भंगलेल्या संसारास न्यायदेवतेने दिली नवी दिशा

यड्राव ( प्रतिनिधी )
 शेडशाळ (  ता .  शिरोळ ) येथील अब्दुल रहीम  भालदार व नरवाड तालुका मिरज येथील मिलन भालदार यांचा 15 वर्षा पूर्वी मुस्लिम धर्मा चे रीती रीवजा नुसार विवाह झाला होता सदर लग्न संबंधातून 3 मुली ही त्यांना झाल्या होत्या पण गेल्या 5वर्षा पासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून मतभेद निर्माण झाले होते ते इतके टोकाला गेले की ते ऐकमेका चां तिरस्कार करू लागले .आणि त्यांनी ऐकमेकापासून ते गेल्या 5 वर्षा पासून विभक्त राहत होते .  अशा भंगलेल्या संसारास पुन्हा एक नवीन चांगली दिशा मिरज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वी . वी . खुळपे  या  न्यायदेवतेने दिला.
 .          सदर  प्रकरणात या दोघांचे वकील ॲड ममतेश आवळे  कुरुंदवाड व ऍड पी ऐस भाटकर मिरज यांनी अथक प्रयत्न करून तसेच मिरज येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माननिय वी वी खुळपे साहेब यांचे सहकार्याने गेल्या 5 वर्षापासून सुरू असलेला वाद त्यांनी  राष्ट्रीय लोक अदालत मद्ये यशस्वी मीटवला तसेच त्यांना नवीन संसारिक गुलाबाचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्या दिल्या .  यावेळी मिरज न्यायालयातील वकील वर्ग.न्यायालयीन अधिकारी ,   कर्मचारी वर्ग  उपस्थित होता..या जोडप्यांचे सर्वांनी त्यांचे चांगल्या निर्णयाबद्दल त्यांचे  अभिनंदन केले . यावेळी या जोडप्याने आम्हीं आमच्या तिन्ही मुलीच्या भविष्याच्या विचार करून हा निर्णय घेतल्याचे सांगितले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.