी, गजण्णावर पुदाले,नरवाडे,माणगावे, रायनाडे, या सर्व शेतकऱ्यांचे 200 हून जनावरे आहेत. यामध्ये जर्सी गाय, मुराळ म्हैस अशा जातीच्या किमतीचे जनावरे असलेने लंगोटे ओढयात जास्त पाणी आले म्हणजे जनावरे  सुरक्षित ठिकाणी आणता येत नाही म्हणून मंगळवारी 23 जुलै रोजी बर्यापैकी  जनावरे अलीकडे आणलेत व आणत आहेत.युवा शेतकरी उमेश आवटी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना असे म्हणाले की पाण्याला म्हणावं तेवढा जोर नाही परंतु हा मार्ग बंद झाला तर जनावरे अलीकडे आणायला जिकीरीचे व त्रासाचे होते अन प्रशासनाच्या सूचनेनुसार आमची जनावरे सुरक्षित ठिकाणी आणलो आहोत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.